प्रवाही
पानगळीचा
रेटा सोसून
काही मागे
उभेच आहे;
पाचोळ्यातून
हलके हलके
जीवनरसही
वहात आहे;
जे झाले, ते गेले
आता, मागे
वळून पाहता
काही नाही;
तरी पाखरे
सुरेल गाती
जगणे होता
पुरे प्रवाही!
वाचने
2901
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
प्रतिक्रिया
आवडली...
तरी पाखरे
सुरेल गाती
जगणे होता
पुरे प्रवाही!...सुरेख
उत्साही कविता!
आनंदी कविता!
आशावादी कविता!
थोडक्यात काय तर उत्तम कविता !
रसग्रहण व्हावे असे काव्य आहे. सुरेख. काव्यबिज सर्वत्र पसरले आहे असेच वाटतय.
छान, तरल. :)
तरी पाखरे
सुरेल गाती
जगणे होता
पुरे प्रवाही!
जगणे होता
पुरे प्रवाही!... क्या बात है! :)
प्रवाही अन ओघवते...
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
आवडली.
बर्याचदा वाचली. खूप आवडली हे सांगायला नको. प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता तो आत्ता देतोय.
कवितेमागील context बद्दल नंतर कधीतरी...
In reply to वाह! by एस
कवितेमागील context बद्दल नंतर कधीतरी...
सवडीने जरुर लिहा, वाट पाहते.सुरेख आशयपूर्ण कविता .
आवडली कविता.अर्थपूर्ण,सकारात्मक!
आवडली...