कमिटी (शतशब्द्कथा )
'कमिटी येनार' म्हटल्यावर सगळी संस्था कामाला लागली. बऱ्याच फाईली हालल्या.
कमिटीचा दिवस सणासारखा सजला होता.
मिटिंग हॉलमधे लंबगोल टेबल- त्यावर सफेद बेडशिटं टाकालीवती.
पाटील सर फाईली ठीक करत होते. काजू बदामाच्या बाउल्समधून थोडे तोंडात टाकून लेव्हल बरोबर करत होते.
इतक्यात ''कमिटी आली..'' असा गलका झाला.
सदस्यांनी जागा घेतली. फाईली चाचपल्या. पाकीट ओक्के असल्याचं सराईतपणे हेरलं.
चेरमनसायाबाकडं बघून कसनुसं हसले.
चष्म्याच्या वरून बघत महाजनसाहेब म्हटले "यावेळी संस्थेने प्रगती चांगली केलीय. पण... तेव्हढा टीचिंग स्टाफ आणा जरा ''
''तुमचं मार्गदर्शन असल्यावर काय सर? फुडल्या खेपेला अजून सुधारणा करु !''
कॉलेजचा इनटेक दोनशेने वाढण्यावर शिक्कामोर्तब झालं.
भौसाहेब खूष, कर्मचारीबी खूष.
दिवाळीचा बोनस लगेचच डीक्लेर झाला !
वाचने
4803
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
मस्तं !
कमिटीच्या करामती म्हायत्येत !
काजू बदामाच्या बाउल्समधून थोडे तोंडात टाकून लेव्हल बरोबर करत होते. ह्ये आमिबी घरी पावणेलोकांची वाट पातांना न्हेमीच कर्तो :)मी पयला .
99 शब्द मोजले चुभु द्याघ्या.
पाकीट संस्कृती!
पाकीट ओक्के असल्याचं सराईतपणे हेरलं.
फुडल्या खेपेला अजून सुधारणा करु !
जास्त आवडले.
गेंड्याच्या कातडीच्या व्यवस्थेला असे चिमटे कधीकधी सॉल्लिड लागतात. :-)
कथा आवडली.
ब-याच 'कमिटी' आठवल्या!
In reply to कथा आवडली. by आतिवास
हो अगदी अगदी.... :)
आवडली कथा.
मस्त. :)
व्यंगचित्रकाराची नजर जाणवली :-) .
मस्त!!!!!
दिवाळीचा बोनस लगेचच डीक्लेर झाला !या वाक्या इतके स्वप्नवत वाक्य जगाच्या पाठीवर कुठेच नसेल.
एकदम मस्त जमलीय..
मस्तच.आवडली कथा.
पण... तेव्हढा टीचिंग स्टाफ आणा जरा:))
मस्तं !