मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नक्षत्रांचे देणे

सूड · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काल नक्षत्रांचे देणे बघताना शांता शेळकेंच्या ओळी ऐकत होतो.. जुन्या आजोळाची आता पार झाली पडझड ओटी अंगण ओसरी एक राहिले ना धड हरवले बाळवय खोल जिव्हारी लागले उठे मुकाट तिथून मन शिणले भागले क्षणभरही वळून नाही पाहिले मी मागे काय राहिले तिथेच काय आले मजसंगे काय राहिले तिथेच, काय आले मजसंगे? विचार करता करता हे काहीसं सुचलं. कितपत जमलंय माहित नाही: मजसंगे आला काही जुन्या आठवांचा मेळा माझे सांत्वन कराया जेव्हा दाटलासे गळा याच आठवांनी दिले उभे राहण्यास बळ आली संकटे तरीही जरा कमी झाली झळ आले माझ्यासंगे सारे चाफ्या अनंताचे वास आले भावंडांसवेचे छोटेमोठाले प्रवास आला आजीचा बटवा आली तुपाची तामली मागे वळून पाहता दूर नजर थांबली वाटे संगे आले सारे तरी राहिलेच काही जुन्या मामाच्या गावाची सर नव्या घरा नाही!! -२५-०९-२०१४

वाचने 6660 वाचनखूण प्रतिक्रिया 39

एस 25/09/2014 - 20:29
वाटे संगे आले सारे तरी राहिलेच काही जुन्या मामाच्या गावाची सर नव्या घरा नाही!!
फक्कड जमले आहे सूडराव!

किसन शिंदे 25/09/2014 - 20:38
सूड, प्रचंड आवडलं रे! खवचटपणाबरोबर हा असा छान हळूवारपणाही तू तुझ्यात जपून ठेवल्याचं पाहून बरं वाटलं.

पैसा 25/09/2014 - 20:52
खूपच छान! हुरहूर लावणारं मागे राहिलेलं बरंच काही आठवलं.

मुक्त विहारि 25/09/2014 - 22:08
कविता आवडली...

मेघवेडा 26/09/2014 - 02:09
!

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 26/09/2014 - 11:52
कवितांकडे शक्यतो फिरकत नाही. पण ही कविता मात्र खुप आवडली. एकसंध झालीये. शांता शेळकेंची कविता कुठे संपली आणि तुझी कुठे सरु झाली हे तु लिहिलस म्हणुनच मला समजले.

ज्ञानोबाचे पैजार 26/09/2014 - 11:57
फारच सुंदर, शेवटचे कडवे तर फार मस्त आवडली पैजारबुवा,

सविता००१ 26/09/2014 - 12:32
मस्त. आवडली

दिपक.कुवेत 26/09/2014 - 12:58
मला साध्या सरळ सोप्या कविता आवडतात. समजायला पटकन अश्या. अर्थात तुझ्या ह्या कवितेचं देणं नक्षत्रागत उतरलयं ह्यात वाद नाहि.

काउबॉय 26/09/2014 - 14:47
बस नाम ही काफी है. शालेय पाठ्यपुस्तकापेक्षा "चौघीजणी" वाचल्यापासुन त्यांच्या साहित्यसंपदेशी जो खरा संबंध आलाय त्याचा रुणानुबंध कधी बनला हे मलाच कळले नाही. तुझी पुरवणी सुधा पूरक.

विवेकपटाईत 26/09/2014 - 20:31
लहान असताना आजोळी गेलो होतो तिथला मोठा वाडा (खपरेल आणि मातीचा), भरलेलं घर, गायीचा गोठा, मातीचे अंगण, शेणानी घर सारवण, सर्वच आठवले. आता तिथे काहीच उरल नाही. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. डोळे पाणावले. .... धन्यवाद.
सर्व प्रतिसादकांचे आभार !! >>असा छान हळूवारपणाही तू तुझ्यात जपून ठेवल्याचं पाहून आपल्याला प्रिय असतात अशाच गोष्टी आपण जपून ठेवतो आणि सणसमारंभ, महत्त्वाच्या प्रसंगी वापरतो. ह्याचं पण तसंच म्हणा हवं तर!! मिपावर (आणि अर्थात मिपाबाहेरही) नेहमीच हळूवार राहून चालत नाही. असो. :)

मिसळलेला काव्यप्रेमी 03/10/2014 - 07:33
अतिशय सुरेख... आवडली रचना

पद्मश्री चित्रे 04/10/2014 - 19:52
>>वाटे संगे आले सारे तरी राहिलेच काही.... अगदी खरे.

वेल्लाभट 06/10/2014 - 17:22
सहीच की राव ! वाह ! काय लिहीलंयत ! क्या बात ! सुरेख !

पहाटवारा 07/10/2014 - 07:01
शांताबाईंच्या शब्दांच्या पुढे शब्द जोडण्याचे धाडस करुन ते ऊत्तम पार पाडल्याबद्दल अभिनंदन ! सुरेख जमले आहे.. -पहाटवारा

चतुरंग 07/10/2014 - 07:13
सुरुवातीला शांताबाईंची कविता आणि तुझी कविता असे वाचले आणि मग शांताबाईंची कविता वाचून सलग तुझ्या कवितेत शिरलो तर मूळ कवितेचाच भाग वाटला इतका सुंदर जमलाय. जियो!! (एका प्रतिभावान कवियत्रीच्या केवळ कवितेच्या परीसस्पर्षाने तुझ्यातल्या कवीला साद घातली आणि सुबक काव्य जन्माला आले!) चतुरंग

विटेकर 08/01/2015 - 16:46
आवडली कविता ! आज काल फारश्या कविता वाचतही नाही आणि आवडतही नाहीत. एकूणच ललित साहित्याकडे सध्या डोळेझाकच आहे. वाढत्या वयाबरोबर आणि पिकल्या केसांबरोबर अभिरुची समृद्ध होत आहे असे मात्र म्हणवत नाही. हा हळुवारपणा आणि रसिकत्व जपता यावे अशी परिस्थिती तुम्हा प्राप्त होवो या शुभकामनेसह या कवितेबद्दल अभिनन्दन करतो. असेच लिहित रहा ! वाचे बरवे कवित्व आणि रसिकत्वाचा प्रवास सुखकर होवो !

डॉ सुहास म्हात्रे 08/01/2015 - 16:50
हे असं काहितरी कसदार लिहा सूडबुवा. कशाला उगाच चिखलात दगड मारायच ? चिखल तसाच राहतो, उगा आपल्या अंगावर दोन शिंतोडे उडतात :)