ग्वेंडोलिन ब्रूक्स (१९१७-२०००) ही अमेरिकेतील कृष्णवर्णीयांमधील एक महत्त्वाची कवयित्री होऊन गेली. तिची कर्मभूमी शिकागो शहराचा दरिद्री आणि ओबडधोबड दक्षिण भाग. त्या परिस्थितीत पिचणारी, त्या परिस्थितीतही भोग भोगणारी, अशी माणसे तिच्या कवितांमध्ये उतरली आहेत. तिच्या एका कवितेचे भाषांतर/रूपांतर येथे देत आहे.
- - - - - - - - - - - -
शांती अन् मुक्ता
मुक्ता गेली कॉलेजात
शांती राहिली घरी -
जीवन विंचरून काढलेन
घेऊन बारीक फणी
एकही गुंता ठेवला नाही
सोडवला केसन् केस
असली जिंदा पोट्टी नसणार
धुंडून घेता देश
शांतीला झाल्या दोन पोरी
क्वारंच नाव लावून
मुक्ता-आई-बाबा झाले
अर्धे मेले शरमून
शांती सोडून सगळे झाले
अर्धे मेले शरमून
शांती अखेरचा "येते!" म्हणता
पोरींनी रस्ता घरला
(शांतीनं आपल्या बारीक फणीचा
तेवढा वारसा सोडला.)
कॉलेजमध्ये गेलेली मुक्ता
चिचुंद्रीए बिचारी
एकटीच जीवन जगतेय
जुन्या घरदारी
- - - - - - - - - - - -
(प्रत अधिकाराचे उल्लंघन होऊ नये म्हणून इंग्रजी कविता दिली नाही आहे.)
इंग्रजी कविता येथे वाचून दाखवतो (१ मिनिटाची क्लिप)
मराठी भाषांतर येथे (१ मिनिटाची क्लिप) :
जियो...!
In reply to जियो...! by विसोबा खेचर
+१
धनंजयाचा
In reply to धनंजयाचा by सहज
बहिणी-बहिणी
कविता आणि भाषांतर छानच
सुरेख..
धनंजय,
वा!
फेब्रुवारी चौदा
मस्त काव्यवाचन !!!