मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इरेला पेटला आहे पिसारा (गझल)

अजय जोशी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
सुखाचा केवढा झाला पसारा बिलगला वेदनेचाही पहारा तुझ्या लाटेत सामावून घे ना कधीचा थांबला आहे किनारा तुझ्या वाणीत सारे भाव होते नको सांगूस की केला पुकारा तुझा रस्ता कधी चुकलो नसे मी नसे ही बातमी आहे इशारा किती चेकाळली स्वप्ने उराशी पहा मिळताच थोडासा उबारा अजुन तुडवीत आहे पाय काटे अजुन नक्की नसे माझा निवारा शरीराची उडाली फार थरथर मनामध्ये कुठे होता शहारा? मला सांगून गेला आपलेपण तुझा तो एक ओळीचा उतारा दुरुन नुसतेच तू नाचू नको ना इरेला पेटला आहे पिसारा जगाला पाहिजे ते ते म्हणू दे 'अजय' बिनधास्त वाजव तू नगारा

वाचने 2311 वाचनखूण प्रतिक्रिया 9

चौथा कोनाडा 18/09/2014 - 22:22
मस्त आहे ! आवडली ! >> तुझ्या लाटेत सामावून घे ना कधीचा थांबला आहे किनारा हे विशेष आवडले !

विवेकपटाईत 19/09/2014 - 20:46
हे विशेष आवडले जगाला पाहिजे ते ते म्हणू दे 'अजय' बिनधास्त वाजव तू नगारा

निरन्जन वहालेकर 19/09/2014 - 21:22
"तुझ्या लाटेत सामावून घे ना कधीचा थांबला आहे किनारा" व्वा ! क्या बात है ! !

वेल्लाभट 22/09/2014 - 15:19
खास जमली नाही. ओढून ताणून वाटली.