पोकळी
लेखनविषय:
वेगळी नाहीस तू, का कोण जाणे, वाटले
सावली माझीच तू, का कोण जाणे, वाटले
व्हायचो कित्येकदा भवती तुझ्या मी कवडसे
एकदा बघशील तू का कोण जाणे वाटले
जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे
पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले
कोरडाच्या कोरडा पाऊस आला एकटा
वाटले येशील तू..का कोण जाणे..वाटले
पोकळी माझ्यातली का दरवळाया लागली?
(श्वासभर फुललीस तू का कोण जाणे वाटले)
शेवटी आलाच ऐकू हुंदका अस्पष्टसा
शेवटी चुकलीस तू! का कोण जाणे, वाटले
वाचने
6566
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
मस्त!
बेसनलाडू बघून धागा उघडला आणि सार्थक झालं!! एकच नंबर !!
In reply to बेसनलाडू बघून धागा उघडला आणि by सूड
बेसनलाडू बघून धागा उघडला आणि सार्थक झालं!! एकच नंबर !! - तीव्र सहमत :)
चांगली झालीये. आवडली.
खूप भारी. खास..
मस्तच !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हिंदी-चिनी.. नेमके काय?फारच सुंदर
बेसनलाडू लिहीता झालेला बघून मणाला आनंद झाला.
(भावना सहीसोबत मांडणार्या बेसनलाडूचा पंखा) प्यारे
कोरडाच्या कोरडा पाऊस आला एकटा
वाटले येशील तू..का कोण जाणे..वाटले
व्वा...
" जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे
पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले "
व्वा क्या बात है!
सून्दर !
व्वा!! एक नंबरच लिहिलेय.
तुझ्या हळूवार लिखाणाचा चाहता आहे ब्वॉ, लिहित रहा नेहमीच.
बेला.. लिखाण खुप आवडलं.!!
आरं बायडीला धाडून दिलं देशात आन आत्ता हितं कविता लिवत बसलास व्हयंं रे
आवड्ली !!!
आवल्डी !!!
मस्त!!!! खूप आवडली :-)
जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे
पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले
पोकळी वेगळी नाहीस तू, का कोण जाणे, वाटले
चिंचपोकळी आमचीच तू, का कोण जाणे, वाटले
पोकळी माझ्यातली का दरवळाया लागली?
(श्वासभर फुललीस तू का कोण जाणे वाटले)>>> सलाम!!!
आवडली प्रत्येक ओळ.
खूप दिवसांनी लिहिलंत..
बघायचीच राहिली होती!
प्रत्येक ओळ सुंदर! खूप खूप धन्यवाद!! :)
पुन्हा वाचली. पुन्हा खूप आवडली. :)
खूप चांगली गझल ! प्रत्येक शेर निव्वळ अप्रतिम ! खूप आवडली !
वा!