सायकलींग... (भाग १)

मोदक's picture
मोदक in भटकंती
9 Sep 2014 - 9:42 pm

उत्तरायण साठी झालेली पुणे ते बडोदा ट्रीप मनाप्रमाणे पार पडल्यामुळे २०१४ सालाची सुरूवात झकास झाली होती.

ऑक्टोबर - नोव्हेंबर २०१३ पासूनच माझी गुजरात ट्रीपची तयारी सुरू होती तेथून परत येतानाच "आता पुढे काय..?" असा प्रश्नही डोकावत होता. त्या ट्रीपचा हँगओव्हर उतरण्यात दोनेक आठवडे गेले दरम्यान भीमाशंकर / गिरवली वगैरे भटकंती झाली. या दरम्यानच एकदा सायकलींग सुरू करावे असा विचार डोक्यात आला.

काही मित्रांचा सल्ला घेतल्यानंतर "उत्साहात सायकलींग सुरू करणारे पुढे कितपत नियमीत सायकलींग करतात हा विचार कर." असा सल्ला सगळीकडून मिळाला (थोडक्यात म्हणजे, "तुझे हे वेड किती दिवस टिकेल सांगता येत नाही..!!")

सायकलींग करायचे म्हणजे नक्की काय करायचे हे मलाही नेमके स्पष्ट नव्हते. सायकल चालवायची, ओके. पण कुठे..? किती लांब चालवणे शक्य होईल..? सायकल कोणती घ्यावी? कोणत्या प्रकारची घ्यावी? वगैरे प्रश्नही होतेच. माहिती काढण्यास सुरूवात केल्यानंतर अनेक ठिकाणच्या अनेक सल्ल्यांमुळे गोंधळ आणखी वाढला. शेवटी या मुद्द्यावर आणखी जास्त वेळ न घालवता सर्वप्रथम एक सायकल विकत घेवून चालवायला सुरू करू आणि बाकीचे नंतर बघू असा विचार केला व सायकल विकत घेण्याच्या दृष्टीने शोधाशोध सुरू केली. अनेक शोरूम्स आणि दुकानांना भेट दिल्यानंतर "फँटम सी रॉक" हे मॉडेल पसंत पडले. आता ही सायकल विकत घ्यायची असे ठरल्यानंतर दिलीप या मित्राने या पूर्वीही मिळालेला सल्ला आणखी एकदा दिला, "आधी एक सेकंड हँड सायकल घे.. चालव आणि जर नियमीत सायकलींग केलेस तरच नवीन घे." आता सेकंड हँड सायकल कुठून आणायची असा प्रश्न उभा राहण्याआधीच त्याने त्याची स्वत:ची माळ्यावर पडलेली सायकल दाखवली व आपण दुरुस्त करून घेवू अशीही ऑफर दिली.

त्या सायकलचे प्रथमदर्शन फारसे उत्साहवर्धक नव्हते. सायकल अक्षरश: धूळ खात पडली होती.

लहान टायर साईझ (२४"), गिअर्स नाहीत आणि सीटही नाही..! पण त्या सायकलवर दिलीपने १९९० साली (होय १९९० साली..!!) चिंचवड ते गोवा ट्रीप केली होती. __/\__

दुरुस्त करून घेतल्यानंतर ही सायकल अशी चकाचक झाली.

.

उत्साहात सायकल हातात घेतल्यानंतर पहिली राईड केली - चिंचवड ते धायरी. (सायकल घरी आणण्यासाठी!) त्यानंतर नियमीतपणे या सायकलने खडकवासला मार्गे डोणजे किंवा डेक्कन, विकांतादरम्यान जास्त भटकणे, नियमीतपणे अंतर वाढवणे असे सुरू केले. ट्रेकींगसह बाकी सर्व उद्योगांना विश्रांती दिली व आठवड्यातून किमान दोन / तीनदा २० ते ३० किमी अंतर कापणे सुरू केले.

ही सायकल चालवताना अनेक गोष्टी लक्षात आल्या - चढ आल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त दम लागणे, सायकलचा स्पीड वाढवता न येणे, साध्या उतारावरही पेडल्सची क्षमता संपणे वगैरे वगैरे. आता कोणत्या प्रकारची सायकल घ्यावी याच्या संकल्पना स्पष्ट होत होत्या. सायकलला गिअर्स असणे गरजेचे आहे, टायर साईझ मोठा हवा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सायकल वजनाला हलकी हवी, या दृष्टीने चांगल्या सायकलचा शोध सुरू झाला.

या दरम्यान वैभव नामक आणखी एका मित्राची पीअरलेस कंपनीची सायकल माझ्या ताब्यात आली. सेंट्रल सस्पेंन्शन, १८ गिअर्स आणि कमी वजन वगैरे हव्या त्या गोष्टी होत्याच.

पीअरलेस सायकल

.

या सायकलने डोणजे - अतकरवाडी (सिंहगड पायथा), कात्रज नवीन बोगद्यातून खेड शिवापूर वगैरे नवीन रूट धुंडाळणे सुरू केले. इतर माहिती काढताना आपला पिंगू सायकल चालवतो हे कळाले व त्याचे डोके खाणे सुरू केले. पहिली लांबची राईड केली ती पिंगू आणि मायबोली ग्रूपसोबत पुणे ते कामशेत. (२७ एप्रिल २०१४)

पिंगू, केदार दिक्षीत, केदार जोशी, अमित, किरण ही मंडळी सोबत होती.

केदार जोशी माझ्या सायकलवर बसला आणि पुढच्या क्षणाला सायकलचे नामकरण झाले होते. "र ण गा डा" :D

मी त्याची बर्गमाऊंट कंपनीची सायकल चालवली आणि माझ्या सायकलचे नवीन नाव रणगाडा का आहे हे नीऽऽऽट समजले. ती सायकल एकदम हलकी होती आणि आपण जितकी शक्ती पेडलींग मध्ये लावतो तितकीच शक्ती रस्त्यावर लागू पडत होती. माझ्या सायकलप्रमाणे "पावर लास" वगैरे भानगडीच नव्हत्या, आणि गिअर्स अत्यंत स्मूथ होते. टिपीकल भाषेत सांगायची तर "मख्खन" होती ती सायकल. याउलट रणगाड्यावरून ९० किमी अंतर कापणे भरपूर थकवणारे होते.

यानंतर अचानकच एकदा अमितसोबत पुणे सातारा हे ११० किमी अंतर सायकलने पार केले. सातारा राईड खर्‍या अर्थाने पहिली लांबवर केलेली राईड होती. सोबत एक बर्गमाऊंट कंपनीची हायब्रीड आणि श्नेल कंपनीची MTB अशा सायकल्स होत्या. टेललाईट पडणे, सायकल पंक्चर होणे, उन्हामुळे शरीरातले पाण्याचे प्रमाण कमी होणे, प्रचंड थकवा येणे वगैरे प्रकारांचा व्यवस्थीत अनुभव घेत आम्ही संध्याकाळी सातार्‍याला पोहोचलो.

.

परतताना मी एकटाच श्नेल MTB घेवून आलो. थोडे अंतर सायकल चालवत आणि थोडे अंतर एखाद्या गाडीत सायकल टाकून असे पार केले.

सायकल कशी घ्यावी याहीपेक्षा कशी नसावी याचे अनेक धडे हळूहळू मिळत होते. सायकल संदर्भात आतापर्यंत मिळवलेली माहिती निरूपयोगी असल्याचे लक्षात आले होते आणि इम्पोर्टेड साईकल्सची माहिती मिळवण्यास सुरूवात केली.

इम्पोर्टेड सायकलच कशाला लागते..?
अरे सायकलच्या वजनाने असा किती फरक पडणार आहे..?
मी सायकलमध्ये ३० / ३५ हजार रूपये घालवणार नाहीये.
कशाला पण..?? - ही ठीक आहे की..

ही सगळी माझीच मते मुकाट गिळून इम्पोर्टेड सायकलचा शोध घेण्यास सुरूवात केली. गिअर्स, शिफ्टर्स, शिमानो अॅसेरा, अॅडजेस्टेबल स्टेम, वगैरे नवीन नवीन संकल्पना कानावर पडत होत्या आणि मी त्याची माहिती काढत होतो.

...शेवटी मे महिन्यात हिय्या केला व इम्पोर्टेड सायकल घेतली.

मेरीडा क्रॉसवे १५.

.

मोठा टायर साईझ - २८", फ्रंट सस्पेंशन, सीटखाली एक सस्पेंशन, २४ गिअर्स (शिमानो अॅसेरा), वजन फक्त १३ किलो आणि चालायला एकदम स्मूथ.. एकदम मख्खन..!!

या सायकलवरची पहिली राईड होती - पुणे ते महाबळेश्वर.

रोहित आणि किरण - हायवेवर..

.

वाई कडे..

.

पसरणी घाटात - पिंगू आणि किरण

.

महाबळेश्वरला पो हो च लो ..!!!!!

.

किरण, मी, पिंगू, अमित, रोहित.

पुणे महाबळेश्वर राईड ही आमच्या पुढच्या अत्यंत महत्वाकांक्षी अशा "पुणे-गणपतीपुळे" राईडची पूर्वतयारी होती. कारण पुढच्याच वीकांताला आम्ही पुणे-माणगांव-श्रीवर्धन मार्गे संपूर्ण समुद्रकिनार्‍यावरच्या रूटने गणपतीपुळे गाठणार होतो.

प्रमाणाबाहेर यशस्वी झालेल्या महाबळेश्वर राईडमुळे सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्याच मूडमध्ये आम्ही पुणे गणपतीपुळे राईड सुरू केली.. मात्र पहिल्याच दिवशी तीन अपघात झाल्याने आम्ही दुसर्‍या दिवशी पुण्याला परतण्याचा निर्णय घेतला.

पहिला अपघात अत्यंत विचित्र पद्धतीने झाला. आम्ही एका पुलावरती थांबून पराठे वगैरे खादाडी सुरू असताना किरणची सायकल वार्‍यामुळे चक्क पुलावरून खाली पडली. सुदैवाने सायकलला काहीही झाले नव्हते.

.

दुसरा अपघात - पिंगूचा. सायकलचा ब्रेक न लागल्याने त्याची सायकल त्याच्यासह कोसळली व दोघांनाही थोडेफार खरचटले.

तिसरा अपघात माझाच झाला. ताम्हिणी घाटाचा उतार सुरू झाल्यानंतर वेगाचा अंदाज आला नाही आणि एका वळणावरती सायकल कंट्रोल न झाल्याने मी रस्त्याशेजारच्या काचा आणि दगड असलेल्या खोल खड्ड्यात सूर मारला..

.

वरील ब्रेकमार्क दिसत आहेत त्या मार्गाने मी गेलो पण रस्त्याने उजवीकडे वळण घेतले होते. ;)
सुदैवाने मला व सायकललाही खूप जास्त लागले नव्हते. मात्र गॉगल फुटला होता व सायकल हेल्मेटला क्रॅक गेला होता.

एवढं झाल्यावर मात्र सर्वांनी माणगांव मार्गे इंदापूर गाठले व दुसर्‍या दिवशी सर्वजण पुण्याला परतलो.

या अपघाताने बर्‍यापैकी शॉक बसला होता... तीनेक आठवडे पूर्ण बरे होण्यात गेले आणि पुन्हा नव्या जोमाने सायकलींग सुरू केले.

सिंहगड पायथा हा आवडीचा रूट होताच. आणखीही अनेक मार्ग सायकलने पार करण्यास सुरूवात केली.

पुणे-खेड शिवापूर-कोंढणपूर-सिंहगड घाट-पुणे (७० किमी)
पुणे - वारजे - पानशेत - डोणजे - पुणे (७० किमी)
पुणे - पानशेत - कादवे घाट - वेल्हे - पाबे घाट - डोणजे - पुणे (८० किमी)
पुणे - बोपदेव घाट - सासवड - पुरंदर पायथा - पुणे (९० किमी)

एव्हाना पावसाळाही सुरू झाला होता.. वीकांत आणि अनेकदा रोजच सायकलींग सुरू होते.

पावसाळ्यातले काही फटू..

कादवे घाट.. (या फटूमध्ये डावीकडे माझी सायकल दिसत आहे.. आणखी एक रायडर सापडतो आहे का..?)

.

कादवे खिंड

.

ताम्हिणी घाट

.

.

३१ ऑगस्टला झालेल्या शिरवळ राईड दरम्यान सुधाकरने आणखी एका आव्हानात्मक गोष्टीबद्दल सांगितले...

(क्रमशः)

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

9 Sep 2014 - 9:43 pm | भिंगरी

वा! सायकल बहाद्दर!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Sep 2014 - 9:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

झक्कास. :)...

श्रीरंग_जोशी's picture

9 Sep 2014 - 10:22 pm | श्रीरंग_जोशी

अनेक महिने मोदकने लेखनसन्यास व प्रतिसादसन्यास घेतला होता.

या काळात संपूर्ण लक्ष सायकलिंगवर केंद्रीत केलेले दिसत आहे. या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमीच.

यावेळचे लेखन अभ्यासपूर्ण तर आहेच व त्यास अनुभवाची जोड मिळालेली आहे.

एका नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावरची लेखमालिका वाचायला मिळणार याचा आनंद आहे.

सायकलिंगमधील पुढचे टप्पे गाठण्यास शुभेच्छा.

सुहास..'s picture

9 Sep 2014 - 10:23 pm | सुहास..

पुणे - बोपदेव घाट - सासवड - पुरंदर पायथा - पुणे (९० किमी) >>>

लय भारी रे गड्या ...बोपदेव घाटात बाईक ला दम लागतोय ..सायकल मारलीस !! धन्य आहेस

:)

खरं आहे.. बोपदेव घाट आणि पाबे घाट आम्ही आत्तापर्यंत सर केलेले अवघड घाटांपैकी आहेत.

बोपदेव घाटाची उंची अचानक वाढत जाते.

.

घाट उतरल्यानंतर सहज पुढच्या चाकाला हात लावून बघितला, तीव्र उतारावर सतत ब्रेक लावल्याने आणि एकंदर झालेल्या घर्षणाने रिम प्रचंड तापली होती - सणसणून चटका बसला.

एस's picture

9 Sep 2014 - 10:46 pm | एस

अभिनंदन. मस्त सुरुवात.

रवीराज's picture

9 Sep 2014 - 11:22 pm | रवीराज

पुणे पुन्हा सायकलींचे शहर होउ लागले आहे, हि चांगली गोष्ट आहे.

मुक्त विहारि's picture

10 Sep 2014 - 12:15 am | मुक्त विहारि

पुभाप्र

खटपट्या's picture

10 Sep 2014 - 12:27 am | खटपट्या

मस्त !!

मी आपली सायकल टांगून ठेवली आहे बॉ!!
तुमच्या हिमतीला दाद देण्यास यापेक्षा जास्त वजन माझ्याकडे नाही आहे :D

मोदकभाव - वेलकम ब्याक आणि लईच भारी. पुढील भागाची वाट पहातो आहे.

काउबॉय's picture

10 Sep 2014 - 1:08 am | काउबॉय

_/\_

बापरे!! एव्हढा सगळा उपद्व्याप आहे या सायकलींग मागे?
गप घरात टीव्हीपुढे पडुन रहायच सोडुन नाही त्या भानगडी कुणी सांगीतल्या आहेत देव जाणे.
काय एकेक थेर तरी?
आणि एव्ह्ढा पैसा सायकल विकत घ्यायला? त्यात एखादा स्मार्ट फोन बीन घ्यायचा, मिरवायच सोडुन.......

यसवायजी's picture

10 Sep 2014 - 8:01 am | यसवायजी

:))

खटपट्या's picture

10 Sep 2014 - 9:53 am | खटपट्या

हो आणि उगा तंगड वगैरे तुटलं तर

मोदक's picture

10 Sep 2014 - 3:17 pm | मोदक

:))

कपिलमुनी's picture

10 Sep 2014 - 3:41 pm | कपिलमुनी

स्मार्टफोनवर एखादी सायकल तेसिंग गेम डाउनलोड करुन खेळायची ;)

पैसा's picture

10 Sep 2014 - 9:18 am | पैसा

झकास चालू आहे! कळीचा मुद्दा. वजन किती कमी केलंस?

फारसे नाही. वजन राखून आहे. ;)

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Sep 2014 - 9:35 am | ज्ञानोबाचे पैजार

मोदकराव बरेच दिवसानी बोर्डावर दिसले. पण काय एन्ट्री मारली आहे. एकदम दिवार मधल्या बच्चन सारखी जबरदस्त.

सायकल चालवण्याचे पण वेड लागते. तुमचे हे वेड फार आवडले. ते असेच टिकुन रहावे या साठी अनेक शुभेच्छा.

रच्याकने मी सुध्दा रोज हापिसची बस पकडायला सायकल वरुनच बस स्टॉप पर्यंत जातो. रोज सकाळी पाच कि.मी. आणि संध्याकाळी ५ कि.मी. असे मागची ६ वर्ष करत आहे.

पैजारबुवा

श्रीरंग_जोशी's picture

10 Sep 2014 - 8:22 pm | श्रीरंग_जोशी

कुतुहलापोटी हा प्रश्न.

दिवसभर सायकल कुठे ठेवता?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Sep 2014 - 8:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ते स्वतः दिवसभर सायकलवर असतात. =))

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Sep 2014 - 2:19 pm | ज्ञानोबाचे पैजार

नळ स्टॉपला टेलिफोन एक्सचेंजच्या मागे. एकदम सेफ जागा आहे.

बाकी. दिवसभर सायकलवर असण्याचे दिवस गेले आता. कालिजात असताना दिवसभर भटकायचो सायकली वरुन.

पैजारबुवा,

पिलीयन रायडर's picture

10 Sep 2014 - 9:51 am | पिलीयन रायडर

खरं सांगायचं तर तू सायकल बद्दल चौकशा सुरू केल्यास तेव्हा मलाही हे एक खुळ आहे असंच वाटलं होतं.. पण तू चक्क इतकं मनावर घेतलस!! क्या बात है!!

खुप दिवसांनी इथे आलास.. येत रहा बाबा.. ८ तास हापिसात पाट्या टाकत असशील तर १० मिनिटं इथेही डोकावुन जात जा!

मोदकरावांचे पुन्हा एकदा स्वागत (होऊन जाऊ दया जोरदार टाळ्यांनी) :)

सौंदाळा's picture

10 Sep 2014 - 10:30 am | सौंदाळा

+१
वेलकम ब्याक
फोटु मस्तच
पुभाप्र

नाखु's picture

10 Sep 2014 - 2:59 pm | नाखु

ईथे गणपती बाप्प आम्हाला पावले आणि "मोद(क)" अवतरला.

मोदक's picture

10 Sep 2014 - 3:26 pm | मोदक

काकानु.... कस्काय.? :)

चौरा काका कुठे आहेत..?

चौकटराजा's picture

11 Sep 2014 - 8:55 am | चौकटराजा

शेवटी मोदकाच्या आयुष्यात एक " ती" आली याचा आनंद आहे ! बाकी सायकल चालविण्यामुळे दर शनिवारी हादडायला वेळ
मिळाला नसेल त्यामुळे जरा फिगर सुधारली असल्यास " ती" ला त्याचे श्रेय द्यायलाच पाहिजे.
@ मोदक , बघ लेका इथं किती लोकानी तुझं स्वागत केलं आहे ते ! खुंटा हलवून तू मिपातलं स्थान पक्कं केल आहेस बुवा ! आता मी पण शिंग मोडून एक सायकल घेउ म्हण्तो !

समीरसूर's picture

10 Sep 2014 - 10:33 am | समीरसूर

आपल्या जिद्दीला, झपाटलेपणाला सलाम! इतकी लांबची अंतरे सायकलने कापणे खूप अवघड आहे. अशी आव्हाने पेलणे खरोखर आयुष्याला एक नवा झळाळता अर्थ देते. लिखाण तर मस्तच! अजून येऊ द्या. :-)

बघतो मला काही प्रेरणा मिळतेय का? (सायकल चालविण्याची नव्हे; आयुष्याचा असा काही दमदार अर्थ गवसतोय का हे चाचपडून पाहण्याची). :-)

आपल्याला अनेक शुभेच्छा!

सविता००१'s picture

10 Sep 2014 - 12:16 pm | सविता००१

मस्तच रे. आता पटापट पुढचे भाग लिहि. काय काय नवीनच कळालं आज मला सायकल बद्द्ल.

वेलकम ब्याक मोदक. सायकलगाथा लय म्हणजे लयच भारी!!!! मान गये _/\_

आजच हा लेख वाचला. आणि नेल्सन मंडेलांचं हे वाक्यही ...
There is no passion to be found playing small - in settling for a life that is less than the one you are capable of living.

You're a very good example of this.. नवनवे उपक्रम हाती घेऊन तू ते नेटाने + अभ्यासपूर्ण तयारीने पार पाडतोस, याचं कौतुक आणि अचंबाही वाटतो.

अनेक शुभेच्छा. आणि अर्थातच पुभाप्र.

अजया's picture

10 Sep 2014 - 1:37 pm | अजया

पुभाप्र.

प्रशांत's picture

10 Sep 2014 - 2:04 pm | प्रशांत

मस्त रे मोदका
पुभाप्र

बाळ सप्रे's picture

10 Sep 2014 - 2:08 pm | बाळ सप्रे

छान!!
बाकी सायकल कशी नसावी हे हळूहळू कळत जाते याबाबतीत एकदम सहमत.. उच्चप्रतीच्या सायकलमुळे कामगिरीत बराच फरक पडतो..

या सीझनमध्ये २०० BRM करण्याचा माझाही मानस आहे..

कपिलमुनी's picture

10 Sep 2014 - 3:44 pm | कपिलमुनी

BRM = Brevet des Randonneurs Mondiaux.

Brevets are long-distance, free-paced cycling events. Each rider can ride at his or her own pace.
The BRMs are 200-, 300-, 400-, 600-, or 1000- kilometer long.

The rules require to ride the brevets in a specific time limit (e.g., you have 40 hours to ride a 600 km brevet and 75 hours for a 1000 km). Therefore you don’t have much down time and you have to ride at night... with a reflective vest and strong lights !

Riders are self-reliant (they don’t have a support vehicle).

A brevet is not a race. It’s a challenge. There is no ranking. All finishers are equal.

Participants are called randonneurs.

आज नवीन शब्द कळला

मदनबाण's picture

10 Sep 2014 - 2:11 pm | मदनबाण

मादक... स्वारी स्वारी मोदक परत आला ! ;)
सायकल प्रवास जबरदस्त वाटला...
मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-
Alibaba's record IPO covered entire deal in 2 days: Sources

प्यारे१'s picture

10 Sep 2014 - 2:18 pm | प्यारे१

भारी आहेस. __/\__

निखळानंद's picture

10 Sep 2014 - 2:41 pm | निखळानंद

हे प्रेरणादायी आहे आणी कौतुकास्पदही.. !
*good*

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद. पाठीवर मारलेल्या कौतुकाच्या थापांबद्द्ल विशेष आभार्स..

पण थांबा. अब्बी म्येन म्याच बाकी हय. :)

बाळ सप्रे - BRM साठी कोणत्याही प्रकारची मदत लागली तर बिन्धास्त सांगा. माहिती हवी असेल, सोबत लांब राईडला जायचे असेल किंवा BRM रूटवर प्रॅक्टीस करायची असेल तर कधीही हाक मारा.

आतिवास's picture

10 Sep 2014 - 3:49 pm | आतिवास

'सायकल छंद' आवडला. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
लेख वाचून 'परत सायकलिंग सुरु करायला हवं' - असं प्रकर्षाने वाटलं!

सूड's picture

10 Sep 2014 - 4:39 pm | सूड

याचप्रकारे लवकरात लवकर आमच्या सिक्स पॅक अ‍ॅब्स उगवून त्या कशा उगवल्या याचे लीळामृत लिहावयाची संधी आम्हाला मिळो हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!! :)

सूड's picture

10 Sep 2014 - 4:40 pm | सूड

पुभाप्र!! लवकर येऊ देत पुढला भाग.

कवितानागेश's picture

10 Sep 2014 - 5:43 pm | कवितानागेश

बघतंय हां मी.... :)

अप्पा जोगळेकर's picture

10 Sep 2014 - 9:43 pm | अप्पा जोगळेकर

शुभेच्छा. ध्यास घेउन पाठपुरावा करत आहात. आवडले.

खटपट्या's picture

11 Sep 2014 - 5:17 am | खटपट्या

मोदक यांच्याकडून प्रेरणा घेवून खालील सायकल विकत घेण्यात आली आहे. रोज सराव चालू केला आहे. स्टैमिना वाढल्यावर अजून चांगली (हलकी आणि कमी श्रमात जास्त पळणारी) सायकल घेण्याचा विचार आहे. मोदक यांची मदत मिळेलच हि आशा !!
nil

मदनबाण's picture

11 Sep 2014 - 10:04 am | मदनबाण

मोदक यांच्याकडून प्रेरणा घेवून खालील सायकल विकत घेण्यात आली आहे.
हिकडं का तिकडं ?
बाकी या धाग्यामुळे लहानपणाचे दिवस आठवले होते, तिर्थरुपांनी त्यावेळी मला STREET CAT सायकल घेउन दिली होती... या साकलची मस्त जाहिरात लागायची.बूम बूम शाका लाका बूम बूम शाक, स्ट्रीट कॅट गॉना रॉक यू बॅक अशी त्याची जिंगल होती, त्याकाळातली ती वेगळी सायकल होती. बरीच सायकल चालवली, स्लो सायकलींग च्या स्पर्धत एकदा बक्षिस सुद्धा मिळालं होत ! गेले दिन गेले...
मध्यंतरी एकदा सायकल घेण्याची उर्मी आली होती, पण राह्यलच बघा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण

माझ्या हिकड घेतलीय ! तुमच्या तिकड सायकल चालवण्यासारखी परिस्थिती राहिली नाही आता !
तिकड आल्यावर तिकड बी चालवू कि !!

मोदक's picture

11 Sep 2014 - 2:17 pm | मोदक

.

खटपट्या's picture

13 Sep 2014 - 2:00 pm | खटपट्या

:)

खटपट्या's picture

13 Sep 2014 - 2:00 pm | खटपट्या

:)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Sep 2014 - 8:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमच्याकडुन प्रेरणा घेऊन आठवडयातुन कमीत कमी २ ते ३ वेळा कंपनीमधे सायकलवर जाणार आहे. शालेय जीवनामधला आमचा रणगाडा दुरुस्त करुन घेतोय आज. (विकांत सत्कारणी लागणार आज). =))

मोदक's picture

11 Sep 2014 - 2:18 pm | मोदक

अभिनंदन..!!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Sep 2014 - 1:02 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

धन्य आहेस रे बाबा!
__/\__

मोदक's picture

11 Sep 2014 - 6:54 pm | मोदक

राम्राम मंडळी,

मिपाकरांचा सायकलींगचा उत्साह बघता ट्रेक करताना.. या धाग्याच्या धर्तीवर "सायकलींग करताना.." असा धागा काढावयाचे मनात आहे.

तुम्हाला सायकलींग विषयी असलेले प्रश्न, शंका एखादी माहिती हवी असल्यास याच धाग्याच्या प्रतिसादात विचारले तरी चालेल.

माझ्या अल्पज्ञानानुसार प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन. एखादे उत्तर माहिती नसल्यास आपण मिळून शोधूया.

आपला,
मोदक.

सुहास झेले's picture

11 Sep 2014 - 7:32 pm | सुहास झेले

सही रे.... एकदम किडा सोडलास डोक्यात.... कुछ करना पडेंगा :)

विअर्ड विक्स's picture

11 Sep 2014 - 11:13 pm | विअर्ड विक्स

सायकलिंग वर लेखमाला पाहून उत्सुकता चाळवली. हा विषय तसा इथे दुर्लक्षितच होता. यंदाच कार्यालयातील ३५ + मित्राने BRM 200 नि 400 पूर्ण केल्या पण 600 हुकली. आपला लेख त्याला जरूर वाचावयास देईन.

आपल्याप्रमाणेच सायकलीच्या किमती बघून बेत पुढे ढकलत होतो. पण या महिन्यातच second hand तरी सायकल घेण्याचा विचार आहे.

आपल्या माहितीसाठी सांगतो, एकदा तरी देकॅथालोन ला चक्कर मारा. आता नाशकात सुद्धा उघडले आहे.

लेखमालेसाठी नि सायकलिंग साठी शुभेच्छा......

धन्यवाद.. डेकॅथलॉन ला नेहमी जाणे होते.

तेथे एकदा "One Minute Fast Cycling" स्पर्धा झाली होती त्यामध्ये माझा दुसरा नंबर आला. :)

विलासराव's picture

13 Sep 2014 - 2:09 pm | विलासराव

माझ्या डोक्यात हे खुळ आलय हे तुम्हाला कसं समजलं मोदकशेठ?
मला पण आपलं म्हणा.
आनी आवाज द्या.
पन आमच्याकडे अजुन सायकल नाही,इथुन सुरवात आहे. पण वांदा नाय आपल्या डोसक्यात एकदा बसलं ना मग आपण ते करणारच. फक्त योग्य मार्ग्दर्शन तुम्ही करा म्हणजे झालं.

आमची आजची प्रेरणा ही पहा:
http://www.loksatta.com/vruthanta-news/a-cycle-journey-from-panvel-to-si...

शिद's picture

15 Sep 2014 - 8:07 pm | शिद

८ वी ते १० वी शाळेत 'टेक्निकल' विषय होता पण त्याचे वर्ग शाळेपासून ३-४ किमी. लांब होते मग त्यावेळी रु. १५००/- ला एक नविन सायकल विकत घेतली होती. ती सायकल जवळजवळ ७-८ वर्षे मजबूत वापरली पण नंतर हळूहळु वापर कमी होऊ लागल्यामूळे विकली.

पहील्या परदेशवारीत सायकल चालवण्याची पुन्हा संधी मिळाली व ठरवलं की भारतात गेलो की पुन्हा नविन सायकल विकत घ्यायची. घरी आल्यावर मस्त नविन सायकल विकत घेतली, अगदी २ र्‍या फोटोत दाखवल्याप्रमाणे (फक्त तिला गिअर्स नव्हते).

वडील सकाळी ऑफिसला जाताना स्टेशनपर्यंत सायकल घेऊन जायचे व येताना मी घरी घेऊन यायचो. विकांताला किरकोळ कामं करण्यासाठी, कंटाळा आला की पाय मोकळे करण्यासाठी, नविन-नविन रस्ते शोधण्यासाठी (हि माझी आवड) इ. कारणांसाठी सुद्धा आम्ही ती सायकल १-२ वर्षे भरपूर वापरली.

एका सकाळी वडीलांनी नेहमी प्रमाणे नेहमीच्या जागेवर सायकल लॉक करुन ठेवली होती पण संध्याकाळी सायकल गायब झाली होती. कुठल्यातरी हरामखोराने (भरपूर शिव्या येत आहेत आता लिहीताना पण...) नविन सायकल दिसली म्हणून १५०-२०० सायकलींमधून बरोबर आमचीच सायकल चोरून नेली होती.

सगळीकडे शोधून व पार्कींगवाल्याला विचारुन देखील काहीच उत्तर मिळलं नाही तेव्हा पोलिसांत रीतसर तक्रार केली पण आजतागायत आमची सायकल मिळाली नाही व बहूतेक कधीच मिळणार नाही.

ह्या असल्या प्रसंगामूळे आता नविन सायकल विकत घ्येण्यास मन धजावत नाही व घरचे देखील परवानगी देणार नाहीत. :(

सध्या तरी माझ्या घोड्याची मुरगळलेली मान ठीक करुन थोड्या अंतराच्या राईडस करतोय. तेव्हा लवकरच शक्य असेल, तेव्हा पुढील कार्यक्रम सुरु करेन.

अनिरुद्ध.वैद्य's picture

14 Apr 2015 - 5:47 pm | अनिरुद्ध.वैद्य

चढ आल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त दम लागणे, सायकलचा स्पीड वाढवता न येणे, साध्या उतारावरही पेडल्सची क्षमता संपणे वगैरे वगैरे. आता कोणत्या प्रकारची सायकल घ्यावी याच्या संकल्पना स्पष्ट होत होत्या.

आजकाल ह्या स्टेपपोतूर आलोय. बाकी लोअर बैकचा थोडासा इश्यू जाणवला होता. त्याव्यतिरिक्त सगळ झकास.

मोदक's picture

14 Apr 2015 - 5:56 pm | मोदक

अभिनंदन!!!!

अनिरुद्ध.वैद्य's picture

16 Apr 2015 - 4:23 pm | अनिरुद्ध.वैद्य

धन्यवाद

मोदक's picture

14 Apr 2015 - 5:57 pm | मोदक

बादवे - फोटो मलाच दिसत नाहीयेत का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 6:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटो दिसतं नाहीत धाग्यामधले.

श्रीरंग_जोशी's picture

14 Apr 2015 - 6:54 pm | श्रीरंग_जोशी

माझाही गणेशा झालाय.

पहिला फोटोचा दुवा चेपूचा दिसतोय. शेअरींग काढून टाकले आहेस का? कदाचित इतर कुणाच्या पेजवरून दुवा दिला होता का?

नाय वो... काहीही बदलले नाहीये! :(

पुन्हा अपडेट करावे लागणार. जाम ञासदायक प्रोसेस करावी लागेल.

अक्षया's picture

15 Apr 2015 - 12:47 pm | अक्षया

मस्तच !

डॉ श्रीहास's picture

1 Sep 2016 - 11:13 pm | डॉ श्रीहास

फोटो अपडेटवले आहेत.. दिसत आहेत का?