विडंबन : सफरचंद
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
विडंबन - सफ़रचंद
मूळ कविता - सफ़रचंद
कवी - संदीप खरे
संदीप् खरे यांची माफ़ी मागुन...........
प्रोग्रामरने फ़क्त कोडिंग करायची असते,
करायाची नसते काळजी आजुबाजुला सोबती असण्याची नसण्याची
डेडलाईन आली कळतक्षणीच सारा कोड गोळा करुन रिलीज करायचा असतो
प्रोग्रामरने फ़क्त कोडिंग करायची असते
मग तो कोड बघुन पी.एम. ला तुझी स्तुती सुचू देत ना सुचू दे
पी.एम. चे नशिब वेगळे आणि प्रोग्रामरचे नशिब वेगळे असते ,
पी.एम.गत त्याने इन्क्रिमेंट वगैरे मागयचे नसते
प्रोग्रामरने फ़क्त कोडिंग करायची असते
करायचा नसतो विचार की इन्टिजर चे फ़्लोट मध्ये कसे रुपांतर होते ,
किंवा कोड मधे बग्स् ही अंगभूत असतात ,
आपल्याला नियम माहित असोत वा नसोत संगणक माञ नियमानुसारच चालतो
जर प्रोग्रामर असेल तर त्याने कोडिंग करायाचे असते,
संगणक असेल तर त्याने ते रन करयाचे असते
प्रोग्रामरने फ़क्त कोडिंग करायची असते
प्रोग्रामरलाही असतिल कि स्वप्ने की आपण सुद्धा पी. एम. बनावे ,
आणि झेलावे प्रोग्रामरने आपल्याला सतत,
पण एकेक असे पिकले स्वप्न अशे वेळीच डेठाशी खुरडायचे असते
अन् कामकाज असो वा सुटी , दिवस असो वा राञ ,
डेडलाईनच्या आधीच कोडिंग पुर्ण करयचे असते
प्रोग्रामरने फ़क्त कोडिंग करायची असते
वाचने
4201
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
खुप मस्त
In reply to खुप मस्त by alkeshb22
धन्यवाद
In reply to धन्यवाद by मी असाकसा वेगळ…
च्यायला
मजा आली
In reply to मजा आली by स्वानन्द
धन्यवाद
नाही कळले.
नॉट सो फनी