क्रांतिकारी जगपालट घडवून आणणार्या व्यापारी कंपन्या
क्रांतिकारी जगपालट घडवून आणणाऱ्या व्यापारी कंपन्या
माणूस भटकी जीवनावस्था सोडून एका जागी राहू लागला, शेती करू लागला. शेतीतून मिळवलेल्या अन्नाची साठवण केल्याने रोजची पोटासाठीची वणवण थांबली. मोकळा वेळ आणि साठवलेल्या अन्नामुळे सौदा करण्यासाठी आलेली ताकद कशी वापरावी याबाबत मानवाच्या सुपीक मेंदूने विचार सुरू केला नसेल तरच नवल. किंवा तसा विचार अगोदर केला म्हणून अन्नाची शेती आणि साठवण करण्याची गरज त्याला पडली असेल. कारण प्राचीन मानवांत प्रथम शेती आणि त्यामुळे एका जागेवर वस्ती असाच क्रम दर ठिकाणी होता असे दिसत नाही. काही ठिकाणी भटकत असताना योग्य ऋतूत थांबून शेती आणि परत भटकंती असाही क्रम दिसतो. तर काही ठिकाणी एका जागेवर वस्ती आणि आजूबाजूच्या काही किलोमीटरच्या वनस्पती-प्राण्यांनी समृद्ध जागेवरून रोजचे खाणे आणणे असाही दिनक्रम असल्याचे दिसते. थोडक्यात, भटके जीवन ते भूभागाला जोडलेली स्थिर संस्कृती असा मानवाने केलेला प्रवास आहे एकाच दिशेने होता असे दिसत नाही. त्यांत अनेक फाटे आणि उलटसुलट होत गेलेली आहे. दर वेळेला असलेल्या परिस्थितीत जी जीवनपद्धती मानवाला जास्त फलदायी वाटली तिचा तो स्वीकार करत गेला. पण एकदा शेती हे मोठे जीवनसाधन झाले वर्षाच्या केवळ काही महिन्यांच्या श्रमाने साठवलेल्या अन्नाच्या संचयाची ताकद मानव आपल्या बुद्धिचातुर्याने सर्व वर्षभर वापरून जास्तीत जास्त फायदा कसा कमावता येईल याचा विचार करू लागला. अन्नाच्या बदल्यात इतरांच्या कला, बुद्धी, श्रम आणि वस्तूंवर काही काळासाठी अथवा कायमचा हक्क मिळवता येतो हे त्याच्या ध्यानात आले. अन्नाचे वर्षानुवर्षे उत्पन्न घेण्यासाठी आपल्या सुपीक जमिनीवर आपला हक्क कायम करणे, तिचे रक्षण आणि तिच्यापासून सतत उत्तम उत्पन्न घेणे यासाठी कराव्या लागणार्या प्रत्येक कामात प्रवीण असलेल्या माणसांची गरज निर्माण झाली... किंबहुना अशी जमीन, अशी विचारप्रणाली आणि असे प्रावीण्य जिथे निर्माण झाले तेथेच मानवी संस्कृती रुजली, विकसित झाली आणि जमिनीला चिकटून स्थिर झाली. अश्या तर्हेने अजमावणी आणि चुका (trial and error) करत मानव गावे-शहरे-राज्ये-साम्राज्ये उभारू लागला. अन्नाच्या वस्तूविनिमयाने (barter) स्थानिक व्यापाराला सुरुवात झाली असली तरी ती पद्धत फार ताणता येणार नाही... विशेषतः मोठ्या अंतरावरचा व्यापार करायचा असल्यास... हे चतुर मानवाच्या लवकरच ध्यानात आले असणार. मग त्याने अन्नाव्यतिरिक्त इतर गोष्टींत किंमत / मोल / मूल्य शोधणे सुरू केले असणार... किंवा मोलाच्या वाटणार्या वस्तू व्यापारात मोल मोजण्यासाठी वापरायला सुरुवात केली. त्या वस्तू घेऊन काही किलोमीटर पासून सुरुवात करून हळूहळू काही हजार किलोमीटर ओलांडून जायला, अगदी जगाला अर्ध/पूर्ण प्रदक्षिणा घालायला, मानवाने कामी केले नाही. प्रसंगी असंख्य चलाख्या केल्य, लढाया केल्या, नीतिमत्ता गुंडाळून ठेवली, पण आपला कार्यभाग साध्य केला. या सगळ्या देवाणाघेवाणीच्या प्रवासाला थोडक्यात व्यापार (commerce) असे म्हणता येईल. मानवाचा बर्यापैकी माहीत असलेला इतिहास सांगतो की या व्यापारानेच मानवी जगात वेगाने बदल होत गेलेले आहेत. जसजसे मानवी जग पुढे जात आहे तसतसा त्याच्यावरचा व्यापाराचा प्रभाव अधिकाधिक प्रमाणात वाढत गेला आहे आणि तो तसाच वाढत जाणार आहे हेही तितकेच खरे. सुरुवातीचा व्यापार एखाद्या चलाख एकांड्या शिलेदाराने सुरू केला असला तरी जसजशी त्याची व्याप्ती वाढू लागली तशी त्याचे व्यवस्थापन करण्याची गरज पडू लागली... आणि मग ते व्यवस्थापन वाढत वाढत जी संघटना निर्माण झाली तिला आपण सर्वसाधारणपणे कंपनी म्हणतो. कंपन्यांची व्याप्तीही वाढत वाढत काही कंपन्या इतक्या मोठ्या झाल्या की त्यांची उलाढाल अनेक देशांच्या वार्षिक सकल उत्पन्नापेक्षा (GDP) जास्त झालेली आहे. गेल्या काही शतकांत अश्या काही कंपन्यांचा प्रभाव केवळ त्यांच्या भागधारकांचे भवितव्य उजळण्यापुरता मर्यादित न राहता त्यांनी जगाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात प्रचंड उलथापालथ घडवून संपूर्ण जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. गेल्या काही शतकातील अश्या काही कंपन्यांची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत...या लेखातील सर्व चित्रे जालावरून साभार घेतलेली आहेत. येथे दिलेली कंपन्यांची चिन्हे ही त्यांची खाजगी मालमत्ता आहे. तसेच ही सर्व माहिती जालावरून संकलित केली आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
१. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी (The British East India Company)
ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचे चिन्ह
ब्रिटिश इंडिया साम्राज्य
कंपनीचे चहापुराण
१८२० च्या दशकापर्यंत चहा केवळ चीनमध्येच पिकविला जात असे. चिनी लोकांनी आपल्या चहाच्या एकाधिकाराचे शेकडो वर्षे मोठ्या खबरदारीने रक्षण केले होते. चहाच्या व्यापाराशी संबंधित घडामोडींचे कंपनीच्या व्यवहारांवर आणि भवितव्यावर दुरगामी परिणाम झाले. त्यापैकी तीन प्रसंग थोडक्यात पाहणे रोचक ठरावे.
कंपनीने केलेली चहाची चोरी
चहाच्या शेतीचे गुपीत कंपनीने कसे चोरले याबद्दल दोन प्रवाद आहेत. एका कहाणीप्रमाणे कंपनीने रॉबर्ट फॉर्चुन नावाच्या वनस्पतिशास्त्रज्ञाला कामावर घेतले. तो दूरवरच्या प्रांतातला चिनी नागरिक असल्याचे ढोंग घेऊन एका चिनी दुभाषाबरोबर चीनमध्ये गेला. परतताना त्याने चहाची उत्तमोत्तम २०,००० रोपे बरोबर आणली. ती वापरून दार्जिलिंगाला जगातल्या सर्वोत्तम चहा उत्पादक क्षेत्रांपैकी एक बनवले गेले. दुसर्या गोष्टीप्रमाणे कंपनीच्या इंडियन मेडिकल सर्विसमध्ये काम करणार्या डॉ कँपबेल नावाच्या सिविल सर्जनची १८३९ मध्ये नेपाळमधिल काठमांडूहून दार्जिलिंग येथे बदली झाली. तेथे त्याने चीनमधून चोरलेले बियाणे वापरून वापरून प्रायोगीक तत्वावर चहाची (Camellia Sinensis) लागवड केली आणि ती यशस्वी झाली. १८५० पर्यंत दार्जिलिंगमध्ये चहाचे व्यापारी तत्वावर उत्पन्न सुरू झाले होते. आजही दार्जिलिंगच्या चहाच्या मळ्यांमुळे भारत जागतिक स्तरावरचा एक मुख्य चहा उत्पादक देश आहे.
अफू युद्धे
युरोपातील धनिकांमध्ये चहाला खूप मागणी होती आणि ते त्यासाठी मोठी किंमत मोजायला तयार होते. चहाच्या वस्तूविनिमयाच्या व्यापारात इंग्लंडमधील चांदी कमी होऊ लागली म्हणून कंपनी भारतात पिकणार्या अफूचा उपयोग चीनमधील चहा विकत घेणास करू लागली. चिनी लोकांत पसरणार्या अफूच्या भयानक व्यसनामुळे चीनच्या सम्राटाने या प्रकारच्या व्यापाराला विरोध केला. तरीही त्यातून होणार्या मोठ्या फायद्यामुळे कंपनीने आपला अवैध धंदा चालूच ठेवला. त्यामुळे चीन व कंपनीमध्ये जी दोन युद्धे (१८३९-१८४२ आणि १८५६-१८६०) झाली ती अफूयुद्धे या नावाने प्रसिद्ध आहेत. त्याकाळात चिनी साम्राज्यात आणि राजदरबारात माजलेल्या बेदिलीमुळे या दोन्ही युद्धात कंपनीचा विजय झाला आणि झालेल्या तहांअन्वये कंपनीला सबळ शिरकाव मिळाला, चिनमध्ये अफूचा व्यापार करण्यास व चिनच्या भूमीवर वखारी स्थापन करण्याची परवानगी मिळाली.
बोस्टनची चहा पार्टी
नावात 'इस्ट इंडिया' हे शब्द असले तरी या कंपनीच्या हस्तक्षेपाचा आवाका भारतीय उपखंड अथवा आशियापुरता मर्यादित राहिला नाही.
अठराव्या शतकाच्या मध्यानंतर या कंपनीला आर्थिक संकटातून जावे लागले. ब्रिटनमधल्या गोदामात ठेवलेल्या अनेक दशलक्ष टन चहाचे काय करायचे हा यक्षप्रश्नही समोर होताच. मग या कंपनीने ब्रिटिश संसदेवर दबाव आणून १७७३ साली "चहा कायदा (Tea Act)" मंजूर करून घेतला. या कायद्यान्वये कंपनीला ब्रिटनमधील चहा अमेरिकेत "ड्यूटी फ्री निर्यात" या स्वरूपात "डंप" करण्यास परवानगी आणि त्याचबरोबर ब्रिटिश सरकारला अमेरिकेत स्थानिक कर लावण्याची मुभा कायदेशीर केली गेली. यातील राजकारण असे की, कंपनीचा चहा विनाकर अमेरिकेत गेल्याने कंपनीचा आर्थिक फायदा व्हावा आणि ब्रिटनचा अमेरिकन वसाहतींत कर जमा करण्याचा हक्क कायम राहून तेथील ब्रिटिश अधिकार अधोरेखीत व्हावा. मात्र हे अमेरिकेतल्या तेरा वसाहतींच्या पुरेपूर ध्यानात येऊन त्यांनी या कायद्याचा व त्या अन्वये होणार्या चहावितरणाचा कडाडून विरोध केला. याची परिणती प्रसिद्ध "बोस्टन टी पार्टी" आणि नंतर अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध पेटण्यात झाली. अश्या तर्हेने एकाप्रकारे कंपनीने आपल्या फायद्यासाठी ब्रिटिश साम्राज्याचेही नुकसान केले.
आपल्या कारवायांनी पूर्वेकडील भारत-चीन यांच्यापासून पश्चिमेकडील अमेरिकेपर्यंत आर्थिक व राजकीय कायापालट घडवून आणणारी दुसरी कंपनी आजपर्यंत झाली नाही आणि भविष्यात होईल असे वाटत नाही.
त्यामुळे या यादीतला ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला क्रमांक नक्कीच अविरोध मानला जातो.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
आता यानंतर अजून काही कंपन्यांची ओळख आपण करून घेणार आहोत. त्यांच्या क्रमवारीबद्दल निवडलेल्या निकषांप्रमाणे बदल असू शकेल. पण त्यांनी जगात क्रांतिकारी बदल घडवून आणल्याबद्दल दुमत असू नये.
२. ओटिस (Otis Elevator Company)
ओटिसचे चिन्ह
३. स्टॅंडर्ड ऑइल (Standard Oil)
स्टॅंडर्ड ऑइलचे चिन्ह
४. AT&T
AT&T चे चिन्ह
५. जनरल इलेक्ट्रिक (General Electric; GE)
जनरल इलेक्ट्रिकचे चिन्ह
६. फोर्ड मोटर कंपनी (Ford Motor Company; Ford)
............
फोर्डची चिन्हे : १९०३ सालचे आणि २००३ पासून पुढे
In reply to माहितीपूर्ण तरीही रंजक लेख by अजया
In reply to माहितीपूर्ण तरीही रंजक लेख by अजया
In reply to एक्का साहेब... by अर्धवटराव
In reply to एक्का साहेब... by अर्धवटराव
In reply to भारी लेख! by साती
ईस्ट ईंडियासारखं 'व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते झाले' असं दुसरं कुठलं उदाहरण आहे का?
सगळ्याच युरोपियन देशांचा जगभर शिरकाव प्रथम त्या देशांच्या व्यापारी कंपन्या म्हणूनच झाला. कंपन्यांचा मूळ उद्देश इतर देशातील राजसत्तांबरोबर व्यापारी करार करून आर्थिक फायदा कमावणे हाच होता. नंतर स्थानिक लोकांतील उणिवा आणि दुफळी यांचा फायदा घेउन राजकिय सत्ताही हस्तगत करणे जास्त फायद्याचे आहे हे चलाख व्यापार्यांच्या ध्यानात आले. राजसत्ता हाती घेतल्याने स्थानिक लोकांबरोबर कोणताही करार न करता १००% व्यापार आपल्या हातात घेणे आणि "कायदेशीर" लुटालूट करणे त्यांना शक्य झाले.
कंपन्या मोठ्या झाल्यावर इतका मोठा फायदेशीर भूभाग खाजगी मालकीत ठेवणे त्यांच्या देशांतील राजसत्तांना गैरसोईचे वाटू लागले. याची मुख्य कारणे म्हणजे कंपन्याची फायदा कमावण्यासाठीची बेबंद/जुलूमी कामे ज्यामुळे देशाची होणारी नाचक्की आणि शिवाय त्यामुळे देशात येणार्या संपत्तीच्या प्रचंड ओघाला दूरकालावधीत (लाँग टर्म) होऊ शकणारा धोका. यामुळे, त्या त्या देशांच्या सरकारांनी कंपन्यांच्या भूभागावर कब्जा केला आणि त्यांना गुलाम राष्ट्रांत परावर्तीत केले.
युरोपियन कंपन्यांची उदाहरणे (कंसात त्यांच्या वसाहतींचे प्रदेश):
१. डच इस्ट इंडिया कंपनी : (इंडोनेशिया);
२. फ्रेंच इस्ट इंडिया कंपनी: ही सुरुवातीला स्थापन केलेल्या Compagnie de Chine; Compagnie d'Orient आणि Compagnie de Madagascar या तीन कंपन्यांचे विलिनिकरण करून बनली (दक्षिणपूर्व आशिया : व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस) : फ्रेंच कंपनीने भारतातही हातपाय पसरायचे प्रयत्न केले हे आपल्या इतिहासात येतेच. पण तिचा दूरगामी प्रभाव पाँडेचेरीपुरताच मर्यादित राहिला.
३. पोर्तुगिज इस्ट इंडिया कंपनी : (भारतातील गोवा, चीनमधिल मकाव) : हिचे आयुष्य मायदेशातील फारच राजकिय बदलांमुळे फरच तोकडे ठरले. पहिला युरोपियन वास्को-द-गामा भारतात पोर्तुगिज व्यापारी म्हणूनच आला होता.
४. स्विडिश इस्ट इंडिया कंपनी : १७३१ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी तिच्या सुवर्णकाळात स्वीडनमधिल सर्वात मोठी कंपनी होती. पण इतर युरोपियन कंपन्यांपुढे तिच निभाव लागला नाही आणि ती १७१३ मध्ये बंद पडली.
५. जर्मन इस्ट आफ्रिका कंपनी : (तान्झानिया बुरुंडी रुआंडा); इत्यादी.In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काका कृ लेखमाला लिहिणे. by आदूबाळ
In reply to काका कृ लेखमाला लिहिणे. by आदूबाळ
या सगळ्यात भारतीय म्हणून अभिमानाची गोष्ट म्हणजे फोर्डच्या "जग्वार" आणि "लँड रोव्हर" या दोन जागतिक स्तरावर मानाच्या समजल्या जाणार्या ब्रिटिश उपकंपन्या टाटा मोटरने २००८ साली २.३ बिलियन डॉलर्सला विकत घेतल्याहे वाचल्यावर सकाळ मधल्या संदीप वासलेकरांच्या लेखाची आठवण झाली. त्यांचा मतांना लोकं किती गांभिर्याने घेतात माहित नाही पण मला आवडतात आणि पटतात. हा लेख मुद्दाम वाचण्यासारखा आहे. त्यातत्याच दोन ओळी. "जग चौथ्या औद्योगिक क्रांतीवर स्वार होऊन प्रचंड वेगानं पुढं चालल्याचं आपण केवळ "नातीगोती‘, "जातीपाती‘ असा जप करत पाहत राहणार? आणि फक्त चकचकीत मॉल, सॉफ्टवेअर कर्मचारी व जगानं फेकलेले जुने उद्योग उभे करून "भारत महासत्ता झाली‘ असं भाबड्या राष्ट्रप्रेमी लोकांना सांगून त्यांची फसवणूक करणार?"
In reply to मस्त लेख! by दादा कोंडके
जगानं फेकलेले जुने उद्योग उभे करून "भारत महासत्ता झाली‘ असं भाबड्या राष्ट्रप्रेमी लोकांना सांगून त्यांची फसवणूक करणार?"
ज्याचे त्याचे मत ! :)
१. "जग्वार" आणि "लँड रोव्हर" हे केवळ जागतिक स्तरावरचे ब्रँडच नाही तर "ब्रिटनचे नाक" समजले जाणार्या कंपन्या आहेत. जग्वार गाड्या इंग्लंडची राणी, ब्रिटिश पंतप्रधान, इत्यादींनी वापरणे हा आजही ब्रिटिश मानदंड समजला जातो.
२. १९८९ मध्ये जग्वार कंपनी फोर्ड या अमेरिकन कंपनीला विकणे हे ब्रिटिशांना अत्यंत मानहानीचे वाटले होते.
३. रोव्हर गृप प्रथम बी एम डब्ल्यू ने विकत घेतला, नतर तो फोडून त्यातला लँड रोव्हर हा भाग २००६ मध्ये फोर्डला विकला, हा इतिहास "ग्रेट" ब्रिटनच्या व्यापारी इतिहासातला नामुष्कीचा प्रकार समजला जातो.
४. फोर्डने खूप प्रयत्न करूनही या दोन्ही कंपन्या तिच्या अधिकारात असताना कधीच £१ च्या सुद्धा फायद्यात येउ शकल्या नाही.
५. शेवटी फोर्डने हे दोन्ही कंपन्या विकण्याचा निर्णय घेतला. या कंपन्या चालविण्यात ब्रिटिश आणि अमेरिकन अनेक दशके अयशस्वी झाले असले तरी या कंपन्या टाटा मोटर्ससारख्या भारतिय (आपली पूर्वीची वसाहत आणि त्यावर एका थर्ड वर्ल्ड कंट्री मधिल) कंपनीच्या हाती जाऊ नये म्हणून अनेक काड्या केल्या गेल्या. पण शेवटी टाटा मोटर्सने त्या दोन्हीही कंपन्या २००८ मध्ये २.३ बिलियन डॉलर्स किमतीला हस्तगत केल्या. तेव्हा "टाटा मोटर्सने आपल्या पूर्वीच्या कोलोनियल मास्टर्सचे नाक कापले" असे विषादाने आणि कुत्सितपणे म्हटले गेले, इतका त्या ब्रँडचा ब्रिटिश व्यापारी जगतात आणि जनमानसामध्ये प्रभाव होता.
६. जागतीक मंदीच्या काळात ब्रिटिश सरकारने अनेक उद्योगांना मदत केली पण टाटा मोटर्सला मानहानीकारक (बहुतेक ५० मिलियन पौंड) मदत देऊ केली. रतन टाटा यांनी ती सार्वजनिक पद्ध्तीने नाकारून ब्रिटिश सरकारला धक्का दिला.
अश्या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सच्या अधिपत्त्याखाली जग्वार लँडरोव्हरने खालिल प्रगती दाखवली आहे...
२०११ : इतर उद्योगधंद्यांत कामगार कपात चालू असताना...
अ) मार्चमध्ये १५०० + नोव्हेंबरमध्ये १००० नविन कामगार भरती
आ) £२ बिलियनचे इतर पुरवठा (सप्लायर) कंपन्याबरोबरचे करार
इ) £२५५ मिलियनची कंपनीतली नविन गुंतवणूक
२०१२ : इतर उद्योगधंद्यांत कामगार कपात चालू असताना...
अ) १००० नविन कामगार भरती आणि २४ तास-तीन शिफ्टमध्ये काम चालू
आ) चीनमधील चेरी कंपनीने US$२.७८ बिलियन गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली
ई) पुढच्या ५ वर्षांत ४५०० नविन जागा भरण्याची घोषणा
२०१३ :
अ) १७०० नविन कामगार भरती
आ) £१.५ बिलियनची कंपनीतली नविन गुंतवणूक
इ) १९१५ मध्ये रस्त्यावर येणार्या नविन फुचुरिस्टीक मॉडेल्सची घोषणा
ई) अनेक विद्यापिठांशी संबंध प्रस्थापित
२०१४ :
अ) मान्यवर वॉल स्ट्रीट जर्नलने जग्वार लँडरोव्हरने ४२५,००६ आलिशान गाड्या विकल्याचे प्रसिद्ध केले.
जगभर मंदी चालू असताना आणि अनेक दशके बुडित खात्यात असलेली ही कंपनी टाटा मोटर्सने केवळ वर्षा दोन वर्षांत फायदा कमावणारी कंपनी बनविली आहे. तिची प्रसिद्ध झालेली आर्थिक स्थिती अशी आहे :
वर्षअखेर..............उलाढाल........फायदा/(तोटा)
३१ मार्च २०१३.......१५,७८५...........१,२१५
३१ मार्च २०१३.......१३,५१२...........१,४८१
३१ मार्च २०११........९,८७१...........१,०३६
३१ मार्च २०१०........६,५२३..............२४
३१ मार्च २००९........४,९४९............(४०२)
(आकडे मिलियन ब्रिटिश पौंडांमध्ये आहेत)
टाटा मोटर्सच्या या कामगिरीमुळे पूर्वी भेदभाव करणार्या ब्रिटिश सरकारने या वर्षीच्या सुरूवातीला रतन टाटा यांना Knight Grand Cross हा ब्रिटनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविले आहे.
आता या पार्श्वभूमीवर सुरुवातीला उद्धृत केलेले वाक्य तपासून पहिले तर वेगळे मत होईल असे वाटते.
माझ्या अल्प अनुभवावरून माझे सर्वसाधरण असे मत झाले आहे:
१. कुठल्याही सधन देशात गेल्यावर आपण त्यांचापे़क्षा (दोन पटींने किंवा जास्त) सरस आहोत हे सिद्ध केल्याशिवाय त्यांचे आपल्याबद्दलचे चुकीचे समज बदलत नाहीत आणि आपल्याला योग्य तो मान मिळत नाही. फक्त आपल्या आपले / आपल्या देशाचे गुणगान गाण्याने हे शक्य तर होते नाहीच, पण उलट आपण/देश चेष्टेचे कारण बनतो. त्यासाठी दुसर्यांनी आपले गुणगान करावे असे काही करावे लागते.
२. परदेशात जाउन झेंडा फडकावणे हे येरागबाळ्याचे काम नाही आणि ते वैयक्तीक आणि व्यापारी तत्वावर केल्याशिवाय कोणत्याही देशाची पत जगात सुधारत नाही. या संदर्भात टाटा मोटर्सचे नाव अग्रगण्य आहे.
३. भारतियांचे पाय ओढण्यात भारतियांना मागे टाकेल असा दुसरा समाज दिसणे विरळा आहे. In reply to जगानं फेकलेले जुने उद्योग उभे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हम्म.. by दादा कोंडके
In reply to तुमचा प्रतिवाद करण्यासाठी ही by डॉ सुहास म्हात्रे
In reply to "रिव्हर्स कोलोनायझेशन" थोडी घाई होईल by सुधीर
In reply to हे ही खरे आहेच म्हणा ! ती by डॉ सुहास म्हात्रे
In reply to टाटांना ( फक्त ) भारतीय मानणे by प्रसाद१९७१
In reply to टाटांना ( फक्त ) भारतीय मानणे by प्रसाद१९७१
In reply to जगानं फेकलेले जुने उद्योग उभे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मस्त लेख! by दादा कोंडके
In reply to लेखातल्या बाकी कंपन्या माहित by विलासराव
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हा हा हा by विलासराव
In reply to आणी हो..... by विलासराव
In reply to आवो सायेब, प्रतिसादाच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सुंदर लेख काका. by धन्या
In reply to अतिशय by नितिन थत्ते
In reply to मलाही असंच वाटतंय. पहिली by आदूबाळ
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to उत्तम सुरुवात by श्रीरंग_जोशी
In reply to लेख आवडला by विटेकर
In reply to लेख आवडला by विटेकर
In reply to जबरदस्त लेख. by प्रचेतस
In reply to खुपच माहितीपूर्ण लेख. सविस्तर by शिद
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!In reply to सुरेख लेखन ! by मदनबाण
अश्या तर्हेने ही जगातली पहिली मर्यादित दायित्व असलेली कंपनी (Limited Liability Corporation; LLC) स्थापन झाली.याठिकाणी एक सुधारणा करु इच्छितो. त्यावेळी कंपनी कायदा अस्तित्वात नसल्यामूळे राजाच्या किन्वा राणीच्या सनदेने स्थापन केल्या जात. त्यांना चार्टर्ड किंवा सनदी कंपनी म्हटले जाते. सनदी कंपनीची आणखी उदाहरणे म्हणजे स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, स्क्वेप सोडा कंपनी इ. सनदी कंपन्या या मर्यादित जबाबदारीच्या कंपन्या म्हणता येउ शकत नाहीत. जशा स्वातंत्र्योत्तर काळात संसदेत कायदे संमत करुन कंपन्या स्थापन केल्या त्यांना गव्हर्नमेंट कंपनी किन्वा सरकारी कंपनी असे म्हटले जात असे. उदा. एल्.आय्.सी., स्टेट बँक ऑफ इंडिया वगैरे. बाकी याचा मूळ विषयाशी संबंध नाही. बाकी लेख मस्त.....
In reply to एक सुधारणा.. by विक्रान्त कुलकर्णी
In reply to एक सुधारणा.. by विक्रान्त कुलकर्णी
In reply to त्रिमूर्ती by रमेश आठवले

माहितीपूर्ण तरीही रंजक लेख