मराठी तरुणांसाठी नोकरी-उद्योग देणारा वेबमंच
लेखनप्रकार
मराठी तितुका मेळवावा. महाराष्ट्र धर्म वाढवावा
सध्याच्या काळात मराठी तरुणांसाठी रोजगार हा ज्वलंत प्रश्न बनल्याचे दिसते आहे.
ही नाराजी ग्रामीण व शहरी अशा दोन्ही स्तरावर जाणवते आहे. बर्याचदा आपण आपल्या नोकरी / व्यवसायाच्या निमित्ताने खुल्या झालेल्या जागा दिसतात; पण तुमच्या परिचयाचा कोणी उमेदवार माहिती नसल्याने ही संधी लायक व गरजु तरुणांपासुन वंचित राहते.
मिपावर आपण आपली भाषिक/सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी येथे येतो. अप्रत्यक्षपणे येथे नेटवर्क तयार होते. याच संघशक्तीचा ताकदीतुन आपण बेरोजगार तरुण-तरुणींना मदतीसाठी एखादा वेबमंच (Internet Forum) उभारु शकतो काय ?
नोकरी.कॉम किंवा इतर स्थळांपेक्षा महाराष्ट्रातल्या सामान्य तरुणांच्या गरजा भागवणारा - सोयी / माहिती/ मार्गदर्शन पोहचवणारे स्थळ हा यामागचा उद्देश आहे. हा वेबमंच दादर(प) व आंबेगाव(खुर्द) या दोन्ही ठिकाणच्या मराठी युवकास उपयोगी असावा.
माहितीच्या युगात विदा/माहिती म्हणजेच पैसा हे समिकरण आपण समजतो. तुमच्याकडे असलेली एखादी क्षुल्लक माहिती कदाचित इतरांचे आयुष्य बदलु शकते. हे आदानप्रदान आपण करु शकु काय ?
नोकरी पुरते मर्यादित न राहता शेती वा इतर कोणत्याही व्यवसायाची माहिती पोहचली तर कोणा होतकरु उद्योजकच्या जडणघडणीतही खारीचा वाटा उचलला जाईल.
कोणत्याही स्पर्धा-परिक्षेची माहिती आपल्या नजरेतुन सुटु नये;
स्पर्धा-परिक्षेतल्या यशाच्या टीप्स येथे आपणास शेअर करता येतिल. युपिएसी ची तयारी करणार्या ( किंवा जेथे जेथे ग्रुप स्टडी लागतो) व एका शहरात राहणार्या विद्यार्थ्यांची ओळख होईल.
आपापली क्षेत्रे गाजवलेल्या पण मराठी लोकांस फारसे परिचय नसणार्या मराठी icons ची ओळख येथुन व्हावी . ह्या कहाण्या इतरांची प्रेरणा-गीते ठरतील
बंगळुर मधे कानडी लोकांमधील रोजगाराच्या मागणीला अशी योग्य दिशा देण्यासाठी अशा स्वरुपाची वेब फोरम आहे. अशा स्वरुपाचे काम विधायक पद्धतीने करत आहे. आपण त्याचा रोल मॉडेल म्हणुन विचार करु शकतो.
( http://www.kannadamitra.com/ : हे स्थळ कानडीत आहे. आपणास रस वाटल्यास ध्येय-धोरणे मराठीत प्रकाशित करेन)
महत्वाचे:
हे वैयक्तिक आवाहन असून कोणताही आर्थिक लाभ अपेक्षित नाही. केवळ विधायक व विधीमान्य सूचना कराव्यात.मि.पा. चा केवळ माध्यम म्हणुन वापर केला आहे;
वाचने
14298
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
उत्तम विचार
In reply to उत्तम विचार by मुक्तसुनीत
छान कल्पना आहे...
मलाही
उत्तम सुचना!
खुप उत्तम सुचना...
चांगली कल्पना
खुपच छान विचार आहे.
बायोटेक्नोलॉजी
कम्पनीच
In reply to कम्पनीच by वैदेहि
कंपनीचे
मला ही सविस्तर माहिती द्या.
येथे काही
माझ्या
उत्तम कल्पना
अभिनंदन
उत्तम.
धन्यवाद :)
विधायक पाऊल,
काही सुचना
ईआरपी सॉफ्टवेअर मध्ये संधी
कोणी...
धागा काढतोय वर...
डांगे अण्णा
In reply to डांगे अण्णा by नाखु
खोदकामाचं माझं श्रेय नाही हो,
ही कल्पना आधीही चर्चिली होती.
Please think about this.