मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पैसा येतो आणिक जातो

गंगाधर मुटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पैसा येतो आणिक जातो

पैसा येतो आणिक जातो
मला केवळ मोजायला लावतो
कधी लळा लावतो, कधी कळा लावतो ...॥

कधी चिल्लर, कधी नोटा
लाभ कधी, कधी तोटा
येण्यासाठी दारे कमी
जाण्यासाठी लक्ष वाटा
माणसाच्या वचनाला
पाडतो हा खोटानाटा
येताना हा झुकूझुकू
अन्
जाताना धडधड जातो ...॥

माझी पर्स, माझा खिसा
माझ्या तिजोरीला पुसा
त्यांचे हाल असे जणू
एस टी चा थांबा जसा
बस येते, जरा थांबते
अन्
भर्रकन निघून जाते ...॥

कुणी अभय, कुणी भयभीत
पैसोबाची वेगळी रीत
कुणा देतो मलमली छत
अन्
कुणाला रस्त्यावर आणतो ...॥

                           - गंगाधर मुटे ’अभय’
--------------------------------------------------------

वाचने 2816 वाचनखूण प्रतिक्रिया 7

तिमा Tue, 08/12/2014 - 11:13
कविता वास्तवाचे एक अंग दाखवणारी आहे. पण कधी असंही होतं की, पैसा येतो आणि वाढत जातो वाढताना,जुने धागे तोडतो पैसा येतो, येतच रहातो येताना, माज आणतो पैसा येतो, घर भरतो पण, घरपण घालवतो.