जॉर्डनची भटकंती : ०३ : नेबो पर्वत (Mount Nebo)
...जेराशमध्ये फिरताना देहभान विसरायला झाले. पण तरीही उन्हे उतरू लागली आणि थकलेले पाय हॉटेलवर परतण्यासाठी गाडीकडे निघाले.
तिसरा दिवस जरा लवकरच उजाडला. कारण आज अम्मान सोडून दक्षिणेच्या दिशेने चारचाकीचा ३००-३५० किमी प्रवास करायचा होता आणि तेही वाटेतली पर्यटक ठिकाणे पाहत पाहत. अर्थातच सगळ्यांनी भरपेट न्याहारी केली आणि बाहेर पडलो.
जॉर्डनमधिल जमीन बहुतांशी वाळवंटी असली तरी आजच्या आमच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऑलिव्हची लागवड दिसत होती...
ऑलिव्हची शेती : ०१
ऑलिव्हची शेती : ०२
ऑलिव्ह शेती करणार्या सधन शेतकर्याचे घर : ०१
ऑलिव्ह शेती करणार्या सधन शेतकर्याचे घर : ०२
नेबो पर्ततावरून दिसणारा वाळवंटी परिसर
नेबो पर्वत (Mount Nebo)
तसं पाहिलं तर नेबो हा काही फार उंच पर्वत नाही. पण ८१७ मीटर उंचीच्या या पर्वताला त्याच्या धार्मिक आणि ऐतिहासिक भूतकाळामुळे अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. हाच तो पर्वत ज्याच्यावरून मोझेसला शब्द दिलेली पवित्र जमीन (प्रॉमिस्ड होली लँड, ज्याला सर्वसाधारणपणे आधुनिक इझ्रेल असे संबोधले जाते) दाखवली गेली असा बायबलमध्ये उल्लेख आहे. या पर्वतावरून आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दर्शन होते. त्यात पवित्र जमिनीबरोबरच, उत्तरेकडील जॉर्डन नदीच्या खोर्याचा काही भाग, इझ्रेलमधिल जेरिको शहर आणि जर आकाश निरभ्र असले तर जेरुसलेम शहराचेही दर्शन होते.जेरिको शहर इझ्रेलमध्ये असल्याने त्याला जरी आपण भेट देणार नसलो तरी त्या शहराची काही वैशिष्ट्ये जाणून घेणे मनोरंजक ठरेल
१. हे शहर समुद्रसपाटीपेक्षा २५० मीटर खाली आहे. या प्रकारे हे जगात सर्वात खालच्या स्तरावर वसलेले शहर आहे.
२. १०,००० वर्षांपूर्वीचे मानवी वस्तीचे अवशेष सापडल्यामुळे हे जगातील सर्वात जुने शहर समजले जाते.
३. तेथे असलेल्या अनेक प्राचीन आणि धार्मिक अवशेषांमुळे ते एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे. त्यातली काही महत्त्वाची अशी आहेत जिझस ख्राईस्टचा बॅप्टिझम जेथे केला गेला तो जॉर्डन नदीचा भाग, टेम्प्टेशन पर्वत, एलिशा झरा, सायक्यामोअर वृक्ष, सेंट जॉर्जचे थडगे, इ.
Book of Deuteronomy प्रमाणे मोझेसने नेबो पर्वतावरून इझ्रेलचे दर्शन घेतले पण त्याचे पाय त्या जमिनीला लागू शकले नाहीत. तेथे जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या पुस्तकाप्रमाणे तेथून जवळच मोआबच्या दरीत त्याचे दफन केले गेले. दोन वेगवेगळ्या जागांवर त्याचे थडगे असल्याचे दावे आहेत, पण नक्की सत्य काय ते कोणालाच माहीत नाही. काही विद्वानांच्या मते तर हा पर्वत Deuteronomy मध्ये उल्लेखलेला नेबो पर्वत नाही.
चला तर अश्या काहीश्या वादग्रस्त पण तरीही बरेचसे प्राचीन आणि धार्मिक महत्त्व असलेल्या नेबो पर्वतावर. हे पवित्र स्थान असल्याने, गाडी धार्मिक आवाराच्या बाहेर उभी करून अर्धा अधिक डोंगर पायी चढून जावा लागतो.
चढण पूर्ण झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला पोप जॉन पॉल दुसरा याच्या इ स २००० मधील भेटीच्या स्मरणार्थ उभारलेली शिळा दिसते...
पोप जॉन पॉल दुसरा याच्या भेटीच्या स्मरणार्थ उभारलेली शिळा
मोझेसच्या स्मरणार्थ उभारलेली शिळा
बायझांटाईन चर्च
उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून बनवलेली बायझांटाईन चर्चची प्रतिमा
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०१
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०२
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०३
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०४
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०५
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०६
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०७ : लेख
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०८ : लेख
बायझांटाईन चर्च : ०९ : प्राचीन काळातील मातीची भांडी
बायझांटाईन चर्च : १० : प्राचीन काळातील मातीची भांडी
Brazen Serpent Monument
In reply to हा भागही मस्तच. by प्रचेतस
Brazen Serpent Monument हे सद्याच्या एम बी बी एस डॉक्टरांच्या लोगो सारखे वाटतेय.+१
In reply to सुंदर छायाचित्रे by नेत्रेश
In reply to डिट्टो डिट्टो. by प्यारे१



(सर्व नकाशे जालावरून साभार)
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
येथिल जंगले नाहिशी होऊन वाळवंट कसे बनले याच्याबद्दलच्या सिद्धांताचा महत्वाच्या शास्त्रिय पुराव्यांसह उल्लेख पुढच्या एका भागात येईलच.वाट पाहत आहे. कुणीतरी कुठेतरी म्हटल्याचं आठवतंय, "आधी जंगले असतात. मग मानवी संस्कृती येते. शेवटी उरते वाळवंट."
रोचक..रोचक..सुंदर..सुंदर..!