मन रे .....
लेखनविषय:
भकास सारीपटावर
कुरतडलेल्या स्वप्नांसकट
सीतेच्या नकारालाही
रावणल्यालं मन !
मांगल्याचा ओढीमध्ये
निर्जीव कातळासवे
पदस्पर्शाच्या आभासात
राऊळल्याल मन !
चंचल पाऊसवेळी
कोपर्यावरच्या झाडाखाली
नाजुक बोटाच्यां गुफणीत,
क्षणभर स्थिरावल्याल मन !
शमेना देह तपन
जन्मदुखः अशोकवृक्षाचे
सुखाच्या मृत्युभयाला
वांझोटल्याल मन !
विचारकल्लोळीचा वाकस
एकांती समुद्रस्पर्धेत
विश्वकर्माच्या रंगसंगतीत
माणुसघाण्यावल्याल मन !
सडा रक्तचिखलाचा
तुडविला अनवाणी
सफेद संगमवरावर
डागाळल्याल मन !
वाचने
1867
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
!
रूपके चपखल वाटली नाहीत. बाकी भापो. मस्त!
थोडी गुढ.. पण सुंदर रचना...
येउ द्या अजुन.. *good*
गढुळल्या मनाची गूढ कविता
क्रियापदांच्या बाबतीतला प्रयोग आवडला.
ह्याला चांगलं म्हणावं तरी वाईट आणि नाही म्हणावं तरी...
तुला सरळ लिहीता येत नाय का बे?
!