तुम्ही कोण म्हणून काय पुसता ?... तुम्ही असा... आस्तिक?... नास्तिक? ...???
प्रामाणिक आस्तिक
१. या लोकांचा देव आहे या "संकल्पनेवर" दृढ आणि "प्रामाणिक" "विश्वास" असतो. २. त्यांचा हा विश्वास लहानमोठ्या स्वार्थासाठी नसतो अथवा असाहाय्यतेने किंवा सोयीचा म्हणून घेतलेला पवित्रा नसतो. ३. त्यांचा हा विश्वास त्यांच्यावर वाढत्या वयात झालेल्या कौटुंबिक अथवा सामाजिक परिस्थितीचा परिणाम असू शकतो. चालू असलेल्या संशोधनांत या विश्वासामागे त्या व्यक्तींच्या मेंदूची जडणघडण कारणीभूत असल्याचे शास्त्रीय पुरावे मिळत आहेत. ४. हे लोक: (अ) "माझा विश्वास आहे (I believe)" असे म्हणून डोळे मिटून धर्माने सांगितलेले आचरण करतात आणि / किंवा (आ) परम ज्ञानाच्या उपासनेच्या मार्गाने ज्ञानी होण्याचा प्रयत्न करतात आणि / किंवा (इ) पूजाअर्चा, नामस्मरण, कर्मकांडे इ मार्गांनी देव शोधण्याचा प्रयत्न करतात आणि / किंवा (ई) धर्माच्या मार्गाने ज्ञानी झालो की मुक्ती मिळून परमात्म्यात विलीन होणार असा विश्वास ठेवतात. म्हणजे एकूण या जगात असेपर्यंत आपण अज्ञानीच राहणार हेच एका अर्थाने कबूल करतात. ५. हे लोक देव ही "पुराव्याने सिद्ध झालेली गोष्ट" नसून "ज्यावर विश्वास आहे अशी गोष्ट" आहे असे कबूल करून आणि त्या देवावर बेतलेल्या धर्माला "विश्वास (belief)" असे संबोधून अवधानाने किंवा अनवधानाने "देव म्हणजे नक्की काय?" हे माहीत नाही असेच कबूल करतात. ६. शास्त्रात एक फार महत्त्वाचा दंडक आहे, तो म्हणजे : "एकाच गोष्टीला सिद्ध करण्यासाठी अनेक मान्य (सर्वमान्य नव्हे) सिद्धांत असणे हे ती गोष्ट नक्की कोणालाच माहीत नसल्याचे निदर्शक असते." म्हणजेच त्याबाबतीत आपल्याला कामचलाऊ ज्ञान असले तरी खर्या दृष्टीने आपण अज्ञानीच असतो. देव आणि धर्म ह्या दोन्हीहीबद्दलचे वैविध्यपूर्ण सिद्धांत या नियमात चपखल बसतात आणि मानव जात "देव" या संकल्पनेबद्दल अजूनही अज्ञानी आहे हेच सिद्ध करतात. ७. प्रामाणिक आस्तिक लोकांची संख्या किती हे सांगणं कठीण आहे... पण खूप कमी असते हे नक्की. थोडक्यात : प्रामाणिक आस्तिक लोक "अल्पसंख्य", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात.प्रामाणिक नास्तिक
या गटातिल लोकांचे गुणधर्म खालिलप्रमाणे असतातः १. या लोकांचा देव आहे या "संकल्पनेवर" दृढ आणि "खरोखरच प्रामाणिक" "अविश्वास" असतो. २. त्यांचा हा अविश्वास लहानमोठ्या स्वार्थासाठी अथवा असाहाय्यतेने अथवा सोयीचा म्हणून घेतलेला पवित्रा नसतो. ३. त्यांचा हा अविश्वास त्यांच्यावर वाढत्या वयात झालेला कौटुंबिक अथवा सामाजिक परिस्थितीचा परिणाम असू शकतो. चालू असलेल्या संशोधनांत या अविश्वासामागे त्या व्यक्तींच्या मेंदूची जडणघडण कारणीभूत असल्याचे शास्त्रीय पुरावे मिळत आहेत. ४. हे लोक: (अ) "माझा अविश्वास आहे (I do not believe)" असे म्हणत आस्तिक लोकांच्या म्हणण्याचे खंडन करत असतात. (आ) "देव आहे याचा शास्त्रीय पुरावा नाही" इतकेच त्यांना आपले म्हणणे खरे आहे हे म्हणण्यासाठी पुरेसे वाटते. त्यांचे म्हणणे शास्त्रीय आहे असे म्हणत असतानाच ते म्हणणे शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करायला "देव नाही याचा शास्त्रीय पुरावा" सुद्धा जरूर आहे हा शास्त्रीय नियम ते सहजपणे विसरतात. आस्तिकांनी देवाच्या नावाने दिलेल्या आणि शास्त्रीय पद्धतीने उकल न होऊ शकणार्या सर्व गोष्टींना ते "अंधश्रद्धा" किंवा "याची भविष्यात शास्त्रीय कारणे मिळतील" असे म्हणून झटकून टाकतात. म्हणजे एकूण आपण देवाच्या बाबतीत पूर्णणे ज्ञानी नसल्याचे (पर्यायाने अज्ञानी असल्याचे) कबूल करतात. ५. हे लोक देव ही "पुराव्याने सिद्ध न झालेली गोष्ट" नसून "ज्यावर विश्वास नाही अशी गोष्ट" आहे असे कबूल करून आणि ते स्वत:ला "विश्वास नसणारे (non-believers)" असे संबोधून अवधानाने किंवा अनवधानाने "देव नाही हे नक्की माहीत नाही" असेच कबूल करतात. ६. प्रामाणिक आस्तिक लोकांची संख्या किती हे सांगणं कठीण आहे... पण खूप कमी असते हे नक्की. थोडक्यात : प्रामाणिक नास्तिक लोक "अल्पसंख्य", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात. आतापर्यंत आपण पाहिलेला वर्णपट आणि त्याची दोन टोके खालच्या आकृतीत दाखवली आहेत...
आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०१
धूर्त आस्तिक
या लोकांचे वर्णपटातले स्थान आस्तिक लोकांच्या टोकाजवळ असते. त्यांचे मूळ गुणधर्म असे: १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते. २. परंतू देव या संकल्पनेचा पाठपुरावा करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात. तसे करण्यामुळे त्यांना होणारा फायदा खालील एक किंवा अनेक प्रकारचा असू शकतो: (अ) चरितार्थ चालणे (आ) आर्थिक फायदा (इ) सामाजिक फायदा (ई) राजकीय फायदा, इ. आणि हे हितसंबद्ध त्यांच्यासाठी सर्वोच्च असतात, देवाची भलावण हे केवळ एक साधन असते. ३. या लोकांमध्ये, देव ही संकल्पना (अगदी देवा-धर्माशी संबंध नसलेलाही) स्वार्थ साधण्याचे फार प्रभावी साधन म्हणून वापरण्याची विलक्षण हातोटी असते. मग तसे करताना 'देव', 'धर्म' आणि 'त्या देवा-धर्माची तत्त्वे' यांना चलाखीने हरताळ फासणे आणि वर त्या कृतीचे चलाखीने समर्थन करणे या गोष्टी हे लोक मोठ्या चलाखिने करतात... शिवाय तसे करताना भल्याबुर्या मार्गांचा अवलंब करून लोकमताचा पाठिंबा मिळविण्याचे कसब या लोकांत असते. ४. धर्मा-धर्मातल्या फरकांचाच नव्हे तर एकाच धर्मातल्या विविधतेचा फायदा हे लोक मोठ्या चलाखीने घेताना दिसतात... उदा. हल्लीच्या काळात शिवमंदिर बांधण्या ऐवजी साईबाबा मंदिर अथवा बालाजी मंदिर बांधणे हा जास्त फायदेशीर व्यवहार आहे हे त्यांना बरोबर कळते. ५. त्यांच्या वर नमूद केलेल्या गुणधर्मांमुळे, अर्थातच, हे लोक आर्थिक सुस्थितीत आणि सामाजिक व राजकीय सत्ताकेंद्रात अथवा सत्ताकेंद्राजवळ असल्यास आश्चर्य नाही. ६. यांची लोकसंख्या प्रामाणिक आस्तिकांपेक्षा जास्त असली तरी ती तितकीशी मोठीही असू शकत नाही... कारण त्यांचे इतके सगळे गुणधर्म एका व्यक्तित असणे तितकेसे सामान्य नसते ! थोडक्यात : धूर्त आस्तिक लोक "अल्पसंख्य नसलेले पण बहुसंख्यही नसलेले", "धूर्त " आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात.धूर्त नास्तिक
या लोकांचे वर्णपटातले स्थान नास्तिक लोकांच्या टोकाजवळ असते. त्यांचे मूळ गुणधर्म असे: १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते. २. परंतू देव या संकल्पनेचा विरोध करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात. तसे करण्यामुळे त्यांना होणारा फायदा खालील एक किंवा अनेक प्रकारचा असू शकतो: (अ) चरितार्थ चालणे (आ) आर्थिक फायदा (इ) सामाजिक फायदा (ई) राजकीय फायदा, (उ) देव-धर्माचा बदला घेतल्याचे वैयक्तिक समाधान इ. आणि हे हितसंबद्ध त्यांच्यासाठी सर्वोच्च असतात, देवाचा विरोध हे केवळ एक साधन असते. यातल्या शेवटच्या प्रकारात; देवाची खूप विनवणी करूनही झालेल्या प्रेमभंगामुळे आलेला देवाचा तिटकारा, प्रेम असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न न होऊ शकल्याने आलेला त्या व्यक्तीच्या देवा-धर्माचा तिटकारा, इ अनेक उपप्रकार असू शकतात... यातल्या काही केसेस तात्कालीक असतात व बसलेल्या धक्क्यातून सावरल्यावर काही कालाने सुधारतात तर इतर काही कायम स्वरूपी असू शकतात. ३. या लोकांमध्ये, देव या संकल्पनेला विरोध करणे हे (अगदी देवा-धर्माशी संबंध नसलेलाही) स्वार्थ साधण्याचे फार प्रभावी साधन म्हणून वापरण्याची विलक्षण हातोटी असते. मग तसे करताना असंबद्ध / अतार्किक / उपहासपूर्ण वाद घालणे यात यांचा हातखंडा असतो. मुद्दा उलटवल्यावर तो भरकटवून भलतीकडे नेण्यात यांचा हात धरणे कठीण असते. कारण आपला मुद्दा जिंकणे हाच त्यांच्या लेखी मुख्य मुद्दा असतो... सत्य, सारासारविवेक वगैरे इतर सर्व गोष्टी त्यापुढे दुय्यम असतात. ४. धर्मा-धर्मातल्या फरकांचाच नव्हे तर हिंदू धर्मासारख्या एकाच धर्मातल्या विविधतेचा फायदा हे लोक मोठ्या चलाखीने घेताना दिसतात... एखाद्या धर्मातील उणीव (सर्व धर्मात असे काही ना काही असतेच) हेरून त्याचा फायदा घेण्यात हे लोक पटाईत असतात. मात्र असे करताना सोईस्कर नसणार्या वस्तुस्थितीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात यांचा हातखंडा असतो. ५. अर्थातच, हे लोक सामाजिक आणि राजकीय सत्ताकेंद्रात अथवा सत्ताकेंद्राजवळ असल्यास आश्चर्य नाही... किंबहुना आर्थिक फायदा, पदभार, मानसन्मान यांची खैरात करत अश्या प्रकारच्या तथाकथित विचारवंतांची फौज पदरी बाळगणे ही सत्ताकेंद्रांची एक महत्त्वपूर्ण गरज असते. ६. यांची लोकसंख्या प्रामाणिक नास्तिकांपेक्षा जास्त असली तरी ती तितकीशी मोठीही असू शकत नाही... कारण त्यांचे इतके सगळे गुणधर्म एका व्यक्तित असणे तितकेसे सामान्य नसते ! थोडक्यात : धूर्त नास्तिक लोक "अल्पसंख्य नसलेले पण बहुसंख्यही नसलेले", "धूर्त " आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात. आतापर्यंत आपण पाहिलेले गट सामील करून तयार झालेला वर्णपट खालच्या आकृतीत दाखवला आहे...
आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०२
धोका प्रबंधक
उरलेल्या बहुसंख्य लोकसमूहातील बहुतेक लोक "धोका प्रबंधक" या वर्गवारीत मोडतात. हे का ? याचे उत्तर त्यांच्या खालील गुणधर्मात सापडेल. १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना ठाऊक असते किंवा कमीत कमी देव या संकल्पनेबद्दल त्यांच्या मनात खात्री नसते. २. परंतू त्याचबरोबर हे सत्य उघडपणे मानणे सामाजिक अथवा राजकीय दृष्टीने फायद्याचे / सोयीचे नाही हे त्यांना पुरेपूर ठाऊक असते. त्याशिवाय आपले मत उघडपणे व्यक्त करण्यामुळे होणारे दुष्परिणाम भोगण्याची त्यांची तयारी नसते. ३. वरच्या १ व २ मधील वस्तुस्थितीमुळे हे लोक "त्यांच्या आजूबाजूच्या सर्वसाधारण सामाजिक-राजकीय प्रवाहाबरोबर वाहणे" हा कमीत कमी धोकादायक पर्याय स्वीकारतात. असे लोक कडक कम्युनिस्ट राजवटीत निधर्मी असल्यासारखे तर कडक धार्मिक राजवटीत कर्मठ धार्मिक असल्यासारखे "वागतात". ४. अर्थातच हे लोक सत्ताकेंद्रातले नसून त्यांच्या धार्मिक-सामाजिक-राजकीय सत्ताकेंद्राने ठरवलेल्या नियमांचे पालन करणारी आणि आपले नेहमीचे जीवन शक्य तेवढे निर्धोक ठेवण्याच्या प्रयत्नात असलेली सामान्य जनता असते. ५. जर देव खरोखरच असला तर आपलाही दंडवत त्याच्या नावे असावा, झाला तर फायदाच होईल असाही एक व्यावहारीक धार्मिक विचार यांच्या मनात असतो... हे सुद्धा त्यांचे एक प्रकारचे धोका प्रबंधनच असते ! ६. वरच्या सर्व वस्तुस्थितीमुळे आपले मत अथवा चेहरा नसलेल्या या बहुसंख्य अगतिक गटाला "धोका प्रबंधक" हेच नाव योग्य आहे. थोडक्यात : धोका प्रबंधक लोक "बहुसंख्य", "परिस्थितीशी जुळवून घेण्यात चलाख" आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात. आतापर्यंत आपला वर्णपट खालच्या आकृतीत दाखवला आहे तसा झाला आहे...
आस्तिक-नास्तिक वर्णपट : ३
अज्ञेयवादी
आपल्या या वर्णपटात बरोबर मध्यभागी बसणार्या या गटाचे गुणधर्म खालीलप्रमाणे असतात: १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते. २. आपले हे अज्ञान उघडपणे व्यक्त करायला या लोकांना भिती अथवा लाज वाटत नाही आणि त्यामुळे होऊ शकणार्या धोक्याला सामोरे जाण्याची त्यांची तयारी असते. ३. "देव आहे" आणि "देव नाही" या दोन्ही दाव्यांबद्दलचे आपले अज्ञान उघडपणे मान्य करण्याबरोबरच आस्तिक आणि नास्तिक या दोन्हीं गटांचे दावे शास्त्रिय कसोटीवर जोखून त्यातले योग्य ते सत्य / अर्धसत्य "आहे तसे" स्वीकारण्याची त्यांची तयारी असते. त्याचबरोबर भविष्यात मिळणारे नवीन सबळ पुरावे स्वीकारून आपले मत त्याप्रमाणे बदलत राहणे त्यांना गैरसोयीचे अथवा मानहानीचे वाटत नाही. ४. सत्य आणि शास्त्र यांच्यावर श्रद्धा असणारे हे लोक शात्रज्ञ म्हणून यशस्वी होत असले तरी त्याच कारणामुळे राजकारणाशी त्यांचे जमणे कठीण असते. त्यामुळे कर्मठ नास्तिक (उदा. कम्युनिस्ट), धूर्त आस्तिक, धूर्त नास्तिक, मिथ्या-धर्मनिरपेक्ष किंवा कर्मठ धार्मिक प्रकारच्या राजसत्तांशी त्यांचा संघर्ष होऊ शकतो. ५. "देव या संकल्पनेबद्दल मला सत्य माहीत नाही... मी अज्ञानी आहे" हे सत्य उघडपणे मानत असल्याने यांना अज्ञेयवादी (agnostic) म्हटले जाते. ६. अर्थातच अश्या गुणधर्मांचे लोक समाजात फारच थोड्या संख्येने असणे आश्चर्यकारक नाही. थोडक्यात : अज्ञेयवादी लोक "अल्पसंख्य", "आपल्या मतांसाठी परिस्थितीशी टक्कर देण्यासाठी तयार असणारे", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात आणि तसे उघडपणे कबूल करतात. या गटाबरोबरच आपला वर्णपट पुरा होतो. पूर्ण वर्णपट खालच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिसतो:
आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०४
सारांश
हे वरचे विश्लेषण खालील तक्त्यात सारांशाने दाखवले आहे.
आस्तिक-नास्तिक वर्णपट : गुणधर्म सारांश
In reply to माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती by डॉ सुहास म्हात्रे
In reply to +++१११ by अत्रुप्त आत्मा
कुणाच्याही साध्या अगर तात्विक प्रश्नांची उत्तरं समर्थकांना देता आलेली नाहीत. मग समर्थकांनी दोन मार्ग वापरले. १) दुर्लक्ष/उपेक्षा यांचा हत्यारासारखा वापर करून आपल्या कल्पिताच्या पडद्याआड दडून रहाणे. २) आपल्याला अनुकूल समाजबळ तयार होताच विरोधकांचा शब्दानी..कपटनिती..आणि शस्त्रबळानी नायनाट करणे.हे वाचुन नेहमी प्रमाणे माझे काही सोप्पे प्रश्न देव म्हणजे काय ? माणुस म्हणजे काय ? असणे म्हणजे काय ? आणि नसणे म्हणजे काय ? (हे प्रश्न जरी जनेरीक असले तरी उत्तरे वैयक्तिक अपेक्षित आहेत म्हण्जे "माझ्या मते..." अशी काहीशी ) देव हा धर्माच्या कमी आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील जास्त मोठ्ठा इश्शु आहे ! तुम्ही काय गृहीतके घेवुन सुरुवात करता ह्यावरुन तुम्ही कोनत्या अनुमानाला पोहचणार हे ठरते ! रेने देकार्त नावाचा एक महान तत्वज्ञ होवुन गेला युरोपात त्याचे मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी , तत्त्वज्ञानावरील पहिली चिंतने हे पुस्तक आवर्जुन वाचण्यासारखे आहे . बाकी समाजात काय चालते , अन देवाच्या नावावर धुर्त आस्तिक लोक भोळ्याबाभड्यांचा कसा गैरफायदा घेतात अन धुर्त नास्तिक लोक बोळ्याभाभड्यांना कसे भडकवुन किंकर्म अवस्थेत नेवुन भंदावुन सोडतात ह्यावर चर्चा करण्यात देवाला इन्टरेस्ट नाही आणि मलाही ! लोल !
In reply to कुणाच्याही साध्या अगर तात्विक by प्रसाद गोडबोले
In reply to देवाविषयी तुंम्ही विचारलेल्या by अत्रुप्त आत्मा
In reply to देवाविषयी तुंम्ही विचारलेल्या by अत्रुप्त आत्मा
In reply to नो नो नो by प्रसाद गोडबोले
In reply to @तुम्हाला असे म्हणायचे आहे का by अत्रुप्त आत्मा
In reply to माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती by डॉ सुहास म्हात्रे
फक्त आपली पृथ्वी की आपली पृथ्वी ज्याचा एक अतिशय छोटा भाग आहे ते विराट विश्वयेथे मला विश्व किंवा ब्रम्हांड असे म्हणायचे आहे. ज्यामधील बर्याच गोष्टी माझ्यासाठी अनाकलनीय आहेत पण त्या एका पद्धतशीर प्रणालीमध्ये कार्यरत आहेत. उदा. गुरुत्वाकर्षण, ग्रहांच्या कक्षा व गति, चुंबकीय शक्ती, सजीवांची शरीर रचना वगैरे. हि प्रणाली चालवणारी एक उर्जा आहे, त्या उर्जेलाच "देव", निसर्ग" इ. नावे मिळाली आहेत. एक्का साहेब तुमचे प्रश्न खरच खूप चांगले आहेत व मलाहि पडत आलेले आहेत. पण हि शक्ती अगदीच झाडाचे पान अन पान नियंत्रित करत आहे असे नाही. ह्या बाबतीत मला पटणारा एक मतप्रवाह आहे कि स्रुष्टीनिर्माता व नियंत्रक आहे पण त्याचबरोबर प्रत्येकांस इच्छा व निवडीचे स्वातंत्र्य हि आहे. त्या स्वातंत्र्याचा उपयोग किंवा दुरुपयोग होउन चांगल्या किंवा वाईट घटना घडतात. मीही अजून काही उत्तरांच्या शोधात आहे व ह्या चर्चेतून मिळणारी वेगवेगळी मते जाणून घ्यायला आवडतील.
In reply to इदं न मम || by अर्धवटराव
In reply to इदं न मम || by अर्धवटराव
In reply to हा पण एक प्रवासच आहे... मनाचा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मूळात "माझा विश्वास आहे (I by कवितानागेश
In reply to माणसाची उघड / दृश्य कृती by डॉ सुहास म्हात्रे
माझ्या मते जगात 'believer' ५% सुद्धा नसतील.
प्रामाणिक आस्तिकांचा ५% हा आकडासुद्धा खूप मोठा वाटतो... १% पेक्षा कमीच असावा.
९५% लोक 'स्वतःच्या सोयीप्रमाणे वळणारे' या वर्गात मोडतात.
याच्याशी सहमतIn reply to मेरेकू ऐसाच by चौकटराजा
In reply to उदबत्तीचा वास आवडतो तर by बाळ सप्रे
In reply to हे सारं करताना समोर देवाची by धन्या
In reply to तो फील नक्की कशामुळे येतोय ते by बाळ सप्रे
In reply to तो फील नक्की कशामुळे येतोय ते by बाळ सप्रे
In reply to तो फील नक्की कशामुळे येतोय ते by बाळ सप्रे
In reply to हे माझ्याबद्दल नाही हो. मी इन by धन्या
मय हूं नास्तिक वईसेच ठिक हैनास्तिक बोले तो ? जरा एस्पिलेन करना मंगता है.
In reply to नास्तिक बोले तो ? by चित्रगुप्त
In reply to नास्तिक बोले तो ? by चित्रगुप्त
In reply to लेख आवडला by सुधीर
In reply to भूतांसाठी वेगळा धागा काढूयात. by कवितानागेश
In reply to खि: खि: खि: खि: by एस
In reply to मी भूत नाही. तसंही मला तर by कवितानागेश
In reply to नीट पहा, गोरं कुत्रं घाबरत by बॅटमॅन

In reply to नीट पहा, गोरं कुत्रं घाबरत by बॅटमॅन
In reply to - by कवितानागेश
In reply to काळ्या मांजराला रजनीकांत आडवा by बॅटमॅन
In reply to मस्त ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to - by कवितानागेश
In reply to - by कवितानागेश
मौ तै...फटू बगून वारल्या ग्येलो आहे! 
In reply to भूता-खेताचा by सुधीर
In reply to देव आणि हुकुमशहा by हुप्प्या
In reply to ओक्के!! डन!! by कवितानागेश
In reply to देव आणि हुकुमशहा by हुप्प्या
In reply to अजून दोनशे नाहीत????????????? by प्यारे१
In reply to मूळात विश्वात चाललेलं सगळंच by कवितानागेश
In reply to असाच विचार मानवजातीने केला by डॉ सुहास म्हात्रे
In reply to २००!!! by कवितानागेश
In reply to शक्य आहे ! सद्या माणसाच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to शक्य आहे ! सद्या माणसाच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पण जंताला आणि माणसाला, by कवितानागेश
अजून तर आपल्याला आपल्या बरोबरचे इतर प्राणी समजत नाहीत. अगदी 'माणूस' देखिल नाही. तिथे जंत कुठे समजणार? आणि 'देव' म्हणून कुठली सिस्टम असेल तर तीतरी कशी काय समजणार?
या प्रतिसादानं तुम्ही आपण सारे अज्ञानी आहोत हे जाणलंत :)
"आपल्याला एखाद्या गोष्टीचे काहीच / संपूर्ण ज्ञान नाही" हे समजणे ही त्या गोष्टीचे सखोल ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी असते. अर्थात त्याच पायरीवर न थांबता ज्ञानार्जनाचे / शोधाचे प्रयत्न चालू ठेवले तरच आपण ज्ञानाच्या वरवरच्या पायर्यांवर जाऊ शकतो... पण, शिखरावर पोहोचू किंवा नाही हे तेथे गेल्याशिवाय कळणार नाही.
थांबला तो (वैचारिक / बौधीक / आध्यात्मिक / धार्मिक / इ सर्व संदर्भात) संपला !In reply to अजून तर आपल्याला आपल्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ज्ञान की माहिती? by प्यारे१
In reply to सध्या आपण 'माहिती'लाच ज्ञान by कवितानागेश
In reply to ज्ञान की माहिती? by प्यारे१
In reply to आतापर्यंत माहिती असणे ही by डॉ सुहास म्हात्रे
In reply to माहिती नसूनही ज्ञान 'होतं' by प्यारे१
In reply to बरं मग? by कवितानागेश
In reply to माहिती नसूनही ज्ञान 'होतं' by प्यारे१
उदाहरणार्थः एखादा एकदम जंगलातला छान गाणारा आदिवासी असला तर त्याला तालासुराची माहिती नसली तरी ज्ञान असतं. :)In reply to आतापर्यंत माहिती असणे ही by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मूळात विश्वात चाललेलं सगळंच by कवितानागेश
In reply to मूळात विश्वात चाललेलं सगळंच by कवितानागेश
In reply to यावरुन आठवलं... by अर्धवटराव
In reply to कदाचित आधी पुष्कळ वेळा वेगळी by कवितानागेश
In reply to कदाचित आधी पुष्कळ वेळा वेगळी by कवितानागेश
+++१११