आटपाटनगरात नसते एक बाई.
तिला नसतं तिचं नाव.
तिचं नसतं एक घर.
तिचं नसतं एक कुटुंब.
नसतो तिचा एक नवरा.
तिची मुलं तर नसतातच तिची.
नसतात तिची भांडीकुंडी. कपडेलत्ते. फर्निचर वगैरेही.
तिचा नसतो तिचा वेळ.
तिचा दिवस.
तिचे श्रम तिचे नसतात.
इतकंच कशाला.. तिची विश्रांतीही तिची नसते.
तिचं शरीर. तिचं मन.
तिची ओळख. तिचं जगणं.
अहेवपणी नाहीच आलं तर म्हणे मरणही..
...नसतं काहीसुद्धा तिचं.
पण नाही म्हणायला तिचा असतो एक गाव.
नदीकाठी असतं एक... अगदी ऎसपैस चिमुकलं घर!
तिथे असतो तिचा एक मोकळा स्वच्छ श्वास.
असतात सुंदर संध्याकाळी तिच्या.
आणि पहाटेची निवांत वेळ? तीही असतेच.
एखादा झोका.. फुलांनी ओसंडणार्या फांदीला झुलणारा.
असतं एखादं चंदेरी पाखरू.. तिच्या खांद्यावर बसून मोकळे सूर लावणारं.
मुख्य म्हणजे असतं तिचं हसू.
तिच्या नसलेल्यातून या असलेल्यात पोचायची वाट?
ती मात्र नसते.
की असते खरं तर...?
(- ही वाट शोधायसाठी धडपडत असलेल्या एका मैत्रिणीला सस्नेह.)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5903
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुन्दर
एकच नंबर!!
कविता आवडलीच.
ती जिथं जशी उभी आहे तिथून
In reply to कविता आवडलीच. by अजया
वाट नाही
>>वाट नाही
In reply to वाट नाही by ऋतुराज चित्रे
+१
In reply to >>वाट नाही by सूड
दिलासा
In reply to +१ by स्पा
अगदी खरं. वाट नसेल तर शोधावी
In reply to >>वाट नाही by सूड
छान!
अप्रतिम ! ती वाट लवकरच सापडो
सुंदर. अर्थपूर्ण.
मुक्तक आवडलं..
मला वाटतं की हे मुक्तक 'बाई
In reply to मुक्तक आवडलं.. by पिलीयन रायडर
हो.. बरोबर आहे..
In reply to मला वाटतं की हे मुक्तक 'बाई by कवितानागेश
>>सगळीच माणसं कुठेतरी 'नसतात'
In reply to मला वाटतं की हे मुक्तक 'बाई by कवितानागेश
सहमत.
In reply to >>सगळीच माणसं कुठेतरी 'नसतात' by सूड
अस्तित्वातल्या
कविता आवडली
सुंदर.
मस्त मस्त मस्त
:-)
In reply to मस्त मस्त मस्त by मिसळलेला काव्यप्रेमी
कविता आवडली.
तीला म्हणावे,
अगदी अगदी!
In reply to तीला म्हणावे, by आयुर्हित
सुंदर ……
सुंदर मुक्तक.
'नसलेल्या बाईचं असणं' ही
स्वत्वाचा शोध घेणार सुंदर
!
अर्थपूर्ण
पुरुषी दृष्टीकोन बदलायला हवा
In reply to अर्थपूर्ण by तिमा
या कवितेसोबत आता या सगळ्या
खूपच छान!
छान
सुंदर मनाला भावली.
निकराचा लढा...
खुप छान कविता आहे. खरं तर
सुरेख
सुरेख मुक्तक! मैत्रिणिला ती
बळ आणि पाठबळ