चंद्रयान - शुभेच्छा!
भारताच्या चंद्रयानाच्या उड्डाणाला आता केवळ बावन्न तास राहीले असून सोमवारी पहाटे काउंट डाऊन सुरू होणार आहे! चंद्रमोहीमेच्या घटनेसंदर्भात भारतीय शास्त्रज्ञ आणि त्यांच्या सहकारी इतर देशातील शास्त्रज्ञांना मनःपूर्वक शुभेच्छा!
![]() |
| From Screen Captures |
वाचने
7233
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
आजच इप्रसारण वर देण्यासाठी ही बातमी रेकॉर्ड केली मी.
माझ्याही शुभेच्छा! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मनःपूर्वक शुभेच्छा!
चित्र लै भारी आहे! आमच्याही शुभेच्छा...
तात्या.
--
तुझ्या घटांच्या उतरंडीला
नसे अंत, ना पार
विठ्ठला तू वेडा कुंभार..
चांद्रयान मोहीम यशस्वी होवो. शुभेच्छा.
ज्यावेळी हे यान चांद्र भुमीवर उतरेल त्यावेळी प्रत्येक भारतीयाला वाटणारा अभिमान अवर्णनीय असेल :)
चांद्रविजयमोहिमेला शुभेच्छा!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
In reply to शुभेच्छा! by ऋषिकेश
माझ्या माहीती प्रमाणे हे यान चंद्रावर उतरणार नाही.
माझ्याही शुभेच्छा
In reply to माझ्या by सखाराम_गटणे™
काही ठराविक कालावधीसाठी "ल्युनार ऑर्बिट" चंद्रापासुन सुमारे १०० कीलोमिटर वर फिरत राहील, मग शेवटचा टप्पा ..... चंद्रावर उतरेल.
In reply to उतरेल by मानस
गटणे
तुमचं बरोबर आहे, चांद्रयान १ उतरणार नाही.............. १०० किमी वर कक्षेत फिरत रहाणार आहे, दोन वर्षांसाठी ...
चांद्रयान २ उतरणार आहे .... २०१० साली.............
हे चांद्र यान चंद्रा वरती किती दिवस असणार आहे. ते परत प्रुथ्वी वर येणार आहे का ? कोणाला माहीत असल्यास दुवा द्यावा.
In reply to हे चांद्र by आनंद
चांद्रयान १ माहितीचा दुवा
In reply to दुवा by मानस
आणखी एक दुवा
सर्व भारतीयांची मान ताठ होईल आणि आपल्या वैज्ञानिकांच्या, अभियंत्यांच्या आणि तंत्रज्ञांच्या असामान्य कष्टांचे चीज होईल अशी आपण सर्वजण प्रार्थना करुयात!
चांद्रयान मोहिमेला अनेक शुभेच्छा!!
(ह्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची काही सोय आहे का? कोणाला माहीत असल्यास दुवा द्यावा.)
चतुरंग
In reply to चांद्रयान मोहीम सफल होऊन by चतुरंग
इस्त्रोने दिलेल्या माहीती प्रमाणे ऑक्टोबर २२ ला ५:५० - ६:५० सकाळ भाप्रवे जालावरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
In reply to चांद्रयान मोहीम सफल होऊन by चतुरंग
http://www.ibnlive.com/videos/video_streaming.php?type=ibnlokmat
बघता येईल....
स्वप्निल
चांद्रयान मोहिमेला माझ्ह्याही अनेक शुभेच्छा!!!!
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
चांद्रयान मोहिमेला अनेक शुभेच्छा!!!!
मोहीमेला खूप खूप शुभेच्छा. उद्या थेट प्रक्षेपण पहायला खूप आवडेल.
भारताची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो.
साफल्यासाठी शुभकामना.
(चीन आता चंद्रावर माणूस पाठवू इच्छितो. चंद्रप्रवास म्हणजे तसा जरा मोठ्या देशांसाठी "स्टेटस सिंबॉल" झालेला आहे. अर्थात भारताला स्टेटस सिंबॉल मिळाल्यास आनंदच आहे.)
भारताच्या चंद्रयान मोहीमेला खूप खूप शुभेच्छा.
थेट प्रक्षेपण इथे बघता येइल : http://www.ibnlive.com/videos/video_streaming.php?type=ibnlokmat
स्वप्निल
पैशाची उधलपटी आहे ही. सध्या भारतात कितितरि प्रश्न आहेत. अशा वेळेला मलातरी ही पैशाचि नासाडि वाटते. ह्यातुन देशाच काय भल होनार आहे ते विकास सांगेलका?
In reply to पैशाची by खरा डॉन
पैशाची उधलपटी आहे ही. सध्या भारतात कितितरि प्रश्न आहेत. अशा वेळेला मलातरी ही पैशाचि नासाडि वाटते. ह्यातुन देशाच काय भल होनार आहे ते विकास सांगेलका?
ही मला पैशाची उधळपट्टी वाटत नाही. हं कदाचीत क्रिकेटच्या सामन्यांवर जितका खर्च होतो, ते बघण्यात जितका तमाम जनता वेळ घालवते, त्याचा सर्वाचा हिशेब केला - तो ही स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा आणि त्यात गेलेले पैसे आणि चंद्रयानावर गेलेले पैसे याची तुलना केली तर क्रिकेट मधे जास्त पैसे घालवले असतील... हे केवळ एक उदाहरण म्हणून लिहीत आहे... क्रिकेट अथवा अजून काहीच्या मी विरोधात नाही.
आता दुसरे उदाहरण बघा - चंद्रयान प्रोजेक्टचा एकूण खर्च रू.३८६ कोटी. कॉमनवेल्थ गेम्स (पुणे आणि दिल्ली) - $रू. ४६३ कोटी (मला खात्री आहे तो आकडा २०१० ला दोन्ही पूर्ण संपेपर्यंत वाढणारच आहे!). म्हणजे आपले इतके प्रश्न असताना इतके कोट्यावधी खेळात का उडवायचे बरे?
अर्थात हा प्रश्न मला योग्य वाटत नाही. देशाचे प्रश्न "एका वेळेस एक" असे सुटत नसतात तर सर्वत्र लक्ष द्यावे लागते. आता जमिनीवर कमी लक्ष दिले जाते हे मान्य. पण त्याचे कारण चंद्रावर जास्त लक्ष आहे हे नक्कीच नाही. आजपर्यंत आपण १९९९ सालपासून (जेंव्हा चंद्रयान प्रोजेक्ट ठरला तेंव्हापासून) - अनेक संकटे येऊन गेली, पैसा खर्च झाला तरी असे म्हणल्याचे ऐकले नाही की (उदाहरणार्थ) अरे आपण त्सुनामीला अथवा भूज भुकंपाला मदत करू शकणार कारण चंद्रयानाला पैसे दिले आहेत...
किंबहूना मला वाटते कुठल्यातरी गरीबी हटावो योजनेत हे पैसे गेले असते तर कुणाची गरीबी हटली असती कोण जाणे! किमान हे पैसे नक्की वापरले गेल्याचे दिसत आहे (अगदी त्यातही भ्रष्टाचार धरला असे गृहीत धरले तरी)!
आता चंद्रयानासारख्या प्रोजेक्टचा उपयोग काय?
- आपण "भूवरीच्या चंद्रावर स्वारी करत बसण्याऐवजी", "नभीच्या चंद्रावर जेंव्हा स्वारी" करतो तेंव्हा आपले राष्ट्रीय ज्ञान वाढवतो ज्याचा उपयोग अनेक प्रकारच्या प्रगतीसाठी होतो. मला आठवते की भारताने जेंव्हा इन्सॅट सोडला तेंव्हा असलेच वाद घालण्यात आले होते. आज ते वाद घालणारे अशाच उपग्रह तंत्रज्ञानाचा त्यांच्या कळत नकळत फायदा करून घेत आहेत...
- आज जगाची भारताकडे बघण्याची दृष्टी बदलत आहे. त्याचा परीणाम अशा मोहीमांमुळे चांगलाच होणार आहे.
- आपण जगातील इतर राष्ट्रांचे उपग्रह सोडू लागलो आहोतच. या मोहीमेमुळे त्याला जोर येईल. शेवटी बिझनेस इज बिझनेस.
- आपण अमेरिका, रशिया, इयू, बल्गेरीया आदींची उपकरणे फुकट घेऊन जात आहोत. मात्र त्या बदल्यात त्यातून उपलब्ध होणारी माहीती फुकट मिळवणार आहोत. त्या माहीतीचा संबंध हा भविष्यातील चंद्रावरील हक्कासंदर्भात असेल आणि उर्जास्त्रोतासाठी चंद्रावरील दुर्मिळ खनिजांचे साठे ताब्यात ठेवण्यास होईल.
- आपण जात्याच हल्लेखोर राष्ट्र नाही. तसेच जात्याच हल्ले ओढवून घेणारे राष्ट्र होतो. आता ते थोडेफार बदलत आहे. विचार करा जगात फक्त एकच राष्ट्र आहे ज्याने उपग्रहविरोधी क्षेपणास्त्रांची चाचणी करून गेल्याच वर्षात एक जुना उपग्रह अंतराळात अचूक उडवला... कोण आहे ते राष्ट्र? अमेरिका? - नाही... रशिया? - नाही. ते आहे आपले शेजारी राष्ट्र जिथल्या जनतेला आपण "भाई" म्हणले आणि ज्या राष्ट्राने नंतर "भाईगिरी" केली ते चीन...
- आंतर्राष्ट्रीय राजकारणात विशेष करून जेंव्हा चीनसारखा देश हा शेजारी आहे, तेंव्हा आपले सामर्थ्य हे त्याच्या तोडीस करणे महत्वाचे आहे त्याला पर्याय नाही... आज काही होणार नाही, पण उद्या विचार करा चीनने आपला एखाद उपग्रह उडवला तर आपल्या देशाच्या प्रगतीचे काय लफडे होऊ शकेल ते...
- म्हणून चंद्रयान अथवा तत्सम मोहीमा ह्या काही केवळ फुकाच्या नाहीत त्यातून आपल्याला अनेकविध प्रकारचे ज्ञान मिळते - राष्ट्रीय सुरक्षेला जे आजच्या काळात आवश्यक आहे असेही...
In reply to देशाचे भले... by विकास
विकासशी सहमत आहे.
ह्या मोहिमेमुळे भारत अंतरीक्ष व्यवसायातील आउट सोर्सिंगचा (एकूण बाजार रु. १० हजार कोटी) मुख्य पुरवठादार होईल.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
सध्या होत असलेली ख्रिश्चन धर्मातरे आधी बंद करा मग जा चंद्रावर
In reply to सध्या होत by खरा डॉन
सध्या होत असलेली ख्रिश्चन धर्मातरे आधी बंद करा मग जा चंद्रावर
असं कसं म्हणता? ;)
टाइम्स ऑफ इंडीया वाचा. किमान त्यांचा चंद्रयानाच्या यशस्वी उड्डाणासंदर्भातील एका प्रमुख बातमीचा मथळा तरी वाचा...
India's space journey started from a village church
चंद्रयानासंदर्भातील खालील व्हिडीओ माहीतीपूर्ण वाटला..
http://www.youtube.com/watch?v=ipBOotJDJ1k
हे चंद्रयान जरी चंद्रावर उतरणार नसले तरी ते एक प्रोब चंद्रावर टाकणार आहे ज्यावर आणि ज्याच्यामुळे चंद्रभुमीवर तिरंगा फडकेल!
In reply to चांगले ऍनिमेशन by विकास
चांगल्या माहितीबद्दल मनापासून आभार!

हो...