थेंब
लेखनविषय:
काव्यरस
संथ पाउस पडतो
झाडे,कौले भिजवीत
जणू स्वप्न उतरते
जडावल्या पापणीत....
झाडे चिंब शहारली
पक्षी मिटत पंखात
शांत दुपार पेंगते
थेंब थेंब न्याहळत...
ओल्या लाल कौलांवर
मंद पावसाचा सूर
हिरव्या कंच शेतावर
संथ थेंबांचा पदर...
ओला वास रानीवनी
ढग पाण्यात वाहात
भोवताल सारे स्तब्ध
थेंब एकटे गातात....
वाचने
2662
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
शेवटाला...जोरदार सरी नंतरची..शांतता अनुभवाला आली.
बाकी ठीक!
In reply to शेवटाला...जोरदार सरी नंतरची. by अत्रुप्त आत्मा
छान आहे कविता. शेवटच्या दोन ओळी खासच.
सुंदर शब्दचित्र.
In reply to सुंदर शब्दचित्र. by कवितानागेश
येस्स! शब्दचित्र!
वाह
>>ओला वास रानीवनी
ढग पाण्यात वाहात
भोवताल सारे स्तब्ध
थेंब एकटे गातात....
भीमाशंकरला आलेल्या अनुभवाचं चित्रण या चार ओळीत बद्ध झाल्यासारखं वाटलं.
अतिशय सुंदर... खुपच आवडली.
काय सुरेख!
छानच!
आहा ! क्या बात ! प्रत्येक ओळीला असं एक एक चित्र दिसलं आणि शेवटच्या ओळीला ती सगळी चित्र कन्सॉलिडेट होऊन एक चित्र स्थिर उभं राहिलं डोळ्यासमोर....
वा खुप छान कविता
खरच शब्दचित्र! आवडलं.
शेवटाला...जोरदार सरी नंतरची.