आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय वाचाळ वीरता
"एकशे वीस कोटींचा देश; बारा क्रिकेटपटू निवडण आणि टिम म्हणून खेळणं जड जाते" हि माझी नवी म्हण, क्रिकेटवरची कॉमेंट मुळीच नाही. आमचाच पक्ष ग्रेट म्हणून टिमकी वाजवणार्या (सर्वच भारतीय) राजकीय पक्षांना भारतासारख्या खंदप्राय देशातून पदाला शोभेलसे चार कॅबीनेट मंत्री (गृह,संरक्षण,अर्थ,परराष्ट्र) निवडण जड जाते, असे का ?
काळ बदलला इकॉनॉमीची वाटचाल समाजवादाकडन भांडवलशाहीकडे निघाली तरी, एकाधिकार शाही असलेल्या काँग्रेस पक्षाला प्रणव मुखर्जींचा (आर्थीक दृष्टीकोण असलेला) प्रभाव कमी करण्याचा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे, राष्ट्रपतीपदावर नेमणूक करावी लागली. चला आपण याही गोष्टीच अभिनंदन करू. पि. चिदंबरम यांना एकदा गृहमंत्रीपद एकदा अर्थमंत्री पद असा खेळ. संरक्षण खात्यातील एके अँटोनी आणि पि. चिदंबरम चार पैकी दोनच मोजायचे. सुशिलकुमारांना आणि सलमानरावांना (माजी परराष्ट्रमंत्री बरंका !) कोणत्या मापानी मोजायचं ? त्याच्या आधीच्या सरकारही जसवंतसिंग आणि यशवंत सिन्हा यांची खातेपालट करत कन्फ्यूजन दाखवत राहील. आणि या वेळी परराष्ट्रमंत्री असलेल्या सुषमा स्वराज यांना लिगली आणि इमोशनली राईट बोलत पाँईंट स्कोअर करता येतात पण आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल घोडं पुढे दामटताना पॉलीटीकली राईट बोलता यावयास हव. आपले सध्याचे पंतप्रधान त्यांचे जुने बोलणे पाहीले तर कोलांटउड्या मारतात अशी टिकाकारांना संधी असेल पण किमान पंतप्रधानपदा वर असताना पदाला शोभेस पॉलीटीकली राईट त्यांना बोलता येतं (ते तस अरुण जेटलींनाह येत हा अरुण जेटली आणि सुषमा स्वराजातील फरक असावा). पंतप्रधानांना सर्वच विषयांचा सखोल अभ्यास असावा असे नाही भूतान मधे नेपाळचा उल्लेख करायचा नसतो हे त्यांना माहित नसेल तर ठिक पण परराष्ट्रमंत्री सखोल आणि पॉलीटीकली राईट बोलणारा हवा. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणून सुषमा स्वराजांना जेवढ्या टॉप लेव्हलच्या दिल्ली भेटीवरील आंतरराष्ट्रीय डिग्नीटरीजना भेटण्याची संधी मिळाली असेल तेवढी मोदींनाही मिळाली नसेल. पण भूतानच्या दौर्यावर मॅडमनी पत्रकारांना भूतानच्या दौर्यापेक्षा बांग्लादेशचा दौरा चांगला होईल अस भूतानमध्ये उभ टाकून सांगीतलं ( आता ब्रीकच्या ब्राझील दौर्यावर पंतप्रधानांसोबत परराष्ट्रमंत्री/परराष्ट्र राज्यमंत्रीही नाहीत आणि भारतीय पत्रकारही नाहीत ! :) ) . अगदी पंतप्रधानपदावरच्या शपथविधी पासून परराष्ट्र धोरणावर कामतर चालू झालय पण पत्रकारांशी अधिकतम संवाद परराष्ट्रखात्यातील सचीव मंडळींना साधावा लागतोय. परराष्ट्रराज्य मंत्रीपदावर विजयकुमार सिंग भारतीय सैन्यातले रिटायर्ड जनरल यांना बसवलय या साहेबांनी निवडून येण्या आधीपासून वाचाळवीरता दाखवली आहे.
अरुण जेटली आणि निर्मला सितारामन यांना डिप्लोमॅटीकली आणि पॉलीटीकली राईट बोलता येतं पण दोघेही अर्थमंत्रालय सांभाळण्यात व्यस्त आहेत, या दोघातील निर्मला सितारामन या पंतप्रधानांसमवेत ब्राझील दौर्यावर आहेत हे ठिक पण तुम्हाला तुमचा परराष्ट्रराज्यमंत्री एखादा मुत्सद्दी असावा आणि तो पंतप्रधानांसोबत असावा हे जमलेल नाही.
ब्राझीलला जाताना पंतप्रधानांच विमान फ्रँकफर्ट एवजी बर्लीनहून नेल गेल जर्मनीच्या मुख्य मर्केल बाई भेटण्याची शक्यता खूप कमी आहे हे माहीत असताना आणि ब्राझीलमधील चीन सोडता इतर मिटींगांना विस्कळीतपणा आल्याचे रिपोर्ट येत आहेत. संदर्भः फर्स्टपोस्ट म्हटल तर छोट्या गोष्टी आहेत. परराष्ट्र सचीवांना जर्मनीतील अंबॅसॅडरपदाचा आणि इतरही बराच अनुभव त्यांच्या टिमनी देवयांनी खोब्रागडेंच्या बाबतीत आणि अलिकडील केरळ नर्सेस प्रकरणात चांगल राजनैतीक यश संपादन केल आहे नाही असे नाही पण परराष्ट्र सचीव पदावर येऊन आत्ता कुठे जेमतेम एक वर्ष पूर्ण होतय. हि इंग्रजी विकिपीडियावरील भारताच्या परराष्ट्रसचीव पदी असलेल्या स्वातंत्र्य्त्तर सर्वांची यादी पहा. बहुसंख्य जण दीड दोन फारतर तीन वर्षेपदावर राहीले आहेत ! चार वर्षे पूर्ण केलेला परराष्ट्र सचीव पाहण्या साठी इंदीरा गांधीच्या कारकीर्दिच्या सुरवातीस जावे लागते आणि सहा वर्षे राहीलेला परराष्ट्र सचीव पाहण्यासाठी नेहरूंच्या कारकीर्दी पर्यंत मागे जावे लागते. म्हणजे पॉलीटीकल आणि एक्झीकटीव्ह दोन्हीही लेव्हलला स्टॅबिलीटीचा परराष्ट्रखात्यात सॉर्ट ऑफ अभाव आहे.
पंतप्रधानांनी मंत्रिमंडळ ते सर्व खासदार ते पक्ष वाचाळ विरता टाळण्यासाठी सगळ्यांना दमात घेतलं तरीही पक्षाचा नव्हे पण पक्षाच्या गोतावळ्यातला एक वेदप्रकाश वैदिक नावाचा वाचाळ वीर निघालाच. तिकडे आमेरीकेत आमेरीकी काँग्रेसच पंतप्रधानांना आमंत्रण मिळण्या आधीच भारतीय प्रेसच्या वाचाल वीरांच ढोल वाजवण चालू आहे म्हणजे जशा मर्केल बाई भेटल्या नाहीत पुतीनरावांनी वेळेचा घोळ घातला तसाच आमेरीकेतही काही घोळ करतील. एकीकडे आपण भारतीय राजनैतीक देवयानी खोब्रागडेंच्या प्रतिष्ठेसाठी आकाश पाताळ एक करतो आणि दुसरीकडे आपल्या वाचाळवीरतेने आपल्याच पंतप्रधानांची इज्जत आपण स्वतःहून कमी करण्याच्या मागे पडलेले असतो.
हि वाचाळ विरता काय भानगड आहे, स्पिकींग पॉलिटीकली राईट म्हणजे काय ? इत्यादीचे सध्या परराष्ट्रमंत्र्यांकरताच क्लास भरवावा लागेल अशी वेळ असताना सुशिलकुमार ते वेदप्रकाश वैदिक या सर्वपक्षीय गोतावळ्यास मार्गदर्शनार्थ कोण उपलब्ध होईल ते काळच सांगेल.
* हे सुद्धा पहा २०१४ उगवत्या सरकार समोरचा पहीला; मावळत्या सरकारचा शेवटचा आंतरराष्ट्रीय राजनितीक गूंता इटालीयन ?
वाचने
4995
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
मला वाटते की कोणतेही नवीन
In reply to मला वाटते की कोणतेही नवीन by आनन्दा
हे ५-१५ दिवसात कस होणार ?
अंतर्गत सुरक्षेसाठी अजीत
In reply to अंतर्गत सुरक्षेसाठी अजीत by निनाद मुक्काम …
:)
मार्केल ब्राझील ला जाणार हे
In reply to मार्केल ब्राझील ला जाणार हे by निनाद मुक्काम …
मोदी सरकार काय करणार हे सांगत बसत नाहीत करून दाखवतात.
या लेखकाची वाक्ये २, ३