मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एकलव्य..

vaibhav deshmukh · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
एकलव्य.... कित्येक शतके उलटली युगांतरे झाली सत्तांतर घडले मी माञ स्थिर आहे त्याच सहानुभूतींच्या बंदिस्त नजरेत.. कोणी नाकारले म्हणूनच शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले मी धर्नुधर झालो रक्ताळलेल्या चार बोटांचा श्रेष्ठ शिष्यही झालो तेव्हाच; त्या हाताकडे पाहताना दु: खाचा लवलेशही नव्हता मुद्रेवर पण; मी डगमगलो ढासळलो तुमच्या अनुत्तरीत प्रश्नात? तुमच्या सहानुभूतीच्या नजरात? तुमच्या पाणावलेल्या इतिहासात? तुमच्या या पराजित युगात...!

वाचने 3703 वाचनखूण प्रतिक्रिया 13

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 26/06/2014 - 10:39
अजून वाचायला आवडतील कविता. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

मिसळलेला काव्यप्रेमी 26/06/2014 - 19:47
हि झकास जमलीये....

मिसळलेला काव्यप्रेमी 26/06/2014 - 19:48
हि झकास जमलीये....

एस 07/07/2014 - 10:32
छान केलीय कविता. काही व्याकरण-शुद्धलेखनाच्या चुका टाळा. उदा: माञ -> मात्र निश्चिल -> निश्चल धर्नुधर -> धनुर्धर नजरात -> नजरांत

आयुर्हित 07/07/2014 - 10:40
कोणी नाकारले म्हणूनच शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले मी धर्नुधर झालो अभिनंदन, खुप चांगला संदेश दिला आहे.