वारी
लेखनविषय:
काव्यरस
श्वासांतून वाहे
सावळा मुरारी..
पायी चाले वारी
पंढरीची||
सावळ्या डोहात
सावळा तरंग
भक्तिरूपी दंग
वारकरी||
बंधने जुनी का
भासती विजोड
देहा लागे ओढ
विठ्ठलाची..||
अधिरश्या जिवा
पावलांची साथ
वसे अंतरात
भक्तियोग ||
पाहता लोचनी
विठ्ठल सावळा
तप्त जीव भोळा
श्रांत होई ||
विष्णुरूपी लीन
होवून मरावे
अंतास उरावे
विष्णूरूप ||
अदिती जोशी
वाचने
3293
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
सहज सरळ असे
In reply to सहज सरळ असे by अत्रुप्त आत्मा
+१
साधी सोपी गोड कविता.
आवडलं!
सुरेख...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aaj Phir Tumpe Pyaar Aaya Ha... ;) :- Hate Story 2आवडली कविता.
सुरेख!!
सुंदर.