प्रश्न निसर्गाला
लेखनविषय:
१ प्रश्न विचारला गाजराला - तोंड तुझे जमिनीत तरी घेतोस कसा तू श्वास?.
उत्तर अगदी सरळ आहे जसा बाळाचा आईच्या नाळेतून प्रवास .
मग प्रश्न विचारला त्याच्याच पानाला - हाथावरती रेष्या एवढ्या तुझ्या,तुझ्या भविष्याचे काय रे?
पाऊस आला तर भिजायचं , वारा आला तर झुलायचं बाकी असं काहीच नाय रे.
१ प्रश्न नारळाला - पोटात एवढे पाणी तुझ्या , तुला जलोदर नाही का होत?
वेड्या.... पाण्यासाठीच जन्मलोय मी, फुगवून माझे पोट.
मग प्रश्न विचारला मी झाडाच्या तु-याला - तू इतका नाजूक दिसतोस रे पण काजळाची मला कमतरता जाणवते?
अरे मुद्दामच लावत नाही मी कारण काजळाने नेहमी डोळे पानावते.
मग मी प्रश्न विचारला थेंबाला - एवढ्या जोरात वरून पडतोस मार नाही का बसत काही?
मांजरासाराखेच माझे काहीसे - उभा राहतो मी दोन पायी.
आळुला १ प्रश्न - का तू जखडून ठेवतोस दवबिंदुला आपल्या या शरीरावरती?
अरे मला हि खाज सुटते रे - खाजवतो तो माझ्या कानाभोवती.
शेवटी प्रश्न रोपट्याचा दाण्याला - एवढास जीव तुझा,तू पेलावतोस कसे रोपटे?
तू प्रश्नच चुकीचा विचारलास - आपलाच भर आपल्याला नसतो रे
वाचने
1288
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
"आपलाच भार आपल्याला नसतो रे!"
खरे आहे.
खुप चांगले निरिक्षण आहे आपले. लगे रहो!!
In reply to खुप चांगले निरिक्षण by आयुर्हित
एकच प्रश्न विचारतो आपला सर्वत्र संचार कसा?
काही कुठे तर काही कुठे पण पत्ता लागेना विषयाचा?
खुप चांगले निरिक्षण