मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सौंदर्यवती तू ......

psajid · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
असं गं रक्तिम मुख तुझं जसं मिटल्या लाजाळूचं पान , त्यावर टेचात चालणं गं वळवी वैराग्याची मान !! मीच थिटा वर्णू कसा सृष्टीत तूच महान, सुरमयी कटी सखे तुझा कुमुदिनीचा वाण !! एक पाचोळाच मी सखे ज्याला कुठून देहभान ? मन आलं दबकत चाखण्या तुझे ओठ रंगले पान !! बेहोष गंध तुझा तो त्यात रेखीव कमान, बेसावध तुझ्यात तू मात्र भुंग्यांना त्याची जाण !! कधी जाण हृदय हेही खुपसे तुझ्यावर कुर्बान, मला लाभावं माळण्या वेणी गजरयाचा मान !! नजरे नको प्रतारणा आता तुला मनाचीच आण, काय आहे गं सृष्टीत ? समोर लावण्याची खाण !! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी, (पलूस, सांगली)

वाचने 3535 वाचनखूण प्रतिक्रिया 10

एस Tue, 07/01/2014 - 12:48
वाळवी वैराग्याची मान !!
वळवी वैराग्याची मान हे बरोबर की वाळवी वैराग्याची मान हे बरोबर याचा विचार करतोय. तसं दोन्ही बरोबर आहेत म्हणा! पहिल्यात वैराग्य डचमळीत (डळमळीत असाही प्रमाणभाषेतला शब्द) होणे तर दुसर्‍यात वैराग्य संपून जाणे.

psajid Tue, 07/01/2014 - 14:53
खरेतर तो शब्द वळावी किंवा वळवी वैराग्याची मान असाच आहे. इथे कविता डकवताना तो लक्षात आला नाही त्याबद्दल दिलगीर आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !