ना केले
लेखनविषय:
कीती पाप केले, कीती पुण्य केले
कोणा हास्य दिले , कुणा शून्य केले
जरी जींकता मी हा डाव रडीचा
कधी हारण्याचे मी प्रयत्न ना केले
असा पोरका मी , जरी पोरका मी
मी तेव्हां त्या मातेला धन्य ना केले
जेव्हां सोडला तीक्ष्ण शब्दांचा मारा
तेव्हां भावनांचे मी काव्य ना केले
जरी चुकला कोणी दाही दिशांना
तरी वाटाड्याचे मी काम ना केले
दिल्या देवाने सुख सुमनांच्या माळा
तरी मुखी नाम मी 'राम' ना केले
वाचने
2057
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
जरी चुकला कोणी दाही दिशांना
तरी वाटाड्याचे मी काम ना केले
आपली चुक मान्य केल्यामूळे आनंद झाला.
परमेश्वर आपल्याला नक्किच सन्मार्ग दाखविल.
In reply to आनंद झाला. by आयुर्हित
परमेश्वर आपल्याला नक्किच सन्मार्ग दाखविल.कुठे असतो हा परमेश्वर? आणि नेहमी पब्लिकची वाट चुकायची वाट का पाहतो?
In reply to आयला! by संजय क्षीरसागर
आपले कोणतेही धर्मग्रंथ वाचलेत तर आपल्याला नक्किच कळेल की कुठे असतो हा परमेश्वर.
फक्त त्यावर विचारमंथन करुन आपल्या दुसर्या प्रश्नाचेही उत्तर मिळेल.
In reply to काय संक्षी, आता तुम्ही हा प्रश्न विचारावा? by आयुर्हित
म्हणजे काय? अहो, इथे मी एकटाच तो प्रश्न विचारतो. धर्मग्रंथात तुम्हाला सापडला की कळवा पत्ता, जाऊ भेटायला.
In reply to काय संक्षी, आता तुम्ही हा प्रश्न विचारावा? by संजय क्षीरसागर
ईश्वर (देव) म्हणजे काय? ईश्वर कसा पाहावा? ईश्वराचे पूजन कसे करावे?
याबाबत सामान्यजनांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात.
या सर्व प्रश्नांची उत्तरे संत तुकोबांनी आपल्या अभंगातून अत्यंत सुंदरपणे दिलेली आहेत...
जे का रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले ।।१।।
तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।।२।।
मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ।।३।।
ज्यासि अपंगिता नाही । त्यासी धरी जो -हदयी ।।४।।
दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ।।५।।
तुका म्हणे सांगू किती । त्याचि भगवंताच्या मूर्ति ।।६।।
जे जीव दु:खाने रंजले-गांजले आहेत, त्यासी जो आपले म्हणतो, त्यांना आपल्या जवळ घेतो तोच साधू आहे असे समजावे आणि त्याच ठिकाणी देव आहे असे मानावे. ज्याप्रमाणे लोणी आंतरबाह्य मृदु असते, त्याप्रमाणे सज्जनाचे चित्त असते. ज्याला कोणाचा आश्रय नाही, ज्याला कोणी जवळ करीत नाही, त्यांना तो आपल्या हृदयात धरतो, जवळ करतो. ज्याप्रमाणे तो आपल्या पुत्रावर प्रेम करतो तसेच प्रेम तो दास आणि दासीवरही करतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याविषयी किती म्हणून सांगू, ते साक्षात भगवंताची मूर्ती आहेत.
In reply to ईश्वर (देव) म्हणजे काय ? ईश्वर कसा पाहावा ? by आयुर्हित
फक्त तुम्हाला असा भगवंत भेटला की कळवा.
In reply to अभंग उत्तम आहे हो by संजय क्षीरसागर
धुंधला जायें जो मंझिले
इक पल को तु नज़र झुका
झुक जाये सर जहां वही
मिलता है रब का रास्ता
तेरी किस्मत तु बदल दे
रख हिम्मत बस चल दे
तेरे साथी मेरे कदमोंके है निशान
तू ना जाने आसपास है खुदा
साभार : तू ना जाने आसपास है खुदा
Lyrics of Aas Pass Khuda Song
का फक्त कवितेचे मीटर गंडवले?
*sad*
जरी चुकला कोणी दाही दिशांना
तरी वाटाड्याचे मी काम ना केले
भावलं. चुक मान्य केल्यामूळे आनंद झाला.
कुठे असतो हा परमेश्वर? आणि नेहमी पब्लिकची वाट चुकायची वाट का पाहतो?ह्या प्रश्नाचं उत्तर मी पा वरच हजारदा देवून झालाय . पण आपली चूक असताना ती मान्य न करता उठसुठ परमेश्वराच्या नावाने कोकाल्नार्यांना काही लोकांच्या टाळक्यात ते शिरलं नाही किवा मग येडगाव घेवून पेडगाव ला जायची भारी हौस दिसतीये
आनंद झाला.