पुन्हा पाऊस, पुन्हा तू...

माधुरी विनायक जे न देखे रवी...
पावसाने साद दिली नाद त्यास तुझा होता भिजलेली सर ओली चिंब स्पर्श तुझा होता... दाटलेले नभ वेडे भाराने ओथंबले थेंब आले सर सर सर मृद्गंध तुझा होता... मत्त गार गार वारा देहावरती शहारा लख्ख वीज लकाकली भास त्यात तुझा होता... मंद धुंद पावसात भिजलेल्या तन-मनात हुंकारला, आसुसला श्वास, तो ही तुझा होता...
वर्गीकरण
लेखनविषय:

10 टिप्पण्या 2,356 दृश्ये

Comments

एस नवीन

भिजलेल्या तन-मनात श्वास, तो ही तुझा होता...
वा! 'तना-मनात' असे होते सप्तमी प्रत्यय लागताना.

मिसळलेला काव्यप्रेमी नवीन

छान रचना. आवडली.

माधुरी विनायक नवीन

सर्वांनाच धन्यवाद. स्वॅप्स... बरोबर आहे तुमचं, पण मी नाद, लय लक्षात घेत तसं लिहिलंय. तुमच्या सूचनेनुसार लिहायचं तर "भिजल्या तना-मनात" असा बदल करता येईल. (गेय, नाद असलेलं काव्य आवडतं मला, म्हणून) धन्यवाद.

एस नवीन

In reply to by माधुरी विनायक

"भिज-लेल्या-तना-मनात" मी असंही म्हणून पाहिलं. मला तरी त्यातही नादमयता आणि 'टेम्पो' योग्य वाटला. किंवा 'तन्मनात' असे करून पाहिल्यास कसे वाटेल याचा विचार करतोय. असो. या गोष्टींमुळे काही फरक पडत नाही म्हणा. मला आपलं जाणवलं म्हणून सांगितलं. बाकी कविता उत्कृष्ठ. धन्यवाद!