विनोद - प्राचीन कथा
कालच्या काथ्याकूटात एक शब्द वाचला - 'बादरायण'.
मनात सहज विचार आला की हा 'बादरायण' (संबंध) शब्द आपण वापरतो, त्याचा संदर्भ (किंवा कथा) कदाचित सर्वांना माहित नसेल. शक्य असल्यास श्लोक आणि पार्श्वभूमी लिहावी असा विचार केला.
आपल्यालाही असे अनेक कथा संदर्भ (किंवा कथा) श्लोक माहित असतील. माहित असल्यास श्लोक आणि पार्श्वभूमी सह लिहा - अपेक्षा आहे चांगल्या विनोदाची !!!
तर सुरु करतोय 'बादरायण' (संबंध) कथा (श्लोकासह)
(पूर्वी ) एकदा एका गृहस्थाकडे बैलगाडीतून काही पाहुणे आले. बायकोला वाटले की नवर्याकडील पाहुणे असतील, तर नवर्याला वाटले की बायकोकडील मंडळी असतील ! (काळ पूर्वीचा होता!)
(एकदोन दिवस) आदरतिथ्य व्यवस्थित झाले. पाहुणे परत निघाले. या गृहस्थाला काही रहावले नाही आणि त्याने पाहुण्यांपै़की प्रमुखाला हळुच विचारले, "आपण कोण?"
तो पाहुणा उत्तरला,
"अस्माकं बदरी चक्रं, युष्माकं बदरी तरु: ।
बादरायणसंबंधात, यूयं यूयं वयं वयं ।"
आमच्या (बैलगाडीचे) चाक बोरीच्या लाकडाचे आणि तुमच्या दाराशी बोरीचे झाड आहे असा आपला बादरायण संबंध!
(खरं म्हणजे आपला संबंध नाही, तुम्ही ते तुम्ही ; आम्ही आमच्या ठिकाणी !
वाचने
8596
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
रामाभिषेके..
In reply to रामाभिषेके.. by शाल्मली
धन्स शालमली ..
बादरायण.
कालिदास
चायला आता खरं कुठलं
In reply to चायला आता खरं कुठलं by संदीप चित्रे
माझ्या माहितीप्रमाणे ...
शाळेत ९वी
In reply to शाळेत ९वी by भाग्यश्री
जम्बुफलानि
आम्हाला
In reply to आम्हाला by ऋचा
राज्याभिष
वैद्यराजांसंबंधी दोन
समस्यापुर्ती
लग्न . . .