अस्थी कृषीवलांच्या
पाया रचून गेले कर्तव्य जागणारे
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे
होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे
माजून तर्र काही दिसतात कर्मचारी
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे
देणार साथ काया नाही मनाप्रमाणे
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे
रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?
धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे
अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला
करतात आत्महत्त्या का देश पोसणारे?
मस्तीत चालतो मी तुडवीत कूप-काट्या
करतील आमरस्ता मागून चालणारे
देतो 'अभय' कशाला भगवंत या पिलांना
शेतीस काळ ठरती, शेतीत जन्मणारे
- गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------
In reply to मा. पंतप्रधान मोदींचे भाषण by गंगाधर मुटे
शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले. कॉग्रेस शेतकर्यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे.आणि दुसरी कडे म्हणता की
बर्याच काळानंतर देशाला पंतप्रधान मिळाला आणि या देशाला पंतप्रधान आहे, असे जाणवायला लागले आहे.तुम्ही मोदींचे कौतुक करताय की निशेध की दोन्ही की काहीच नाही ? जोवर शेतकरी डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही तोवर त्यांच्या समस्या सुटण्याची तिळमात्र आशा नाही मग मोदी प्रंतप्रधान असोत की पवार ...की जोशी !
In reply to णा़़अॅअॅ नक्की काय म्हणायचे आहे by प्रसाद गोडबोले
जोवर शेतकरी डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही तोवर त्यांच्या समस्या सुटण्याची तिळमात्र आशा नाही मग मोदी प्रंतप्रधान असोत की पवार ...की जोशी !या देशातील सत्तर अंशी कोटी शेतकरी समाज डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही, असे तुमचे एकट्याचेच मत नाहीये, गेली ३५ वर्षे मी हेच ऐकत आलेलो आहे. परंतू याच तर्हेच्या मुद्द्यावर ३५ वर्षापूर्वी मी जाहिर आवाहन केले होते की, ठीक आहे.... आम्ही साठ-सत्तर टक्के शेतकरी बेअक्कल,नालायक आहोत पण तुमच्यापैकी एखाद्या बिगरशेतकर्याने आम्हाला शेती कशी करावी, याचे मॉडेल म्हणून फक्त १ वर्ष प्रत्यक्ष शेती करून दाखवावी. आणि त्याच शेतीतील उत्पन्नाच्या बळावर जगून दाखवावे. अजूनपर्यंत एकही माणूस हे आव्हान पेलायला समोर आलेला नाहीये. दोन वर्षापूर्वी मी विद्यापिठाच्या कुलगूरूला असेच जाहिर आव्हान दिले होते. तोही पळपुटा निघाला. ते आव्हान माझ्या "वांगे अमर रहे" या पुस्तकात लेखी दस्तावेज म्हणून उपल्ब्ध आहे. किंवा कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! येथेही वाचता येईल.
In reply to कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! by गंगाधर मुटे
या देशातील सत्तर अंशी कोटी शेतकरी समाजदेशात ७०-८० कोटी लोक थेट शेतीवर (शेतीच्या उत्पन्नावर) अवलंबून आहेत, हीच खरी समस्या आहे.
In reply to खरी समस्या by सुनील
In reply to खरी समस्या by सुनील
In reply to मग शेतकर्यांना आत्महत्त्या by गंगाधर मुटे
In reply to नाही by सुनील
लोकसंख्या अन्य क्षेत्रात (उद्योग अथवा सेवा) सामावून जाणे महत्त्वाचे.अजिबात नाही. याउलट शेतीमध्येच आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि शेतीमध्येच प्रचंड रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. वेळ मिळाला तर हे वाचा.
In reply to मग शेतकर्यांना आत्महत्त्या by गंगाधर मुटे
अजूनपर्यंत एकही माणूस हे आव्हान पेलायला समोर आलेला नाहीये.आमच्याच मित्रांच्या मित्रांपैकी एकाने चांगली आयटी मधील इन्फोसिस मधील नोकरी सोडुन मिरजेला जाऊन घरातील शेती कसायला घेतली आहे ... किमान २ वर्ष झाली..मस्त चाललय त्याचं ... त्याच्याशी प्रत्यक्ष बोलतो एकदा आणि त्याची हरकत नसेल तर त्याचे डीटेल्स इथे शेयर करेन :)
मग शेतकर्यांना आत्महत्त्या करायला लावून शेतीवर अवलंबून असणार्यांचे प्रमाण कमी करायचे, असा शासकीय डाव आहे, असे म्हणायचे काय?=))))
In reply to अजूनपर्यंत एकही माणूस हे by प्रसाद गोडबोले
In reply to मा. पंतप्रधान मोदींचे भाषण by गंगाधर मुटे
कॉग्रेस शेतकर्यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे.असे आपण का म्हणता आहात हे तेवढेसे नीट लक्षात नाही आले. उपरोक्त वाक्या मागाचा आपला दृष्टीकोण अधीक विस्ताराने जाणून घेणे आवडेल
In reply to 'श्रमेव जयते' हाच मूलमंत्र: नरेंद्र मोदी by आयुर्हित
In reply to १० वर्षात ६ लाख शेतकरी आत्महत्या by गंगाधर मुटे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री}In reply to Monsanto चे BT बियाणे by गंगाधर मुटे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gori { A Band OF Boys }In reply to ते धादांत खोटे आहे. याउलट या by मदनबाण
In reply to तळपायाची आग मस्तकात by गंगाधर मुटे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- AIB:Alia Bhatt - Genius of the Yearविकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती याबद्दल एक महिन्यानंतर मी माझ्यापरिने थोडेफार योगदान देऊ शकेल.अगदी आपल्या सवडी नुसार. घाई मुळीच नाही. पण आठवणीने जरुर लिहावे. (मतांतरे चालतच असतात) बाकी आपल्या उद्दीष्टांबद्दल आदर आहेच.
मा. पंतप्रधान मोदींचे भाषण