(अशीही एक) कोजागिरी
लेखनविषय:
आलेत एकाच दिवशी पूर
चांदण्यावरच्या कवितांचे
चंद्र,भरती नि शब्द - भलतेच
गेलेत वरती म्हणायचे!
कोजागिरीला हवा कशाला
बिलियन्स् चा बेल्-आउट्?
******************
मिळतील तितके चंद्र घालून
बांधल्या असत्या कित्येक भेळी
भरतीपण मग आली असती
सांगेन तश्शी - नेमक्या वेळी
भेळवाला बघा मराठी,
'भैयाची भेळ' आउट्!
*****************
दाट सायीच्या पडद्याआडून
गोड चेहरा दिसला असता
(हाती ग्यालन् 'फॅट्-फ्री'चे, अन्
विचारसुद्धा पातळ नसता)
कुण्याकाळची याद कुणाची
छळे अशी थ्रूआउट्
*****************
वाचने
3291
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
पण हा नेमका कुठं आलेल्या पुरांबद्दल म्हणतोय?
(खुद के साथ बातां : ऐन कोजागिरीला आटीव दूध म्हणून 'शिवजी का घोटीव प्रसाद' तर नाही ना चढवला ह्या बेलानं? ;) )
चतुरंग
वेगळ्याच धाटणीची कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आवडली.
स्वगतः - कोजागिरीचा चंद्र बघताना इतके विचारा, कल्लोळ का बरे? का "फूल मून" ने केले आउट?
आलेत एकाच दिवशी पूर
चांदण्यावरच्या कवितांचे
चंद्र,भरती नि शब्द - भलतेच
गेलेत वरती म्हणायचे!
हेहेहे... झक्कास की राव...
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
कविता मस्तच वाटली! :)
तात्या.
मिळतील तितके चंद्र घालून
बांधल्या असत्या कित्येक भेळी
भरतीपण मग आली असती
सांगेन तश्शी - नेमक्या वेळी
- हे फार सुंदर
तुमाला काय म्हणायचे तो कल्ला नाही...!!
(पण मनातील विचांराची मांडणी प्रशसंनीय)
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
मिळतील तितके चंद्र घालून
बांधल्या असत्या कित्येक भेळी
कालनिर्णय कॅलेंडर मधे कोजागिरी नाहे तर कोजागरी लिहिले आहे.
मीनल.
>> मिळतील तितके चंद्र घालून
बांधल्या असत्या कित्येक भेळी
भरतीपण मग आली असती
सांगेन तश्शी - नेमक्या वेळी
ह्या ओळी तर खूपच आवडल्या :)
एक वेगळीच कोजागीरी.
मस्तच रे बेला! :)