नाटेठोम
आमची सुट्टी झ्याक.
राती अंगणात झोपायचं, सकाळी गार पाण्याची आंगोळ.
दिवसभर आंबे, खेळ.
अब्यास न्हाई. मार न्हाई.
घरात लई पावणे. आत्याची, मामाची पोरं.
त्यांच्यासंग शुद्ध बोलते.
अन्यादादान कागदाचे रंगीत तुकडे आणलेत.
मोजले म्या. सव्वीस लाल, सव्वीस काळे.
‘क्याट’ म्हनत्येत त्येला.
खेळतात ती समदी.
त्यादिशी बगत बस्ली.
सोनीदीदी अन्यादादाला “किलवर दश्शी” मागितली.
अन्यादादा बोल्ला, “नाटेठोम”.
मंग अन्यादादाने मागितलं तर राजादादाने येक पत्ता दिला त्याला.
मंग आमचा दादा राजादादाला “नाटेठोम” म्हन्ला.
म्या इचारलं “नाटेठोम? म्हंजे?”
दादा म्हन्ला, “घरात नाही”.
तितक्यात बायेर कुनीतरी आलं.
“अण्णा आहेत का पोरी?” काका इचारले.
“नाटेठोम” म्या सांगितलं.
आईने हाक मारली.
कैतरी काम असणार.
म्या म्हन्ली ” नाटेठोम”!
*शतशब्दकथा
वाचने
13969
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
आवडली कथा.
मस्त! आन्जी नवा शब्द शिकली तर! लग्गेच वापरही करुन पाह्यला! कश्शी माझी गुणाची बाय! :)
In reply to मस्त! आन्जी नवा शब्द शिकली तर by यशोधरा
कश्शी माझी गुणाची बाय! हेच म्हणते!
आन्जीची तर्हाच न्यारी. प्रतिसादाला 'नाटेठोम' म्हणताच येत नाही.
लगे रहोssss! नाटेठोम.
गोड अन्जी :)
सव्वीस लाल, सव्वीस काळे. ‘क्याट’ म्हनत्येत त्येला.:)
आन्जी रॉक्स
मस्त...
झक्कास...
त्या खेळाची आठवण झाली :-) :-):-)
आञ्जी रॉकति रॉकते!!!
(सकलाञ्जीबाललीलाकेलिप्रियः) वाल्गुदमानवः|
मस्तच !!
आवडले... आन्जी दगडसा...:)
आन्जी मस्तच...
ब्येस !
भारीये.
नवा शब्द कसा वापरायचा आन्जीला लग्गेच कळलं!
आईने हाक मारली. कैतरी काम असणार. म्या म्हन्ली ” नाटेठोम”!हे एक नंबर! कथेची रचनाही खूप आवडली
आन्जी गोड आहे. तिचे केस विस्कटलेले, दोन वेण्या असे काहीसे डोळ्यांसमोर येते. कथा आवडली.
In reply to आन्जी गोड आहे. तिचे केस by रेवती
माझ्याही डोळ्यांसमोर असेच काही येतेय. पाहूया.
काळाच्या ओघात घोळू, डिंग्री, या भाजा, भुतांखेतांच्या गोष्टी, कल्हईवाला, कंदिल, पिवडीचा रंग हे सगळे गायब व्हायला लागलेयत कसचे गायब झालेयत. जो पर्यंत चर्चगेट- विरार , छशिट- कर्जत लोकल आहेत तो पर्यंत पत्याना मरण नाही पण नाटेठोम ला भवितव्य नाही. या अजब खेळाची आठवण करून दिल्याबद्द्ल धन्स !
आन्जी हुश्शार आहे !
नविन शिकलेला शब्द कधी आणि कसा वापरायचा हे तिला बरोबर कळतं.
In reply to आन्जी हुश्शार आहे ! by मनीषा
आन्जी हुश्शार आहे ! नविन शिकलेला शब्द कधी आणि कसा वापरायचा हे तिला बरोबर कळतं.
यावेळी मात्र आन्जी निरागस वाटली नाही. थोडे वय वाढल्याने "निरागसपणा दाखवत स्वतःचे काम कसे करून घ्यावे" हे समजण्याची हुशारी आन्जीला आली आहे असे वाटले.
बाकी शशक आवडली.
In reply to ह्म्म्म... by योगी९००
हळु हळु. (बनायला हवीच हे वैयक्तीक मत)
:) आडौली. :)
आन्जे करून घे नखरे जोवर पावने हायेत घरात तवर. एक डाव जाऊ दे त्याईले मंग आई अण्णा दावतील तुले नॉट्याठोम म्हंजे काय -हायते थे.
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
हा हा हा हा हा ..लईच !
नवा शब्द कळाला आन्जीमूळे.
ते `नॉट अॅट होम´ असावे
मोजक्या शब्दातील कथा आवडली.
अशा गोष्टी वाचल्या ना... की दिवस यकदम ग्वाड होउन जातो बघा. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}
आवडली कथा.