मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शाही मुरांबा

अनन्न्या · · पाककृती
साहित्यः एक डझन तयार पण घट्ट हापूस आंबे, साखर, लवंगा ४/५, वेलची दाणे( खरं तर या मुरांब्याला हापूस आंब्याचा इतका सुंदर सुगंध असतो की वेलची पण फिकी पडते.) muramba कृती: फोटोत दाखवल्याप्रमाणे आंब्याच्या दोन्ही बाजूचे काप काढून त्यावर उभ्या आडव्या रेघा मारून चमच्याने फोडी काढून घ्याव्यात. तयार फोडी मोजून घ्याव्यात, जेवढ्या फोडी असतील तेवढीच साखर घ्यावी. साखर, लवंगा, वेलची दाणे सगळे एकत्र मिसळून दोन तास झाकून ठेवावे. साखर विरघळली की मिश्रण कढण्यास ठेवावे. muramba मिश्रण अधून मधून ढवळत रहावे. पुरेसे घट्ट झालेय असे वाटले की डीशमध्ये थेंब टाकून पहावा. थेंब पसरत नाही असे वाटले की झाला मुरांबा तयार! आत्ता आंबे मिळतायत तोपर्यंत मुरांबा बरणीत भरून ठेवावा, एकदा सिझन संपला की मुरांबा खाऊन आंब्याची कसर भरून काढता येते. कोणत्याही मोसमात आंब्याची मज्जा! muramba

वाचने 12627 वाचनखूण प्रतिक्रिया 26

तुमचा अभिषेक 21/05/2014 - 19:11
मुरांबा.. सह्ही.. हा तर खूप आवडीचा, अगदी शाळेत असल्यापासून डब्यात नेतोय.. खास करून चपातीबरोबर चण्यावाटाण्याची उसळीसारखी तिखट भाजी असली की हा तोंडाला लावायला आणखी मजा येते. पण एक प्रश्न - याला शाही का म्हटले आहे? सहजच की याला साधा मोरंबा पासून शाही बनवायला काही स्पेशल यात टाकले आहे तर सांगा, म्हणजे तसे आईपर्यंत पोहोचवता येईल. बाकी तिची पद्धत अशीच आहे की भिन्न हे मला सांगता येणार नाही, मी जास्त ढवळाढवळ करत नाही स्वैंपाक घरात..

पिंगू 21/05/2014 - 19:15
हापूस आंब्याचा असा मुरांबा कधी बघितला नाही. फक्त एक शंका आहे की, साखरेचे प्रमाण आंब्यांच्या फोडींच्या वजनाइतकेच घ्यावे ना. बाकी मुरांब्याची चव किती शाही लागेल, याचाच विचार करतोय..

प्रभाकर पेठकर 21/05/2014 - 19:59
ह्या मुरांब्यावर, पातळ केलेले, घरगुती, शुद्ध साजुक तुप, कमीतकमी १ टेबलस्पून, घ्यायचे आणि स्वर्गसुखाचा अनुभव घ्यायचा.

In reply to by प्रभाकर पेठकर

काकाकाकू 21/05/2014 - 22:04
अगदी बरोबर! लहानपणीची आठवण झाली.....आता १ टेबलस्पूनभर तूप घेतले तर आठवडाभर किमान १ तास जास्त चालायला लागेल!

सानिकास्वप्निल 22/05/2014 - 04:48
खूप आवडतो हापूसचा मुरांबा :)

दिपक.कुवेत 22/05/2014 - 11:31
पण साखरे एवजी गुळ घातला तर?? अधीक चविष्ट होईल का??

अनन्न्या 22/05/2014 - 11:49
गूळ कितपत चांगला लागेल माहित नाही, कच्च्या आंब्याचा गुळांबा चांगला लागतो. बाकी तूप घालून मुरांबा खरच सुंदर लागतो. @ पिंगू, हापूसांब्याच्या मुरांब्याच्या चवीबद्दल शंका?, एकदा करून , खाऊन बघाच! साखरेचे प्रमाण आंब्याच्या फोडींइतकेच घ्या. सर्वांचे आभार! आंबे मिळतायत तोवर करून ठेवा.

In reply to by पिंगू

नाही होत रे. शंकाच असेल तर आधी मोजून चार आंब्याचा करुन बघ, नाही परत जास्तीचा केलास तर सगोत्री स्त्रीडूआयडी घेईन मी !! ;)

इशा१२३ 22/05/2014 - 11:57
मस्त आहे मुरांबा.आवडतोच...

सविता००१ 22/05/2014 - 15:50
हाल करते आहेस तू, इतके सुंदर पदार्थ देऊन. पण मी केलाय यावेळी. त्यामुळे नो जळजळ :)

सुधांशुनूलकर 22/05/2014 - 16:48
नुसत्या आठवणीनेच तोंडाला पाणी सुटलं. आम्ही दर वर्षी करतो. या वर्षी मात्र राहिलाय खरा...

मदनबाण 22/05/2014 - 20:27
ऑ... असा पण मोरांबा करतात ? फळांचा राजाच... त्यामुळे बाय डिफॉल्ट शाही ! ;) पण... हा लवकर खराब होत नाही ना ? { शिल्लक राहिला/ठेवला तर खराब होइल ना ! ;) } ;;; ;; ; मोरांबा की मुरांबा ? ;)

अनन्न्या 23/05/2014 - 18:28
@मनिष, फोडी ज्या वाटीने, भांड्याने मोजून घेवू त्याच भांड्याने तेवढीच साखर घ्यावी. @मदनबाण मुरांबा कमी कढला, पातळ झाला तर नाही टिकणार, पण व्यवस्थित घट्ट झाला तर वर्षभर टिकतो. आमच्याकडे मुरांबा म्हणतात...तुम्ही मोरांबा म्हणा चव बदलणार नाही ती शाहीच राहणार!! *smile*

In reply to by अनन्न्या

मदनबाण 26/05/2014 - 13:07
मदनबाण मुरांबा कमी कढला, पातळ झाला तर नाही टिकणार, पण व्यवस्थित घट्ट झाला तर वर्षभर टिकतो. ओक्के. :) अरे हो आधीच्या प्रतिसाद जे सांगायचे राहिले होते ते सांगतो, पहिल्या फोटोतल्या आंब्याच्या फोडी अगदी मस्त कापल्या आहेत.

सस्नेह 23/05/2014 - 22:19
मी गोवी आंब्याचा करते. हापूसचा कधी केला नाही. आता बगाहते करून. बाकी, मे नन्तर वर्षभर हापूसची आठवण आली तर चांगला पर्याय आहे हं.

स्वाती दिनेश 24/05/2014 - 19:48
मोरंबा म्हटलं की हाच असतो डोळ्यासमोर.. दुसर्‍या कोणालाही तिथे स्थानच नाही.. कैरीचा फोडींचा साखरांबा किवा गुळांबा आणि किसलेल्या कैर्‍यांचा साखरांबा पण मोरांबा म्हणजे हाच आणि हाच फक्त... (ह्या सिझनला भारतात आले तर इथे येताना याची एक लहानशी बरणी तरी असतेच सामानात..) स्वाती

In reply to by रामदास

स्वाती दिनेश 26/05/2014 - 11:23
क्या बात है.. (आता यायला हवेच , :) )