Skip to main content

पोहे बटाटा कटलेट

लेखक अस्मी यांनी गुरुवार, 17/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
परवा कांदेपोहे करायला पोहे भिजवले होते...पण ते जरा जास्तच झाले मग थोडे पोहे वगळले. मग त्या उरलेल्या पोह्यांचे कटलेट्स करायचे ठरवले :) साहित्य:- तीन बटाटे ३ वाट्या जाड पोहे ४-५ ब्रेड स्लाइस चवीनुसार मीठ आले-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट तळण्यासाठी तेल बेसन कृती:- १. बटाटे उकडून घ्यावेत. २. पोहे चाळणीत भिजवून निथळत ठेवावेत. ३. ब्रेडचा बारीक चुरा करून घ्यावा. ४. भिजलेले पोहे, कुस्करलेले बटाटे, आले-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट, ब्रेडचा चुरा, मीठ असे सगळे चांगले मिक्स करुन घ्यावे. ५. आता ह्या मिश्रणाला हाताने किंवा साच्याने आकार देउन छान कटलेट्स करुन घ्यावे. ६. नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करत ठेवावे. दोन्ही बाजूने रवा लावून गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यावेत. ७. सॉस/ चिंचेची चटणी/ हिरव्या चटणी सोबत सर्व करावे. cutlet तय्यार आहेत..पोहे-बटाटा कटलेट्स P.S. पाकृ टाकण्याचा तसा पहिलाच प्रयत्न आहे..त्यामुळे सांभाळून घ्यावे :)

वाचने 17591
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

हाय! हाय!! दिलं कटलेट,कटलेट हो गया!

छान दिसतायेत. एकदा करुन बघतो.

कांदेपोहे उरले ही घटना कधीच घडत नसल्यामुळे डायरेक पोह्यांचे करावे लागतील. बघू प्रयत्न करून! आणि पाकृ आगदी सिस्टिम्याटिक लिहिलीस. नवीन काही केलंस की नक्की इथे टाकत जा!

In reply to by पैसा

असेच म्हणतो. पोहे उरतात?????? पी जे: सचिन तेंडुलकर लेट कट मारायचा. त्याला आवडत असतील का कटलेट्स ?

मस्त दिसताहेत कटलेट्स. यात भाज्या घातल्या तर आणखी मजा येईल.

सध्या सुट्ट्या चालू असल्याने रोज नविन काय मेनु,ते कळतच नाही, यासाठी मिपाचा पाकृ. विभाग खूप मदत करतो. अजुन नविन रेसिपी नक्की शेअर कर गं!

यातले पोहे वगळता अगदी हाच पदार्थ स्नेहातै कोल्हापूरच्या कट्ट्याला घेवून आली होती. मस्त लागतात चवीला.

बेसन सगळ्या मिश्रणातच घालायचे ना? माझ्याकडे आत्ता नेमके २ ब्रेड स्लैसेस आहेत. मग २ बटाटे, २ वाट्या पोहे घेऊन पदार्थ करते.

In reply to by तुमचा अभिषेक

पैजारब्वांचा प्रतिसाद कळलेला दिसत नाय, चला माझ्या प्रतिसादावरुन हिंट देतो. >>संकष्टी नसेल तर घालायला हरकत नसावी म्हणजे अशी तिथ बघून अंडी घालता येतात? नाय त्याचं काये, अंडी घालण्याचा अन्भव नाय ना!! ;)

पोहे फार च आवडीचे, बटाटे त्या खालोखाल, कटलेट हा प्रकार मात्र फारसा आवडीचा नाही, दिसतेय तर तसे छानच, पण आमच्याकडे असा खटाटोप करण्यापेक्षा पोहे आवडतात तर गप खा ना तेच असेच सुनावले जाईल याची फुल खात्री ..

केले मी. छान झाले होते. धन्यवाद सोप्या पाकृ बद्दल

आज केले हे. भिजलेले थोडेसे पोहे आणि २ लहान बटाटे होते हाताशी. थोडेसे बदल केले ते असे - म्हणजे जे जिन्नास आयत्यावेळी हाताशी होते ते वापरले - तिखट, गरम मसाला पूड आणि किंचित साखर घातली चवीला. १ टेस्पू बेसनपीठ आणि ३ टीस्पू दही घातलं स्मूथ मळण्यासाठी. कोथिंबीर अगदी बारीक कापून तशीच मिसळली लगद्यात. आणि कटलेट्स थापली. मस्त झाली होती चवीला आणि लग्गेच फन्नाही उडाला! धन्यवाद अस्मी! :)

डीप फ्राय की शॅलो फ्राय ?