Skip to main content

मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 09/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
. "" मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी -"" (चाल- भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी) मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी अर्ध्यावरती नाद सोडला मतदानावर पाणी ... नवरा वदला "मला ग नाही, नावाची ती आशा माझ्या नावापुढेच आहे 'मयत' खुणेची रेषा " का भार्येच्या डोळा तेव्हा भरून आले पाणी ..... अर्ध्यावरती ..... भार्या वदली बघत एकएक यादीमधला फोटो "उद्या पहाते दुसऱ्या आपुल्या प्रभागात मी फोटो " पण नवऱ्याला नव्हती खात्री दूर बसे जाऊनी .......अर्ध्यावरती.... तिला विचारी नवरा- 'का हे नाव असे खोडावे ? आयोगाने पुसण्याआधी आम्हास का न पुसावे !' भार्येला ना उत्तर सुचले, झाली केविलवाणी........अर्ध्यावरती .. का नवऱ्याने मिटले डोळे 'शाईखूण' दिसताना का नवऱ्याला त्रास वाटला मतदान ते बघताना बोटावरती नजर टाकितो अपुल्या उदासवाणी .......अर्ध्यावरती .... http://mee-videsh.blogspot.in/ .
काव्यरस

वाचने 3132
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

एकदम आवडले! डोळे पाण्याने डबडबले आहेत. :)

In reply to by विकास

असेच म्हणतो :)

In reply to by विकास

असेच म्हणतो...

मस्त !

मस्त. *good*

हे मस्त जमलंय आमच्या दोन ओळी मतदानाच्या यादीमधनी गायब राजा राणी छ्या संध्ये, दिवस मोडला आली अमोलाची ती वाणी

झक्कास

प्रतिसाद देणा-या सर्वांचे मनःपूर्वक आभार !!!