मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हलकेच शिरशिरी मग ओठावरुन जाते

drsunilahirrao · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
हलकेच शिरशिरी मग .. प्रत्येक वाट येथे काट्यावरुन जाते प्रत्येक फूल येथे प्रेतावरुन जाते ! प्रेमात नेहमी या तू जिँकतोस मृत्यू माणूस जात साली जातीवरुन जाते सांभाळ या सुखांना तू जोजवीत गीते माझेच दुःख माझ्या कंठावरुन जाते ! येशील का कधी तू, ते सांग आज राणी सारी तुझी प्रतीक्षा जन्मावरुन जाते जुल्फे तुझी मुलायम करतात गूज गाली हलकेच शिरशिरी मग ओठावरुन जाते संधी अशीच येथे घाईत फार येते घोड्यावरुन येते, थोड्यावरुन जाते आताच त्या सुखाने माझा लिलाव केला सलगी अशी सुखाची अंगावरुन जाते मी कामगार आहे, मजला सुटी कशाला माझी सुटी तशीही घामावरुन जाते भलती मुजोर आहे म्हणतात लोकशाही खुर्चीवरुन येते, खुर्चीवरुन जाते निश्चित टेबलाच्या खालून काम होते सारीच काळजी बघ नोटांवरुन जाते स्वस्तात फार आता विकलास तू महात्म्या साली इमानदारी पोटावरुन जाते करतात ते समीक्षा आता भल्याभल्यांची पण बालगीत त्यांच्या डोक्यावरुन जाते ! डॉ.सुनील अहिरराव

वाचने 3150 वाचनखूण प्रतिक्रिया 12

संधी अशीच येथे घाईत फार येते घोड्यावरुन येते, थोड्यावरुन जाते कदाचित इथे मी स्वतःला रिलेट करु शकलो असेन आणि बाकीच्या शेरांमधे दुसरी ओळ प्रभावी झाली नसल्यानं असेल.

In reply to by अत्रुप्त आत्मा

एस Wed, 05/07/2014 - 18:59
बर्‍याच दिवसांनी चांगलं काव्य आलं बोर्डावर.
प्रामाणिकपणे सांगायचं तर शीर्षकावरून काहीतरी आलतूफालतू असेल असे वाटले होते त्यामुळे वाचायचंही टाळलं होतं. पण प्रचंड भेदक काव्य आहे. सलाम! मिपावरी येती ढीगभराने जिलब्या नजरेतुनि सहजी ही गज़ल सुटून जाते...

drsunilahirrao Tue, 05/06/2014 - 12:15
संजय क्षीरसागर, अतृप्त आत्मा, सूड आभारी आहे. एकदोन ठिकाणी अलामत चुकली आहे. त्यात जमेल तसे बदल करेन. उदा. हा एक शेर बदलून याप्रमाणे प्रेमात नेहमी या तू जिंकतोस मृत्यो माणूस जात साली धर्मावरुन जाते