आमची प्रेरणा: 'साप्ताहिक प्राजक्त' विचार धन - १. शास्त्रार्थ वाद
मित्रांनो,
नुकतेच 'साप्ताहिक प्या-फक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील काही भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे.
'श्री मच्छराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे, "श्री मच्छराचार्य व खंडनमिश्र यांच्यात शास्त्रार्थ वाद करायला सुरवातीला प्रतिज्ञा झाल्या. त्या प्रतिज्ञेत आचार्यांच्या मते सदाशिवपेठ म्हणजेच पुणे, आणि तेच अखिल विश्वाचे केंद्र, तर खंडनमिश्रांचे मते रविवारादि सर्व पेठा, पाषाण, कोथरूडादि सर्व मिळून होते ते पुणे, तसेच जगातल्या कोणत्याही स्थानास केंद्र मानले जाऊ शकते, त्यात पुण्याची मातब्बरी काहीही नाही' असे प्रतिपादन केले.
'पराभव झाला तर मी चिंचवडातले स्वत:चे मोठे घर सोडून सदाशिव पेठेत भाड्याच्या एका खोलीत शिफ़्ट करेन! असे खंडनमिश्र म्हणाले तर 'या शास्त्रार्थात पराजित झालो तर सदाशिवपेठेतील वेदकालीन पूर्वजांच्या वाड्यातील खोली सोडून पार पुण्याबाहेर कोथरूडादि कोणत्यातरी नीच वस्तीत परांगदा होईन, असे आचार्यांनी म्हटले. आचार्यांच्या दृष्टीकोनातून अखिल विश्वाचे केंद्रस्थान असलेल्या सदाशिव पेठेत रहाणे महत्वाचे तर खंडनमिश्रांचे मते कुठेही राहिले, तरी पोटासाठी धडपड ही करावीच लागते, असे म्हटले गेले. त्या दोघांमधील शास्त्रार्थात मध्यस्थी करण्याचे (म्हणजे निर्णय देण्याचे) उत्तरदायित्व मिश्रांची पत्नी उभयभारतीने स्वीकारले.
बराच रंगलेल्या वाद-विवादानंतर उभयभारती स्वयंपाक करायला उठत म्हणाल्या, 'हा पूर्ण खंबा आणि चखणा ठेवते. शेवटी आडवे होताना ज्याच्या ग्लासात उरलेली असेल, तो हरला असे समजले जाईल. तुमचा शास्त्रार्थ चालू दे.'
(हा शास्त्रार्थ-वाद सदाशिव पेठेतील आपल्या खोलीतच व्हावा, असे मच्छराचार्य यांचे मत होते, परंतु तसे झाल्यास अधून-मधून आचार्य "तुम्ही बसा, मी चहा 'घेऊन' येतो" असे म्हणत उठून पडद्यापलिकडील किचनात जाऊन स्वत: चहा पिऊन मिश्या पुसत बाहेर येऊन पुन्हा वादास लागतील , याची खात्री असल्याने उभयभारतीने अत्याग्रहाने चिंचवडातील आपल्या प्रशस्त घरात हा कार्यक्रम घडवून आणला होता.
पात्रपरिचयः 'मच्छराचार्य' यांचे मूळ नाव मध्या आपटे, बी. ए. (फ़र्स्ट क्लास) असे असले, तरी अगदी पेद्रू शरीरयष्टी, आणि केंव्हाही, कुठेही, कश्यावरही वाद घालण्याची खुमखुमी, यामुळे 'मच्छराचार्य' या उपाधीस प्रप्त झालेले होते. वैदिक काळापासून त्यांचे पूर्वज सदाशिव पेठेत वसती करून असल्याचे पुरावे त्यांजपाशी असल्याचे ते सांगत.
खंडनमिश्रांचे पूर्वज म्हणजे खुद्द पिताश्री लल्लन मिश्रा हे यूपीतील कुण्याश्या कुग्रामातील शेतमजुरीच्या कामाला कंटाळून पुण्यनगरीत आले, आणि गळ्यात टोपली अडकवून बनारसी पान विकण्याच्या कामातून बघता बघता गडगंज होऊन चिंचवडास बंगला बांधून स्थायिक झाले).
...
या पार्श्वभूमीवर आता महत्वाचा प्रश्न असा की या शास्त्रार्थाला आज माझ्या जीवनात काय स्थान आहे? मी हे का समजून घ्यावे?
सदाशिव पेठ म्हणजेच काय ते पुणे असे न मानणारे अनेक जण आजही आहेत. लौकिकार्थे ते सुखी व समृद्ध आहेत. सदाशिव पेठेशी मला काही देणेघेणे नाही, असेच ते म्हणतात. वैयक्तिकरित्या मला त्यांच्या बद्दल आदर आहे. परंतु सदाशिव पेठ हेच अखिल विश्वातील एकमेव राहण्यायोग्य स्थान नाही , असे त्यांचे मत का असावे? याबाबत मला कुतुहल आहे.
मित्रामित्रांमधे चर्चा होते. त्यावेळी लहान मुुलगा आपल्या मोहल्ल्या बाबत केवढा निरपेक्ष अभिमान व्यक्त करतो. त्यापलिकडे विचार त्याच्या मनाला शिवतही नाही.
आजचा ३५ वर्षे वयाचा तरूण त्याच भावनेने सदाशिवपेठेचा चा अभिमान का बाळगत नाही? त्याबद्दल विश्वास व्यक्त करायला का लाजतो? खंडनमिश्रांसारख्या सदाशिव पेठेचे महात्म्य न मानणाऱ्या एका श्रेष्ठ अभ्यासकाला आचार्य जर आपला सिद्धांत पटवून देऊ शकले, तर त्याच आचार्यांच्या शिकवणूकीवर आजचा तरूण का चिंतन करत नाही?
वडिलांची भूमिका बजावणाऱ्या आजच्या ४० व्या वयोगटातील मुलामुलींना सदाशिव पेठेबद्दल काय माहिती आहे? ४५ व्या गटातील आजचा तरूण अनंगरंगरतिशास्त्र, वात्सायनाचे कामसूत्र इत्यादी ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचन का करत नाही? त्यातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही? या ग्रंथांचे असे अवमूल्यन करून डेलीमोशन गोसेक्स्पोड इत्यादिंचा अंगिकार का करतो? हजारो वर्षे चालत आलेली आपली दिव्य परंपरा गेल्या ५० वर्षात कालबाह्य झाली असेल का?
तरुणांनी आपले मत, आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करावेत ही नम्र विनंती.
टीप: सदाशिव पेठ हेच खरे पुणे, आणि ते अखिल ब्रम्हांडाचे केंद्र होय, हे ज्यांना मान्य असेल, त्यांच्यासाठी ही विचारणा आहे. ज्यांना ती अद्याप अमान्य आहे त्यांना या चर्चेत रस नसावा. कारण आचार्यांच्या वरील शास्त्रार्थातून खंडन मिश्र यांचा पराभव झाला व त्यांनी आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. आचार्यांचे मत ज्यांना मान्य आहे परंतु त्याकडे विचार करायला आजचा तरूण वर्ग उदासीन का? हा प्रश्न आहे.
वरील विचार त्या लेखकाचे (त्यांचे नाव छापलेले नाही) आहेत. ते फक्त विचारार्थ आम्ही सादर केले आहेत.
वाचने
15775
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला.
=))
(No subject)
आणि केवळ लगे रहो !!
ठ्ठो ठ्ठो चित्रगुप्तांची
चित्रे गुप्त ठेवून लिवलेल्या
+११११
In reply to चित्रे गुप्त ठेवून लिवलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
खनदन मिसरा हेकाय अहे? अनि
तमुचि भशहा वचुन मिसराककानि
In reply to खनदन मिसरा हेकाय अहे? अनि by बालगंधर्व
स्वाक्षरी भारी हो!
In reply to तमुचि भशहा वचुन मिसराककानि by डॉ सुहास म्हात्रे
__/\__
@सदाशिव पेठ हेच खरे पुणे, आणि
हीहीहीही!
मी साधारणपणे आपल्या मतांशी
नाही.
In reply to मी साधारणपणे आपल्या मतांशी by असंका
पण मी काय म्हणते .....
सदाशिव पेठच अखिल ब्रम्हांडाचे
In reply to पण मी काय म्हणते ..... by मनीषा
सदाशिव पेत बददल मज्या फार
In reply to सदाशिव पेठच अखिल ब्रम्हांडाचे by आत्मशून्य
सदाशिव पेत बददल अपेकशा
In reply to सदाशिव पेत बददल मज्या फार by बालगंधर्व
डुआयडी कळाला बरे का कुणाचा
In reply to सदाशिव पेत बददल मज्या फार by बालगंधर्व
अहो तिथे तुम्ही कशाला केंद्र हुडकायला गेलात ?
In reply to सदाशिव पेत बददल मज्या फार by बालगंधर्व
आर.ओ.एफ.एल.
म्हणिजे काय
In reply to आर.ओ.एफ.एल. by कॅप्टन जॅक स्पॅरो
Rolling On FLoor
In reply to म्हणिजे काय by चित्रगुप्त
स्मायलीवाले यात कसे काय
ब्ब्बाब्बौ ..............!!
ज्यांना पिणे हे व्यसन वाटते
एकच नंबर
बदकांबरोबर पोहलात तर शिकाल
In reply to एकच नंबर by एस
.
In reply to बदकांबरोबर पोहलात तर शिकाल by कंजूस
ळॉळ
लोल !
हे वाचायचेच राहिले होते. एका
अद्वैत सिद्धांत
एक नम्र सुधारणा
In reply to अद्वैत सिद्धांत by चित्रगुप्त
चित्रगुप्त चि. वि. जोशी बनू
शुक्रगुजार