माझी बायपोलर डिसॉर्डर
"मी उद्याची अपॉईंट्मेन्ट घेतली आहे, एकतर तू सायकिअॅट्रीस्ट कडे चल किंवा मला घटस्फोट दे. या दोनांव्यतिरीक्त दुसरा पर्याय मी तुला देत नाही."आजवरच्या आयुष्यात मी ऐकलेले सर्वात प्रभावी अन निर्वाणीचे वाक्य/संवाद. ज्या वाक्याने अन पुढील घडामोडींनी संपूर्ण आयुष्यालाच एक सकारात्मक कलाटणी मिळाली असे हे वाक्य मी तब्बल ९-१० वर्षांपूर्वी ऐकले. ऐकले अन तेव्हा मी घाबरले. मला कळेचना माझा नवरा असे का म्हणतो आहे? म्हणजे भांडणे तर सर्वांकडे होतात. नवरा-बायको म्हटले की मतभेद हे अनिवार्यच नाही का? हां आता आमची वरचेवर होतात, रोज होतात, मी आदळाअपट करते अन तो घराबाहेर निघून जातो, मी रडते, धुसफुसते अन मग शांत होते पण म्हणून मी वेडी आहे? हा मला वेडी ठरवतोय? होय सायकिअॅट्रीस्ट्कडे जाणे/दाखविणे म्हणजे वेडे असणे हीच माझीदेखील समजूत होती. मला हे दिसत नव्हते, कळत नव्हते की मी अतिशय अॅग्रेसिव्ह होते आहे, सतत भांडते आहे, वस्तू फेकते आहे. रात्री मी दचकून उठे.... रोज रोज रोज!!! पण मला वाटे सर्वांना निदान बर्याचजणांना ही समस्या असते. मला बर्याच रात्री झोप नीट लागत नसे. कधी अतिशय शांतीचा अनुभव येई तर ९०% वेळा पूर्वायुष्यातील वाईट साईट प्रसंग आठवून, अंगाची लाही लाही होई. सतत चिडचिडेपणा, अति अन निरर्थक आवेश (अॅग्रेसिव्हनेस) अन भांडखोर वृत्ती. अन शिवाय माझी "साडेसाती" चालू आहे हे का नाही विचारात घेत हा? साडेसाती संपली की हे सर्व बंद होईल. होईल???? ______________________________________________________ दुसर्याच दिवशी आम्ही पटेल डॉक्टरांकडे गेलो. मी एक प्रश्नावली भरली व वाट पहात आम्ही वेटींग रुम मध्ये बसलो. खूप गर्दी होती. पण ते सर्व लोक वेडे होते अन माझी खात्री होती मी त्यातली एक नाही. माझा आत्मविशवासच दांडगा होता, अन स्वतःबद्दलच्या कल्पना अनरिअॅलिस्टीक!!! मला माहीत होते आम्हाला डॉक्टर "मॅरेज काऊन्सिलींग" बद्दल काही सांगतील अन मग सुट्टी!! पण आमची वेळ आली, डॉक्टरीण बाई ५-७ मिनीटे माझ्याशी बोलल्या अन निदान झाले - ------बायपोलर डिसॉर्डर!!!------ मला काही गांभीर्य लक्षात आले नाही कारण ते कळण्याची माझी मनस्थितीही नव्हती ना माहीती. त्या दिवशीच प्रिस्क्रिप्शन दिले अन प्रायोगिक तत्वावर माझी औषधे तत्काळ सुरु केली गेली. ____________________________________________________________ घरी आल्यावर मी वाचले अन मला कळले - हा एक गंभीर स्वरुपाचा मानसिक आजार आहे, मेंदूतील असंतुलनाचे निदर्शक असलेला. एक प्रकारची मूड डिसॉर्डर!!! या आजारात एखाद्या लंबकाप्रमाणे मूड हेलकावे खातो. नैराश्याची गर्ता अन उन्मादाचा पिसाटपणा या दोहोंच्या मध्ये मूड हिंदोळे घेत रहातो. भयंकर!!!! माझा विश्वासच बसेना.
नाही मी सांगते घरातच दोष आहे. वास्तुदोष!!! वास्तुदोष!! भूत आहे हो घरात. हे घरच पछाडलेले आहे. घर बदलले तर सर्व काही सुरळीत होईल. अगदी १००%...........मी २० वर्षाची असताना, या विश्वासातूनच आम्ही घर बदलले. कारण? कारण मला रात्री भयस्वप्ने पडत. दरदरुन घाम फुटे अन मी आई-बाबांकडे धाव घेई त्यांना तक्रार करे. मला इरॅशनल भीती वाटे - मी घर गिळेन याची, मी गादी गिळेन , मी टीव्ही गिळेन ........ अगदी अगदी इरॅशनल असे पण माझा कंट्रोल नसे. पण भयंकर भीती वाटे..... पॅनिक अॅटॅक्स!!! सर्वांची खात्री होती भूत अन वास्तुदोषाबद्दल. अर्थात घर बदलूनही काही फायदा झाला नाहीच मला रात्री किंचाळ्या ऐकू येणे चालूच राहीले. पण वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने, माझी मात्र अपरिमीत हानी झाली - अभ्यासावर परीणाम झाला, लग्नानंतर कौटुंबिक स्वास्थ्याची पूर्ण वाट लागली. _____________________________________________________ पटेल डॉक्टरांनी ताबडतोब औषधे सुरु केली. पण ती लागू पडेनात, कधी दिवसा पेंग येई तर कधी रात्री ट्क्क जाग येई. कधी अत्यंत वाईट प्रसंग आठवून मी तासन तास गुडघ्यात डोके घालून बसे .... होय अगदी सार्वजनिक ठिकाणीही. रात्री कोणीतरी चापट मारुन जागे करते आहे असले भास होत. दचकून उठणे व निद्रानाश हे तर पाचवीला पूजले होते. बरेचदा वेळ अगदी संथपणे पुढे सरके, अक्षरक्षः गोगलगाईच्या गतीने. अन्य कोणाला त्याचा त्रास होत नसे पण मला अतिशय त्रास होई. या सर्वांचे कारण होते दर ३ दिवसांनी बदलणारी औषधे अन लागू न पडणे हा फॅक्टर. दुहेरी भीती ही असे की अरे बापरे औषधे संपली तर पुढे काय - शॉक ट्रीटमेन्ट??? पण घाबरण्याचे कारण नव्हते, आता अनेक अनेक अगणित औषधे निघालेली आहेत अन शॉक ट्रीट्मेन्ट्ची खरच फारशी गरजच उरलेली नाही. निदान असा विश्वास मला डॉक्टरीणबाई देत. शेवटी औषधांचे एक कॉकटेल सापडले, ती औषधे फाइन ट्यून झाली अन हळू हळू मी बरी होऊ लागले. अक्षरक्षः आमूलाग्र बदल घडू लागला. मूड, व्रुत्ती, विचार, स्वप्ने सार्यात बदल घडू लागला.अन अक्षरक्षः स्फिन्क्स पक्षासारखी झेप घेत मी बरी होऊ लागले. कधीही दुसर्याचा तीळमात्र विचार न करणारी मी, माझ्या घासातून घास वेगळा ठेऊ लागले. सततची चीड्चीड संपली, तिची जागा शांततेने घेतली अन मुख्य म्हणजे काही पूर्वायुष्यातील काही भयंकर प्रसंग आयुष्यात पहील्यांदा विस्मृतीत गेले. मला जग सकारात्मक भासू लागले. स्वप्नेही लॉजीकल सिक्वेन्स असलेली पडू लागली. कमाल आहे या औषधांची! जे जग खरच वैर्यासारखे भासे तेच आता आनंददायक वाटू लागले. ____________________________________________________ नवर्याने या आजारात अथक अथक अन निव्वळ अमेझिंग साथ दिली. हे माझे पूर्वसुकृत अन पुण्याइ का काय माहीत नाही पण जिथे सर्वांनी होय सर्वांनी त्याला सांगीतले होते की हिला वेड्यांच्या इस्पितळात फेकून दे, तिथे त्याने मला चिकाटीने त्या नरकातून बाहेर काढले. मला रोज व्यायाम करायची सक्ती केली, फक्त कॉम्प्लेक्स अन पौष्टीक अन्न खाण्याची सवय अंगी बाणवली. माझ्या झोपेच्या वेळा आम्ही "रिलीजसली" पाळू लागलो. आयुष्याला एक वलण आले, एक क्वालिटी आली. हा आजार बरा होत नाही. मी मेल्यावरच हा संपणार पण ... पण ....समाधानाची बाब ही की "अत्यंत प्रेडिक्टेबल अन मॅनेजेबल" आहे. औषधे-आहार-निद्रा व व्यायाम या चार भक्कम पायांवर डोलारा सांभाळला की हा आवाक्यात येतोच येतो. तरता येतो. आहे भयंकर पण वेसण तुमच्या हातात असते.
In reply to मानसिक आणि शारीरिक आजारात फ़रक by सुबोध खरे
In reply to एक विशेष सूचना by सुबोध खरे
In reply to काळजी... by प्रभाकर पेठकर
In reply to मुंबईत by राही
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
In reply to डॉ. शेट्टी by आजानुकर्ण
In reply to अपॉईंटमेंट घ्यायची गरज पडलीच by सूड
In reply to येथे by आजानुकर्ण
In reply to मुंबईत by राही
In reply to पुण्यात उल्हास लुकतुके ( by प्रसाद१९७१
In reply to पुण्यात उल्हास लुकतुके ( by प्रसाद१९७१
In reply to काळजी... by प्रभाकर पेठकर
In reply to काळजी... by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
In reply to धाडसी आणि प्रांजळ आत्मकथन आवडले. by राही
In reply to लेख अप्रतिम आहे by प्रसाद गोडबोले
In reply to मनोविकार कोणता by आजानुकर्ण
कारण डिप्रेशनमुळे मी बेडमधून उठूच शकत नाही. माझे शरीर प्रतिसादच देत नाही. I literally cannot get up even though I want to.अगदी अगदी!!! तू असे विचार करु नको/तसे विचार करु नको, डोकं थंड ठेव अशा सूचना लाख मिळतात पण खरच कंट्रोलच नसतो. कारण मेंदूतील रासायनिक बदल!
In reply to कारण डिप्रेशनमुळे मी बेडमधून by शुचि
In reply to +१ by मूकवाचक
आपण कसल्या कसल्या प्रसंगावर मात केली आहे याचे आत्मप्रौढीयुक्त अतिशयोक्त किस्से सांगणारे काका मामा चान्स पे डान्स करून घेतात.=)) =)) तू नेहमीप्रमाणेच चौके लावलेयस :) पण खरं आहे तुझं म्हणणं. योग्य उपचार मिळणे आवश्यक असते. अन औषधाचाही गुण यावा लागतो. तेच अजानुकर्ण यांच्या खवत लिहीत होते की - इतका त्रास होतो नवीन नवीन लागू न होणारी औषधे घेऊन. त्या काळात मी संध्याकाळी "औषधे चिंतयेद विष्णुं भोजने च जनार्दनम" तसच "वैद्यनाथाष्टक" अन "वैद्यो नारायणो हरि:" असल्या छापाची स्तोत्रे म्हणत असे. खरच बुडत्याला काडीचा आधारही पुरतो, लागतो.
In reply to +१ by मूकवाचक
In reply to आत्ता वाचला by विकास
"मी उद्याची अपॉईंट्मेन्ट घेतली आहे, एकतर तू सायकिअॅट्रीस्ट कडे चल किंवा मला घटस्फोट दे. या दोनांव्यतिरीक्त दुसरा पर्याय मी तुला देत नाही."या निर्वाणीच्या वाक्यासाठी तुमच्या नवर्याने जी काही मनाची तयारी केली असेल कदाचित त्याचा अर्थ फक्त "तू सायकिअॅट्रीस्ट कडे चल!" एव्हडाच असेल. तो अर्थ समजुन तुम्ही उगाच "नवरा माझ्या विरुद्ध कट वगैरे रचतोये" असा विचार न करता सायकिअॅट्रीस्ट कडे जाण्याची तयारी दाखवली यासाठी तुमच्या वैचारीक कृतीची कितीही प्रशंसा केली तरी ती कमीच आहे. त्यामुळेच तुमच्या दोघांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पण काही स्त्रि-पुरुष/पालक असा सारासार विचार न करता असा प्रसंग आल्यास उगाच अभिव्यक्तीस्वातंत्र, टोकाची स्त्रिवादी भुमीका घेउन पार बिघडवुन टाकतात. फार जवळुन अशी उदाहरणं बघीतली आहेत. असो. कालच माझ्याबरोबर जुन्या कंपनीत सोबत असनार्या एका बायपोलर मित्राचा फोन आला,आम्ही रोज किमान तासभर तरी गप्पा मारायचो. त्याने अचानक एक दिवस रागाच्या भरात रीझाईन केल होतं. त्याची तब्येत आता चांगली झालीये आहे असं सांगत होता. आज तो आनंदी तर आहेच परत त्याने कॅपजेमीनी मध्ये अडीच वर्षे यशस्वीरीत्या पुर्ण केलीत. फार बरं वाटलं. भावी आयुष्यासाठी आपल्याला शुभेच्छा.
In reply to खूप आवडले लेखन by लंबूटांग
In reply to धन्यवाद लंबूटांग. कुत्रा एकदा by शुचि
In reply to शेवटी तुमचा निर्णय आहे पण by लंबूटांग
In reply to sorry मला म्हणायचे होते - by शुचि
In reply to व्यथा... by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकर साहेब यावर एप्रिल च्या by प्रकाश घाटपांडे
In reply to आंतरजालावर आहे? 'दुवा'.दिलात by प्रभाकर पेठकर
In reply to आंतरजालावर उपलब्ध नाही. पण by प्रकाश घाटपांडे
In reply to मनापासून आभार तुमचे by मृगजळाचे बांधकाम
In reply to अभिनंदन! by आयुर्हित
In reply to प्रसिद्ध ब्रिटीश विनोदवीर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to शुचि, by संजय क्षीरसागर
शारीरिक दृष्ट्या मेंदू उत्तम राहण्यासाठी सर्वांगासन आवश्यक आहे त्यानं मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत होतो.सहज करता करता मला एकाच आसन आत्तापर्यंत जमलेले आहे ते म्हणजे सर्वांगासन. अन तेही मजेमजेत , जिममध्ये मैत्रीणीशी स्पर्धा करत/खेळत सापडलेले आसन. मला वाटायचे की थायरोईड वरती ते उपयुक्त आहे पण जर मेंदूही कार्यरत रहाणार असेल तर मी नक्कीच रोज करत जैन.
तुम्ही स्वतःशी पुन्हा कनेक्ट होता ते खरं कौशल्य आहे.होय क्वालिटी ऑफ लाइफ़ यालाच आमचाही अग्रक्रम आहे.
In reply to सं क्षी, विस्तृत by शुचि
सुप्तवज्रासन जमायला थोडा वेळ लागेल पण इट इज द बेस्ट रेमीडी फॉर न्यूरो फिटनेस
In reply to सर्वांगासनानं मेंदूला रक्तपुरवठा आणि थायरॉइड कार्यक्षम राहाणं by संजय क्षीरसागर
In reply to ते बोकोमा मस्त वाटतय राव!!!! by शुचि
In reply to ते बोकोमा मस्त वाटतय राव!!!! by शुचि
In reply to 'बेड, बाथ अँड बियॉंड' by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to सर्वांगासनानं मेंदूला रक्तपुरवठा आणि थायरॉइड कार्यक्षम राहाणं by संजय क्षीरसागर
+++++++++++++++++ १ . अगदी खर