माहिती हवी आहे- (२०१५: बारावीनंतर मेडिकलसाठी )
अकरावी संपून बारावीचं वर्ष सुरु होतंय अशा मुलांचे आता सुटीतच क्लासेस सुरु झालेत. २०१५ ला ज्यांनी अभियांत्रिकीला जायचं ठरवलंय त्यांना बरंच मार्गदर्शन उपलब्ध आहे- कारण डॉक्टर पेक्षा इंजिनियर होण्याचं प्रमाण खूप जास्त राहिलं आहे, पण मेडिकलसाठी ( विशेषतः MBBS कोर्स) माहिती असल्यास कृपया इथे द्यावी.
१. सी ई टी बाबत अनिश्चितता दरवर्षी असते. यावर्षीपासून ती राज्य पातळीवरच पण केंद्राच्या NEET च्या धर्तीवर होणार असं ऐकलंय/ वाचलंय. मग इतर राज्यात १५% गटातून प्रवेश कसा मिळेल?
२. सरकारी कॉलेजचा प्रवेश थोडक्या गुणांसाठी न मिळाल्यास खासगी कॉलेजचा पर्याय आहेच. पण तो फार महागडा आहे असं ऐकलंय. सी ई टी ला चांगले गुण असतील तर देणगी मध्ये काही फरक पडतो की गल्ल्यावर बसलेल्या शिक्षणसम्राटाला सगळे सारखेच? हे अशासाठी विचारलं, की पुण्यातल्या काही खासगी कॉलेजचे पहिल्या वर्षाचे निकाल अवघे ५० % च्या आसपास दिसतात. म्हणजेच मेरीटवाले काही विद्यार्थी तिथे जात असणार ! किंवा त्याना हवे असणार.
अभिमत विद्यापीठाबाबत मत चांगलं नाही त्यामुळे तिकडे जाऊ नये असं ठाम मत आहे.
३. मेडिकलनंतर पदव्युत्तर करणं आजकाल जवळपास अनिवार्य असल्यासारखंच आहे. तिथेही विशिष्ट अभ्यासक्रमाना तशीच स्पर्धा आहे. खासगी कॉलेजातून MBBS केल्यास पुढे काय समस्या येऊ शकते? पदव्युत्तरसाठी भारताबाहेर थेट विचार होतो की इंग्लंड प्रमाणे आधी त्यांच्या परीक्षा द्याव्या लागतात? सी ई टी ची तयारी करून घेणाऱ्या एका मोठ्या क्लासला भेट दिली तेव्हा त्यांनी देशात एकूण तीस हजार जागा आणि सात लाख जण स्पर्धेत असतात असं सांगितलं.
४. हल्ली नव्याने चीन-रशियात जाउन डॉक्टर होण्याचं मॉडेल उदयाला आलंय. तो पर्याय पण नको आहे!
५. सगळ्यांनी डॉक्टर- इंजिनियर होण्याचे दिवस मागे पडले, इतर पण करियर्स खूप चांगली आहेत, डॉक्टर होता-होता वय खूप वाढतं पुढे स्थिरस्थावर होईतो तिशी उलटते, खूप खर्चिक आहे- हे सर्व मुद्दे आजच्या मुलांना चांगले समजतात. तरीही विचार करून डॉक्टरच होण्याची मुलांची इच्छा असेल तर पालक म्हणून त्यांना सर्व माहिती आणि सुविधा उपलब्ध करून देणे पालकांचं कर्तव्यच आहे. म्हणून धाग्याचा प्रपंच.
वाचने
12580
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
फोन
In reply to फोन by विनायक प्रभू
हेच म्हणायला आलो होतो
In reply to हेच म्हणायला आलो होतो by बहुगुणी
अपेक्षा
In reply to फोन by विनायक प्रभू
प्रभू सर
५ वा
परदेशात जायचे असेल तर
.
माझ्या अल्पमती आणि अल्प
In reply to माझ्या अल्पमती आणि अल्प by सुबोध खरे
+१
In reply to माझ्या अल्पमती आणि अल्प by सुबोध खरे
प्रतिसाद आवडला. हे सगळे मझ्या
फिजियोथेरापी
फिजियो थेरेपी करून अमेरिकेत
शुद्ध आयुर्वेद करणार असेल तर....
सर्वांचे आभार. उपयुक्त