विवाह मुहुर्ताच्या निमिताने!
In reply to लेख वाचला. माहीती मिळाली. by शुचि
In reply to @ याचा अर्थ मुहुर्त असा फिरता by अत्रुप्त आत्मा
In reply to @ याचा अर्थ मुहुर्त असा फिरता by अत्रुप्त आत्मा
In reply to कसे? by समर्पक
मी ज्योतिषी नाही
पौरोहित्याच्या या लाइन मुळे,त्या ला'इन'ची थोडी माहिती आहे. इतकेच! :)In reply to @ अर्थात, त्याच मुहुर्ताचे by अत्रुप्त आत्मा
"या सर्व मुहूर्तांच्या वरील महतीचं कारण काय? म्हणजे असंच का हवं, तर ते "ज्योतिषशास्त्र म्हणतं म्हणून!' एवढंच त्याचं उत्तर आहे. तरी पण मग, नेमकं असं काय म्हणतं हे शास्त्र? तर त्या म्हणण्यामागं ज्योतिषशास्त्राप्रमाणे मानवी जीवनावर होणाऱ्या बऱ्या/वाइट परिणामांचा, म्हणजेच विवाहाच्या दृष्टीनं पुढील सहजीवनावरील फलिताचा भाग त्यात येतो म्हणून."हे कसं काय म्हणू शकता? आणि लेखात लग्नाचे मुहुर्त का दिले आहेत? म्हणजे ज्योतिषाचे ऐका असे सांगण्याचाच प्रयत्न झाला ना? की पौरोहित्य करण्यामुळे conflict of interest नको म्हणून असे विधान केले आहे? जर ज्योतिषाने सांगितले की मुहुर्त चांगला नाही (समजा सांगितले की अमावास्येला लग्न करू नका) किंवा पत्रिका जुळत नाही, तरीही लग्न केले तर काय वाईट परिणाम होतात?
In reply to काही प्रश्न by उपाशी बोका
In reply to @ हे कसं काय म्हणू शकता? >>> by अत्रुप्त आत्मा
काहिही वाइट परिणाम होत नाहीत.कारण वाइट परिणाम होण्याचा या ज्योतिषशास्त्रीय गोष्टींशी काहिही संबंध नाही. जे काहि चांगले किंवा वाइट परिणाम होतात,ते... दोघांमधली परस्पर व्यवहाराची रीत कशी आहे?बास बास! उगान नै आम्ही अॅग्नॉस्टिक असूनही तुमचे लेख आवर्जून वाचत!
In reply to काहिही वाइट परिणाम होत नाहीत by ऋषिकेश

In reply to लेख वाचला. माहीती मिळाली. by शुचि
In reply to अभिनंदन... by धन्या
In reply to लेख आवडला, आत्माजीराव! by आदूबाळ
In reply to हा बहुधा अभिजीत पेंढारकर by प्रचेतस
In reply to @हा बहुधा अभिजीत पेंढारकर by अत्रुप्त आत्मा
In reply to पुनरेकवार अभिनंदन. by प्रचेतस
In reply to अभिनंदन बुवा...लेख आवडला by जोशी 'ले'
आता हेच ज्येष्ठ महिन्याचं पाहू या. तर ज्येष्ठात ज्येष्ठ मुलांची लग्नं करीत नाहीत, हा सर्वसामान्य नियम; पण तोच वरच्यासारख्या काही कारणांनी मोडायची वेळ आलीच तर "अहो, मोठ्या मुलाला कुणाला तरी "दादा..दादा' अशी हाक मारायला लावा, की झाला तो कनिष्ठ.' ही त्यावरील सुटका. विनोदाचा भाग सोडाया आपल्या वाक्यात एक थोडेसे करेक्शन सुचवावेसे वाटते.. ते म्हणजे.. ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठ अपत्यांची लग्ने करू नये.. असा कुठलाही नियम नाही. फक्त "३ ज्येष्ठ" एकत्र येऊ नयेत.. असा नियम आहे. म्हणजे ज्यांचे लग्न आहे.. तो मुलगा आणि ती मुलगी हे जर आपापल्या जन्मदात्या आईवडिलांचे ज्येष्ठ अपत्य असतील.. तर त्या दोघांचा विवाह ज्येष्ठ महिन्यात करणे टाळावे. कारण तीन ज्येष्ठ एकत्र येऊ नयेत. असा नियम आहे. पण सपोझ, मुलगा घरातील ज्येष्ठ अपत्य असेल आणि मुलीला मात्र तिच्यापेक्षा मोठे एखादे भावंड असेल, तर त्या दोघांचा विवाह ज्येष्ठ महिन्यात करण्यास काहीच प्रॉब्लेम नसतो. कारण इथे मुलगी कनिष्ठ अपत्य असते. किंवा मुलगी ज्येष्ठ अपत्य व मुलगा कनिष्ठ अपत्य असेल.. तरी ज्येष्ठ महिन्यात विवाह करण्यास काहीच अडचण नसते. त्याचप्रमाणे एखाद्या घरात लग्नाळू मुलगा किंवा मुलगी सद्यःस्थितीला जरी ज्येष्ठ असले आणि यापूर्वी त्यांचे एखादे भावंड लहानपणी मृत पावले असले... तर त्यांना शास्त्रानुसार "ज्येष्ठते"चा दर्जा मिळत नाही. पर्यायाने ज्येष्ठ महिन्यात लग्न ते करू शकतात. त्याचबरोबर एखाद्या स्त्री'चा पहिला गर्भ "अॅबॉर्ट" / "मिसकॅरेज" झाला असेल.. तरी दुसर्या गर्भाला किंवा अर्भकाला ज्येष्ठ म्हणता येत नाही. त्यामुळे त्या अर्भकाच्या विवाहाच्या वेळेस "ज्येष्ठ" महिना आडवा येत नाही. :)
In reply to लेख आवडला... अतिशय सोप्या by सुहास झेले
In reply to ... by वपाडाव
In reply to ... by वपाडाव
In reply to @आत्म्या पळुन कुकडे गेला रे? by अत्रुप्त आत्मा
In reply to @आत्म्या पळुन कुकडे गेला रे? by अत्रुप्त आत्मा
In reply to १)आदूबाळ >>> by अत्रुप्त आत्मा
============================================
हा फोटो कॉपीमधला लेख तेथे सा.सकाळच्या धोरणानुसार काहिसा संपादित झालेला आहे. म्हणून मूळ कच्चा मसूदाहि येथे खाली देत आहे.
============================================
हा मूळ मसुदा...
"अहो...म्हायत्ये हो तुम्ही फार पुरोगामी गुर्जी आहात ते.. पण तरी कायतरी एक वेळ विवाहमुहुर्त म्हणून हवी की नको? की मेंढरांचा कळप आत आल्यावर कवाड लावतात...तसं लग्न लावायच..सगळी जमल्यावर? " काही वर्षांपूर्वी ,एका (क्लाएंट..) यजमानाघरी चाललेल्या लग्नाच्या कार्यक्रम रूपरेषा चर्चेत, हा माझ्या अंगावर आलेला बाण! तेंव्हा तर मी बराचसा नवखाही होतो..आणि या पौरोहित्याच्या क्षेत्रात अनुभवाला-पारखाही! त्यामुळे बुद्धी ज्याला कौल देइल,ती प्रत्येक गोष्ट भावना(मन) स्विकारेलच असं नाही..मग ते खरं असो,अगर खोटं! हा धडा फार पटकन मिळाला. मग मनात क्षणभर विचार केला..असला हा मुहुर्ताचा प्रकार धर्मशास्त्रातंही उत्तरकालीन,तरिही एकदा काहि विधी करायचे निश्चित झाले..की त्याला काहितरी वेळ निश्चित करणे आलेच की? मग त्या यजमानांना..विवाह मुहुर्ताच्या दिवशी वधुवरांना(आणि त्यांनाही!) अनुकूल अशी एक वेळ काढून दिली..आणि न जमणार्या छापिल मुहुर्तांच्या कचाट्यातून त्यांना सोडविले. पण हा प्रसंग मलाही बरेच काही शिकवून गेला. त्यातही एकदा धर्म म्हटलं,की ते कसही काहिही असो..तो सारा भावनेचाच विषय असतो ना? मग तिथे बुद्धी गणित बांधण्यापुरतीच उपयोगात आणायला हवी,आणि ते सोडवायला भावनाच! मग विचार असा केला,की मुहुर्त कुठे नाहीत? शाळा भरायला आणि सुटायला...मुहुर्त आहे. ऑफिसांना ..मुहुर्त आहे. येश्टी,रेल्वे,विमान सुटायला...मुहुर्त आहे. घरातून कामाला निघण्याचा ...मुहुर्त आहे. डॉक्टरला ऑपरेशनांचा... मुहुर्त आहे. हे सगळीकडे मुहुर्त आहे...मुहुर्त आहे... असं उत्तर, आमच्या कोकनातल्या द्येवलात घातलेल्या गार्हान्यातल्या 'होय..म्हाराजा!' सारखं यायला लागलं. चला...म्हटलं,उत्तर सापडलं! पण आमची मेली बुद्धी गप बसू देइल होय आंम्हाला? छ्या! आजाबात न्हाय! तीनी लगेच सांगितलच.. "आओ दिवेकर गुर्जी.. , शाळा हापीस रेल्वेचे मुहुर्त-काढले जात नाय...,ठरवले जातात.आनी त्यास्नी 'येळ' म्हनत्यात,मुहुर्त न्हाई! मुहुर्तात सुब/असुब असतं,आनी येळेत फकस्त टाइम असतुया!" हे उत्तर मिळालं आणि मग एकदम सर्व चित्र स्पष्ट झालं. मुहुर्तात जर आपण काहि शुभ/अशुभ गृहीत धरत असू,तर प्रचलीत धर्मशास्त्र निर्णयानुसारच जायला लागणार.पण तसं काहिही गृहीत नसेल..तर ती एक कार्यक्रम करण्याला अनुकूल अशी फक्त आणि फक्त वेळच असेल..आणि धार्मिक कार्यक्रमासाठी ती घ्यायची तर फक्त पंचांगशुद्धी पाहुन घ्यावी लागेल. मग पंचांगशुद्धी.. म्हणजे तरी काय हो? तर पंचांगात दिलेलं दिनमान..म्हणजे 'योग्य दिवस,प्रतिकूल दिवस,चांगला,शुभ्,अशुभ.. ' हे! पण आता त्यातंही अडकणे नसले उपयोगाचे तर काय हो करावे दिवेकरभट? मग ते असे करावे,की सरळ बुद्धीगम्य निर्णय घ्यावा. आणि आपल्या सोयीचा असा कोणताही दिवस निवडावा. किंवा आपली ही अपेक्षा सांगून ज्योतिषाकडनं काढून घ्यावा. लोकहो, वरती केलेला सगळा उहापोह आपण क्षणभर बाजुला ठेऊ. आणि असा विचार करू.., की ही गरज आपल्या मनाला नेमकी कशी आहे? आणि का आहे? माझ्या मते दोन तीन कारणं असू शकतात. १)धर्मशास्त्रातलं हे परंपरेनी चालत आलेलं सगळंच्या सगळं बाजुला टाकुन द्यायला मन तयार होत नाही. २) तुमचं सगळं पटत हो...पण लोक काय म्हणतील? हे लोकं-भय निर्णयावर येऊ देत नाही. ३)आंम्हाला हवं तेंव्हा मंगल कार्यालय वगैरे उपलब्ध नाही..असं तात्कालीक कारण आहे म्हणून! यातील पहिलं कारण असेल,तर मी तुम्हाला यातल्या खर्या/खोट्याच्या वादात जाणिवपूर्वक न नेता एव्हढच सांगिन की मानवाच्या प्राथमिक समुहजीवनाचा(टोळी किंवा ट्राइब'चा) काळ आठवा..ज्यावेळी सृष्टी त्याला अत्यंत प्रतिकूल होती,आणि धर्म ही गोष्ट आजच्या सारखी ऐसपैस तर सोडाच्,उलट ती नीट हिशोबातंही आलेली नव्हती. तेंव्हाही माणूस ह्या गोष्टींशिवाय जगत होता.आणि त्याची मानसिक/ऐहिक सुखदु:ख्खंही अगदी फार वेगळी नव्हती. (ह्यावर कुणी आजच्या अपडेट समाज जीवनाचा दाखला दिला आणि आक्षेप घेतला,तर त्याला उत्तर एव्हढच की रोटी/कपडा/मकान..एव्हढ्याच गरजा मूलंभूत असतात.त्यांची रुंदी नव्हे!) तेंव्हा आपल्या मनाला आता ही नवी सवय लाऊन घ्यायला काहिही हरकत नाही. आणि त्यात काहि वाइटंही नाही. दुसर्या कारणाचा परामर्श घ्यायचा,तर लोकंभय उडवून लावणं ही गोष्ट सोपी नाही,हे आपण प्रामाणिकपणे मान्य करूनच पुढे जाऊया. आता.. हे लोकंभय म्हणजे तरी काय हो? तर अश्या प्रसंगी आपणच दुसर्यांशी जे व्यक्त होत असतो..तेच हे लोकंभय आहे. धर्म.. या क्षेत्रातला कोणताही निर्णय, (मग तो योग्य/अयोग्य..जो असेल तो!) बुद्धिनीच घ्यायला हवा..आणि औषधाच्या कडू गोळी प्रमाणे तो जिभेवर ठेऊन पचवायलाही हवा. आणि त्याची सुरवातंही ते लोकंभय वाटत असतानाच करायला हवी..कारण??? - "अभी नही..तो कभी नही!" आणि समजा..यावेळी जमली नाही,तर पुढच्या वेळी तरी ही सुरवात करायला हवीच हवी..पण दरवेळी प्रयत्न हवा आणि तो मात्र निकराचाच हवा हो...तरच हे आपणच निर्मिलेलं लोकंभय नाहिसं होइल. कदाचीत आपण लहान मूल होतो..तोपर्यंत ह्या गोष्टींमधे, लोक-आपल्याला "तो बघ बुवा आला,बुवा आला!" करत होते.पण आता एकदा तरी मोठे होऊन या "बुवा आला"च्या आरोळीलाच आपल्या पर्यंत न येण्याची वेळ आणवुया. म्हणजे पुढे चालून ती त्यांच्यावरंही येणार नाही! तिसर्या कारणाला तर काही चिंताच करायची गरज नाही. आपत्काल हा (हो..हो..धर्मशास्त्रातंही) युद्धासारखा असतो..आणि प्रेमात व युद्धात सर्व काही माफ असतं... मग अजुन काय सांगावे? या सगळ्याचा एकाच वाक्यात समारोप करायचा झाला..तर एव्हढच सांगता येइल,की.. आपण धर्म पाळायचा असतो,धर्मानी आपल्याला पाळायचं नसतं. ========================================================================= संपादकः- कृपया हा प्रतिसाद मूळ धाग्यात लाऊन द्यावा. :)
In reply to पुनरेकवार हाभिणंदन गुरुजी by प्रमोद देर्देकर
लेख वाचला. माहीती मिळाली.