भुतेखेते-हडळी अनुभव
नमस्कार मित्रांनो,
मिसळपाववरील सन्माननीय आणि उच्चविद्याविभुषित मंडळींपैकी कोणाचा "भुते-खेते-हडळी" अशा गोष्टींवर खरोखर विश्वास आहे का?
मी स्वत: एक व्यावसायिक "घोस्टबस्टर"( मांत्रिक) X( असल्याने अर्थात माझा विश्वास तर आहेच पण अनुभवही आहेत. अर्थात हे अनुभव बरेच व्यक्तिसापेक्ष आणि वादग्रस्त असु शकतात त्यामुळे ते शेअर करणे शक्य नाही किंवा करेनही वेळ आल्यावर....
तुम्हाला कधी अशा शक्तिंचा अनुभव-त्रास झालाय का? ~X(
अशा शक्तिंच्या अस्तिवाबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहेत का?
इथे चर्चा अपेक्षित आहे....
जमल्यास माझ्या ब्लॉगवर जाऊन माझ्या काही गुढकथा ( ज्या सत्य-असत्यतेच्या सुक्ष्म सीमारेषेवर आहेत) आणि त्यातील "थरार" व "चकवा" या दोन कथांचा नायक म्हणजे मी स्वत: आहे....कथा जरा अतिरंजीत आहेत पण वाचुन बघा...
आणी हो इथे मात्र तुमचे अनुभव नक्की लिहा....काही शंका असतील तर मी माझ्यापरिने मदत करेन ;;)
वाचन
45201
प्रतिक्रिया
0