मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तू

चाणक्य · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कधी तुझी याद....संधीप्रकाशात आणि मग खळबळ....कुठेतरी आत चिंब जणू तू....चिंब पावसात ओला ओला शहारा....चिंब शरीरात उरी काहिली काहिली....जरी चांदरात होई काळीज निखारा....तुझ्या विरहात मन पाखरू पाखरू....फडफडे पिंज-यात आणि पिंज-याची चावी....जगाच्या हातात कधी मेघ दाटू येता....काळ्या आकाशात तुझी चाहूल चाहूल....मातीच्या वासात कधी तुझा वारा....भरे माझिया शिडांत कधी माझी लाट....नेई तुला सागरात दूर देशी तू....तरीही मनात ठायी ठायी तूच....मन-देश अंतरात

वाचने 2516 वाचनखूण प्रतिक्रिया 12

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 15/04/2014 - 17:06
आवडली कविता. -दिलीप बिरुटे

शुचि 15/04/2014 - 17:37
कधी मेघ दाटू येता....काळ्या आकाशात तुझी चाहूल चाहूल....मातीच्या वासात
हे कडवे विशेषकरुन!

चौथा कोनाडा 16/04/2014 - 09:16
कधी तुझा वारा....भरे माझिया शिडांत कधी माझी लाट....नेई तुला सागरात या ओळी विशेष आवडल्या. सुंदर रचना !