फाऊंटन पेन!
लेखनविषय:
हाता मधलं फाऊंटन पेन!
झरझरणारे थेंब थेंब..
काळी-नीळी
लाल-जांभळी
हिरवी-पिवळी
सळसळती रेघ!!
हाता मधलं फाऊंटन पेन!
झुळझूळणारे थेंब थेंब..
खळखळणारी
खरखरणारी
खदखदणारी
भळभळती रेघ!!
हाता मधलं फाऊंटन पेन!
झिळमीळणारे थेंब थेंब..
वळती
थांबती
वहाती
चिरतीमुरती रेघ
हाता मधलं फाऊंटन पेन!
झगमगणारे थेंब थेंब..
झरझर ताना
झुळझूळ ताना
झिळमीळ ताना
झिरपती रेघ
=======================
स्वाती फडणीस.................. ०८-१०-२००८
वाचने
2282
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
वा...
अल्कोहोल आठवले :)
कल्पना आवडली
वेगळी कल्पना, छान!
मनापासून आभार
कविता आवडली
आभार