युरोपांश - पॅरीस.
(छायाचित्र आंतरजालावरून साभार.) मी काढलेले छायाचित्र चुकून खोडले गेले (डीलीट झाले).
आयफेल टॉवर.. आयफेल टॉवर म्हणतात तो हाच. सौ. हरखून गेली होती. 'कस्सला स्सही आहे, नाही?'
रॉट आयर्नच्या ३२४ मिटर उंचीच्या मनोर्यासमोर आम्ही उभे होतो. फ्रेंच राज्यक्रांतीला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजिलेल्या जागतिक प्रदर्शनाचे प्रवेशद्वार म्हणून हा मनोरा उभारण्यात आला होता. प्रवेशद्वाराचा आराखडा कसा असावा ह्या बद्दल अनेकांकडून विविध आराखडे सरकार दरबारी सादर केले गेले त्यातील गुस्ताव आयफेल ह्या अभियंत्याच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. पॅरीस मधल्या मान्यवर चित्रकार, शिल्पकारांनी आणि समाजधुरीणांनी ह्या आराखड्यास आक्षेप घेतला होता. पॅरीस हे सुंदरतेने नटलेले शहर आहे. तिथल्या, आर्च ऑफ ट्रँफ, नॉन्स्त्र दॅम चर्च, आणि अनेकविध ऐतिहासिक आणि सौंदर्यसंपन्न वास्तुंपुढे हा 'लोखंडाचा ढिग' शहराला विद्रुप करतो आहे असा त्यांचा आक्षेप होता. परंतु, 'नुसत्या कागदावरील आराखडा पाहून टॉवरच्या सौंदर्यावर ताशेरे ओढणे गैर आहे. आणि इजिप्तच्या पिरॅमिड्सचे कौतुक फ्रान्स मध्ये होऊ शकते तर टॉवरला आक्षेप का?' ह्या गुस्तावच्या प्रतिवादाने सरकार समाधान पावले. परंतु, एकूण खर्चाच्या फक्त १/६ खर्च सरकारने केला बाकी गुस्ताव आयफेलने केला आणि टॉवर उभा ठाकला. प्रदर्शन समाप्तीला तो उतरवायचा होता परंतू पुन्हा आयफेलने सरकारला त्याची उपयुक्तता पटवून दिली. पुढे तो फ्रान्सच्या रेडिओ लहरी प्रक्षेपण करण्यात अग्रेसर ठरला. दुसर्या महायुद्धात जर्मनांची चढाई रोखण्यातही टॉवर वरील बिनतारी यंत्रणेने महत्त्वाची कामगिरी बजावली. आजही टॉवरवरुन फ्रान्सच्या आकाशवाणीच्या प्रक्षेपणाला मोलाची मदत होते. टॉवरच्या पहिल्या मजल्यावर उपहारगृह आहे तर दुसर्या मजल्यावर गुस्ताव्ह आयफेलचे ऑफीस आणि महत्त्वाच्या पाहुण्यांचे स्वागतकक्ष आहे. इथे ह्या उपहारगृहात आयफेल टॉवरला कडाडून विरोध करणार्यांचा म्होरक्या रोज येऊन बसायचा. त्याला एकदा एका पत्रकाराने विचारले, 'तुमचा ह्या वास्तूला एव्हढा विरोध होता तर आता तुम्ही रोज इथे का येऊन बसता?' त्यावर तो म्हणाला, 'हा टॉवर मला आजही आवडत नाही. मला तो माझ्या नजरेसमोर नको असतो. पण संपूर्ण पॅरीस मधून तो दिसतो. मी त्याचे दर्शन टाळू शकत नाही. फक्त इथे येऊन बसल्यावर त्याचे दर्शन होत नाही. पण सुंदर पॅरीस शहर मला दिसते, मनाच्या वेदना कमी होतात.'
आयफेल टॉवर वरून पॅरीसचे विहंगम दृष्य...
.
गुस्ताव आयफेल ह्याने ह्या टॉवर नंतर अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेची उभारणीही केली आहे.
आयफेल टॉवरचे सौंदर्य दिवसा जसे भव्य-दिव्य आहे तसे ते रात्रीच्या अंधारात दिव्यांनी उजळल्यावर काळया मखमलीवर चमचमणार्या एखाद्या हिर्याप्रमाणे लखलखीत आहे आणि आपल्या तोंडून एकच उदगार येतो......'व्वा!'.
टॉवरच्या प्रांगणात ठग लोकांचा वावर आहे. पुरुषांच्या बरोबरीने सुंदर सुंदर तरूण मुली तुम्हाला ठगवायला टपलेल्या असतात. त्यांचे सावज म्हणजे आशियायी आणि त्यातल्या त्यात भारतिय पर्यटक. 'एका तान्या बाळाला कर्करोग आहे आणि त्याच्या उपचाराच्या संदर्भात फक्त एक सही करा' असे भावनिक आवाहन केले जाते. सही केली की २० युरोची मागणी होते. आपण चरफडत देतो आणि आपण ठगवले गेलो आहे हे जाणवतं. काय करणार कर्करोगाचे कारण पुढे केले की मी 'अजूनही' फसतो. ह्या मुली तुम्ही कांही खात असाल तर त्याचीही मागणी करतात. कांही जणी तर हातातील खाद्य पदार्थ हिसकावण्याचा प्रयत्नही करतात. पुरूष पाकिटमार आपली सावजं हेरत असतात. त्यांच्यापासून साभाळावे. पण ह्या सर्वातून आयफेल टॉवर अलिप्त आहे. त्याचे सौंदर्य, भव्यता, त्यामागील कल्पकता आपल्याला नि:शब्द करते. भारावल्या मनाने आम्ही आमच्या निवासाकडे परतलो.
दुसर्या दिवशी मोर्चा होता... लुव्ह्र संग्रहालय.
लुव्ह्र संग्रहालय हे एक जगप्रसिद्ध संग्रहालय आहे. त्याचा पसारा पाहता २-४ दिवसांत 'उरकायचा' हा विषय नाही हे सहज लक्षात येतं. त्यातून तुम्ही चित्रकला आणि शिल्पकलेतील दर्दी जाणकार असाल तर संपलंच. कमीत कमी महिना तरी लागेल सर्व दालनं पाहून आणि जाणून घ्यायला. सुदैवाने आम्ही 'जाणकार' नाही. रसिक जरूर आहोत. दिवसभर तंगडतोड करून चित्रकलेचे आणि शिल्पकलेचे कांही अप्रतिम नमुने पाहायला मिळाले. त्यातील ह्या कांही निवडक कलाकृती:











सु रे ख.
फटु दिसत नाहीत...
मस्त...
मस्त !!
काका, तुमच्या लेखमालेची वाटच
सुरेख..
स्विट्झर्लंड वरील लेख लवकरात
मस्त सफर चालु झाली आहे काका..
In reply to मस्त सफर चालु झाली आहे काका.. by शिद
हाहाहा... असाच अनुभव अगदी
सुरवात तर एकदम दमदार
मस्तच ...
माहिती आवडली!
(No subject)
इथेच थांबा ,राहा ,हॉटेल टाका
सुरेख!
झकास !
मस्त !
मस्तच!
सुरेख लेख.
सुरेख लेख. प्रत्यक्षदर्शन
छान लेख !
मस्त लिहिले आहे काका! फोटो
किती खिळवून टाकणारं लिहीलं
सुंदर प्रकाशचित्रे आणि पेठकर
खूप सुंदर
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
असा विचार प्रकर्षाने मनांत
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
ओह...
In reply to ओह... by vrushali n
सर? नको... नको.
पॅरिसचे मनोगत ...
फारच छान. बराच बारिक-सारिक
छान वृत्तांत, आयफेल टॉवरचे
झक्कास.
खुमासदार प्रवासवर्णन. खूप
काकाश्री मस्तच वृतांत . आवडला
In reply to काकाश्री मस्तच वृतांत . आवडला by दिव्यश्री
मी वाचलेलं की ते स्मित अतिशय
मस्त लेखमाला....
खरेच खूप सुंदर वृत्तांत ..
मस्त वृत्तांत! पॅरीसला आणि
In reply to मस्त वृत्तांत! पॅरीसला आणि by मनिष
युरोप
लई भारी ओ काका! एकदम
सुरेख वर्णन!
In reply to सुरेख वर्णन! by पिवळा डांबिस
च..च..च..च...!
In reply to सुरेख वर्णन! by पिवळा डांबिस
अफलातून क्रेप
In reply to अफलातून क्रेप by प्रशांत
फलाफेल.
खुमासदार प्रवास वर्णनाला
म स त ह !!!
धन्यवाद.
आता पाहून ठेवतो....
वृत्तांत आवडलाच! गुजराथी
मस्त
छान .......
यमीच्या चारपट गोरी!!
In reply to यमीच्या चारपट गोरी!! by स्पंदना
पेठकर काकांचे पाय पकडुन माफी मागत असल्याचे चित्र
वाह!
मस्त प्रवासवर्णन..
मस्त.
व्वा
वाह, काकानु मस्त सुरवात केलीत
युरेलचा पास सगळ्या शेंगेन
ह्या माहिती इतकाच महत्त्वाचा युरोपातील गाड्यांचा वक्तशीरपणा.हा एकच अपवाद वगळता मलासुद्धा असाच अनुभव आला होता. फक्त रेल्वेच नाही तर बस सुद्धा अगदी वेळेवर. बसचा डायवर किंवा डायवरीन जेंव्हा गुड मॉर्नीन्ग म्हणतात, तेंव्हा फक्त क्या ब्बात.. क्या ब्बात. रेल्वेमध्ये अपंग, सैकलिस्टस्, अंध आणी वॄद्ध व्यक्तींसाठी सोईसुद्धा उत्तम. हा भाग उत्तमच. पु.भा.प्र.लहानपणी "रमेश मंत्री" यांचा
पॅरीसचे ठग
पेठकर काका...
उत्तम
पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत ….
लेख आवडला!
मस्तं वर्णन!
विनोदाचा हलका शिडकावा असलेलं,
खूप छान सर्वांग सुंदर मार्गदर्शक लेख !
In reply to खूप छान सर्वांग सुंदर मार्गदर्शक लेख ! by आयुर्हित
उफ्फ..
मस्त