नाते
लेखनविषय:
ना ओढ असे देहांची
वा स्पर्शाची मर्यादा
सहवासाने उजळावे
वाटे तरीही कितीदा
ना प्रीती - ना ही मैत्री
हे तुजला मजला ठावे
जे मिळते यातुन, पुरते
का द्यावी खोटी नावे
हे देण्या अन् घेण्याचे
फुललेले मोहक अंगण
का बहराला मारावे
नसलेले घालुन कुंपण
याआधी कैसे होते
यापुढती कैसे जाऊ
सध्या ठरवू इतके की
सध्याला बिलगुन राहू
क्षण अपार श्रीमंतीचे
ये जपून हृदयीं ठेवू
नाजुकसे नाते अपुले
वळणाशी अलगद नेऊ
-- अमेय
वाचने
2705
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
(No subject)
छान
क्या बाsssत है!!!
In reply to क्या बाsssत है!!! by अत्रुप्त आत्मा
+१११११
फारच छान आहे. शेवटचे कडवे तर
तरल
छान! यावरून ही आठवली,
वा!
छान. आवडली.