काल फार दिवसांनी काही तरी झँटमॅटीक करायची हुक्की आली होती. म्हटलं आलीये लहर तर काही तरी करुच.
लेकीला चीज प्रकार फार आवडतो. पिझ्झा म्हणजे तिचा जीव का प्राण. मग त्याच्या जोडीने येणारे स्टफ्ड ब्रेड, गार्लीक ब्रेड हे प्रकारही. वार्षीक परीक्षा नुकत्याच आटोपल्याने आत्तापासुनच मे महिन्याच्या सुट्टीचे वेध लागलेत. तर ती येण्या पुर्वी एखादी रंगीत तालिम करावी म्हणुन हा प्रयत्न. (हो आयत्या वेळी लेकी समोर पोपट नको व्हायला.)
धो.सु. : हेल्थ काँशस मंडळींनी या ओळीच्या पुढे स्क्रोल करू नये. तरीही अट्टाहासाने खाली पाहिलंत किंवा वाचलच आणि जर तुमच्या तब्येतीला काही अपाय झाला तर त्या बद्दल अस्मादिक जबाबदार असणार नाही.
साहित्य :
ब्रेडसाठी
दोन वाट्या मैदा.
१ चमचा साखर.
१ ते १.५ मोठा चमचा यीस्ट.
२ चमचे तेल.
चवी नुसार मीठ.
गरजे नुसार कोमट पाणी. (अंदाजे पाऊण वाटी.)
बारीक रवा (ब्रेड लाटताना.)
स्टफिंगसाठी
मॉझ्झरेला / चेडर चीज
कांद्याची पातं बारीक चिरलेली.
१ चमचा लसुण पावडर
१ चमचा बटर
चिली फ्लेक्स
एका अंड्यातला पांढरा भाग.
habanero peppers. ही अती जहाल असते.
त्यामुळे तिचा तिखटपणा कमी करण्यासाठी थोडं व्हिनेगर.
मिरचीच्या चकत्या करुन त्या व्हिनेगरमध्ये मुरत ठेवाव्या.
कृती :
खोलगट भांड्यात मैदा घेऊन त्यात यीस्ट, साखर, मीठ, १ चमचा तेल घालून मिश्रण हातानं एकत्र करून घ्यावं.
नंतर त्यात गरजे नुसार थोडं थोडं कोमट पाणी घालत पीठ मळुन घ्यावं. थोडं सैलसरच ठेवावं.
पीठ किमान १० मिनीटं तरी तिंबून घ्यावं. वरुन तेलाचा हात लावून भांडं उबदार कोपर्यात किंवा (फक्त दिवा पेटतो त्या तापमानाला) ओव्हनमध्ये ३०-४० मिनीटं ठेवावं. तेवढ्या वेळात ते किमान दुप्पट फुलून येईल.
फुलून आलेलं पीठ हलक्या हाताने मळुन घ्यावं. फार जोर लावू नये.
थोडा रवा पसरवून त्यावर पीठाचा गोळा ठेऊन त्याची जरा जाडसर पोळी लाटुन घ्यावी. (अंदाजे ३/४ सेमी जाड.)
आंड्यातला पांढरा भाग आणि बटर एकत्र फेटुन घ्यावं. लाटलेल्या पोळीवर ते मिश्रण ब्रशने लावावं.
अर्ध्या भागात मॉझ्झरेला चीज पसरवावं. त्यावर मिरचीच्या फोडी रचाव्यात. कांद्याची पातं. तिखट आवडत असल्यास चिली फ्लेक्स टाकावे.
सामिष आवडणार्यांनी चिकनचे शिजवलेले तुकडे वा मी वापरलय तसं सॉसेजेसच्या चकत्या वापरायला हरकत नाही.
शाकाहारी मंडळींनी परतेलेले मश्रूम वापरले तरी चालेल.
वरुन परत चीज पसरवावं.
पोळीचा वरचा भाग दुमडून करंजी सारखा आकार द्यावा, आणि कडा हाताने दाबून सिलबंद करुन घ्याव्या.
पिझ्झा कटरने वा सुरीने उभे काप द्यावे. आणि वरुन परत अंड्+बटरच्या मिश्रणाचा ब्रश फिरवावा.
एकीकडे ही तयारी चालू असतानाच ओव्हन १८०°C वर १० मिनिटं प्रीहिट करुन घ्यावा.
वरून थोडी कांद्याची पातं, लसणाची पावडर भुरभुरावी. आणि मग ती संपुर्ण आरास बटर पेपरला किंचीत बटर लावून बेकिंग ट्रेवर ठेऊन, ट्रे ओव्हनमध्ये सारावा.
साधारण २० ते २५ मिनीटांनी ब्रेड तयार होईल. (मधे-मधे लक्ष ठेवावं.) वरुन थोडंस चीज भुरभुरावं आणि ओव्हन बंद करुन ब्रेड त्यात ५ मिनीटं ठेवावा.
हा पदार्थ थंड झाल्यावर तेवढी लज्जत रहात नाही. तेव्हा ओव्हन मधुन बाहेर आल्या आल्याच त्यावर तुटुन पडावं.
वाचने
37486
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
किती तो उत्साह! एकदम भारी!
-----------------------------
In reply to किती तो उत्साह! एकदम भारी! by यशोधरा
मला पहिला द्यायचा होता ना
तो
व्वाह क्या बात है , कसली
अहाहा! शेवटचा फोटो कातिल आहे
= कलझोन
पण वाचताना आमच्या जिभेची
In reply to = कलझोन by समिर१२३
अरे काय अत्याचार करतोस रे
ही प्रतिक्रिया समीर१२३ आणि
In reply to अरे काय अत्याचार करतोस रे by प्रचेतस
=))
In reply to ही प्रतिक्रिया समीर१२३ आणि by स्वप्नांची राणी
काहीच्या काही आवडलं... रेसिपी
_/\_ _/\_ _/\_
कात्तिल !!!
ब्रेड करायचे काही प्रयत्न
पुन्हा प्रयत्न करून पाहा.
In reply to ब्रेड करायचे काही प्रयत्न by बाळ सप्रे
यीस्ट जुनं झालं असेल तर अशी
In reply to पुन्हा प्रयत्न करून पाहा. by प्रभाकर पेठकर
यीस्टबद्दल भीती वाटत असेल आणि
In reply to यीस्ट जुनं झालं असेल तर अशी by बाळ सप्रे
गणपा द शेफ,
@ यशो, सध्या फक्त लेकीनेही
ती शंका पावती म्हणूनच होती,
In reply to @ यशो, सध्या फक्त लेकीनेही by गणपा
कित्ती गोड बाबा आहत हो तुम्ही
व्वाह...अप्रतिम, निव्वळ
भारी
तुम्ही प्रत्यक्ष भेटल्यावर
मार डाला!!!
खुप भरि आहे.... १ नो.
बॉर्र्र्र्र!!
खायला मिळेल तेंव्हा सांगू.
In reply to बॉर्र्र्र्र!! by प्रभो
अप्रतिम....
अर्रे, हा तर कालझोन! छान
धन्यवाद!
भारीच
छान पाकक्रुती . गणपा भौ अशे
भावना चाळवणारे, भडकवणारे, इ.इ
इट इज ओन्ली झान्टॅमॅटिक..
हेल्थ व्हेरिअन्ट
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
ठार मेलोय. वजन
जळजळ होऊन एक किलो कमी झालं.
अरे ह्या गणपाला ते ह्ये करुन
ओव्हन नसल्याने फक्त फोटो पहावे लागणार!
दुरूनच नमस्कार.
वॉव!
मी हे किंचित वेगळे करतो
@ जेपी, ओव्हन शिवाय बेकिंग
@ जेपी, ओव्हन शिवाय बेकिंग
In reply to @ जेपी, ओव्हन शिवाय बेकिंग by गणपा
दुरूस्ती
In reply to @ जेपी, ओव्हन शिवाय बेकिंग by ऋषिकेश
किंचीत सुधारणा.
In reply to @ जेपी, ओव्हन शिवाय बेकिंग by ऋषिकेश
विडीयो हाफिसातून दिसत नाहिये,
In reply to किंचीत सुधारणा. by गणपा
सॉरी दुवा विसरलो: http://www
In reply to विडीयो हाफिसातून दिसत नाहिये, by ऋषिकेश
दुव्याबद्दल धन्यवाद ऋ.
In reply to सॉरी दुवा विसरलो: http://www by ऋषिकेश
खपल्या गेलो आहे
खतरी पाक्रु.
जमेल.
In reply to खतरी पाक्रु. by त्रिवेणी
धन्यवाद काका.
करून खाऊन बघेन आणि मगच वाहवा
एक्दम सॉल्लीड प्रकार आहे हा..
वाह...
एकसे एक फोटो !
उगाच गणपा भाऊ न मिपाशेफ नाही
_/|_
आई गं
गुडलकला जाउन मसका-पाव खाणार्
गणपा खूप दिवसांनी मिसळपाव वर
आग आय आय आय..... भारीच.....
काल्झोने?