डावे-उजवे
सध्या मेधा पाटकर यांनी राजकारणप्रवेश केल्याने त्यांना जरा माध्यमांकडून आदरयुक्त वेळ मिळत आहे असे वाटते. त्यात त्या आपकडून निवडणूक लढवत असल्याने तर काय दुधात साखर! अर्थात, त्यांच्या काही मुद्यांवर माझा जरी आक्षेप असला तरी त्यांच्याबद्दल आदर आहे. काल त्यांची एनडीटीव्ही वर बरखा दत्त यांनी तरूण स्त्री-पुरूषांच्या समोर घेतलेली मुलाखत पाहीली. काहीवेळेस स्वतःच्या डाव्या विचारसरणीस प्रामाणिक तर काही वेळेस आप ची बाजू घेत राजकारणी वृत्ती दाखवणे असे दोन्ही चालले होते. पण हा चर्चा विषय मेधाताईंवर नाही, तर त्यांनी केलेल्या एका विधानावर आहे...
मुंबईमधनं जशा साम्यवादी डाव्या विचारसरणीच्या मेधाताई आपच्या तिकीटावर लढत आहेत तशाच भांडवलशाही उजव्या विचारसरणीच्या मीरा सन्याल देखीळ लढत आहेत. बरखा दत्त यांनी मेधाताईंना प्रश्न विचारला की त्या कायम भांडवलवादाच्या विरोधातल्या डाव्या विचारांच्या असताना, त्यांना भांडवलवादाच्या बाजूच्या उजव्या मीरा सन्याल पक्षसहकारी म्हणून कशा चालतात. त्याला मेधाताईंनी राजकारणी व्यक्तीला शोभेसे उत्तर दिले: शरीरास डावी आणि उजवी अशा दोन्ही बाजू लागतात. तसेच समाजाला पण लागतात... :) यात अर्थातच कुठेतरी पोथीनिष्ट साम्यवादापासून त्यांनी फारकत (किमान टिव्हीवर) घेतली असे वाटू शकते. तसेच नुसत्या साम्यवादाने काही होऊ शकेल हे वास्तवात शक्य नाही हे कुठेतरी मान्य केल्याचे दिसते... मग त्यासाठी गांधी-फुले-आंबेडकरांनी काय केले असते तसेच मी म्हणते वगैरे बचावात्मक विधान झाले पण त्यांच्या बोलण्यातला हा मुद्दा मला खरेच महत्वाचा वाटला...
समाजवादाचे आकर्षण असले तरी नेहरूंनी सुवर्णमध्य आणण्याचा प्रयत्न केला असे म्हणले जाते. ते खरे देखील आहे, त्याचे काही ठोस फायदे देखील त्या काळाला अनुसरून झाले. पण काहीच १००% आदर्श असू शकत नाही हे मान्य केले तर त्यांच्याच धोरणाचा एक परीपाक म्हणून हळू हळू परमिटराज येत गेले आणि समाजवाद/साम्यवादाचे प्रेम/आकर्षण म्हणून त्यावर आधारीत अशी आपली परराष्ट्रनिती ठरू लागली ज्याचे देशाला नक्कीच तोटे झाले असे वाटते. (याचा अर्थ आपण अमेरीकेला चिकटायला हवे होते असा घेण्याची गरज नाही). अजून एक महत्वाचा तोटा म्हणजे सरकारवर अवलंबून रहाणे - नोकर्यांसाठी आणि अनेक सुविधांसाठी. फोनसाठी दहा दहा वर्षे थांबायला लागायचे हे इथल्या तरूण पिढीस माहीत आहे का? डाव्यांचा आणि समाजवाद्यांचा प्रभाव असताना, सगळेच साधे रहाण्याचे दाखवण्याच्या प्रयत्नात भोंदूगिरी करायचे. डाव्याविचारसरणीने इन्किलाब झिंदाबाद म्हणत कारखान्यात संप आणले, नक्षलवादाला खतपाणी घातले. डाव्या+समाजवादी विचारसरणीने उद्यमशिलतेवर मात्र पाणी सोडले, सरकारे मोठी केली, परमिट राज आणले, सबसिडी आणल्या आणि भ्रष्टाचाराची कुरणे तयार केली. १९९० पर्यंत देश हा प्रांतिक होता. देशवासीयांमधे प्रांतिकता अधिकच होती.
मला नक्की कधी ते माहीत नाही, पण खाजगी कंपन्यातले पगार हे भरमसाट वाढणे आणि मालक जाहीररीत्या अब्जाधिश होणे हा प्रकार साधारण १९९१ नंतरच्या भांडवलाशीच्या उदयानंतर होऊ लागला. भारतीयातल्या उद्यमशीलतेला काही अंशी त्यानंतरच्या काळात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळू लागले. आयटीक्रांतीने तसेच इतर अनेक गोष्टींनी तर त्यात भरच पडली. अजून एक भर पडण्याचे कारण म्हणजे तरूणाई! पण त्याच बरोबर काळजी वाटावी अशी आहेरे-नाहीरे दुही पण वाढीस लागली, वैयक्तीक आयुष्यातले ताणतणाव वाढले हे देखील कटू वास्तव आहे. मात्र जे शिकले त्यांचे नोकरीसाठीचे सरकारवरील अवलंबित्व पण संपवता आले. असे बरेच काही आंबट-गोड. अजून एक म्हणजे, मुक्तार्थव्यवस्थेने अर्थव्यवस्थेची फळे ही चार मेट्रोशहरे सोडल्यास इतरत्र पण पसरू लागली. तमाम प्रोफेशनल्स स्वतःची गावे, राज्ये सोडून इतर राज्यांमधे जाऊ लागले. हळूहळू परप्रांतियांना जवळ करणे (कॉस्मोपॉलीटन) हे सर्वत्र वाढू लागले आहे. (अर्थात ही नुसती सुरवात आहे). कुठेतरी नॅशनल ईंटीग्रेशनला ह्या खाजगीकरणामुळे अप्रत्यक्ष फायदा झाला.
तरी देखील, भ्रष्टाचार करण्यात ह्या दोन्ही बाजू तितक्याच परीणामकारी अर्थात भ्रष्टाचारी आहेत असे वाटते.
आज आपल्याला देश म्हणून कशाची गरज आहे? डाव्या विचारसरणीची का उजव्या विचारसरणीची? जर उत्तर दोन्हीची, पक्षी: मध्यम/centrist मार्गाची असे असेल तर नक्की काय? बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स घेयच्या ऐवजी आपण वर्स्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स तर घेत नाही आहोत ना?
सरकारवर सर्व सेवा-सुविधांसाठी अवलंबून असणे महत्वाचे का सरकार कमी करून (योग्य कायदे करून) खाजगी उद्योगांवर देश मोठा करणे महत्वाचे?
देशातला एक महत्वाचा प्रश्न हा सामाजिक विषमता आहे. तो सोडवायचा असेल तर सरकारवर अवलंबून रहायचे का जनतेने त्यावर सामाजीक कर्तव्य लक्षात ठेवून उत्तरे शोधावीत? तो सोडवायचा म्हणजे भांडवलशाहीस विरोध करायचा का त्यातून मिळणारे फायदे काही अंशी समाजकार्यात खर्या अर्थाने पसरतील हे बघणे महत्वाचे? (नुसते उत्पन्नाच्या २% चेक CSR च्या नावाखाली फाडणे नाही!)
अजून देखील काही मुद्दे या संदर्भात मांडता आले तर अवश्य मांडावेत!
वाचने
19362
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
चपखल ऑब्जर्व्हेशन.
In reply to चपखल ऑब्जर्व्हेशन. by अर्धवटराव
एक म्हण चपखल बसते " देअर इज
मेधाताईंची ही मुलाखत मी अजून
In reply to मेधाताईंची ही मुलाखत मी अजून by आतिवास
सक्रीय राजकारण...
कंटाळा आला राव आता....
डावी धोरणे
डावे उजवे कबुतरखाने
चोप्य-पस्ते
In reply to चोप्य-पस्ते by क्लिंटन
ह्म्म.. ज्ञानात भर!! त्या जरा
In reply to चोप्य-पस्ते by क्लिंटन
मार्मिक प्रतिसाद आहे.
In reply to मार्मिक प्रतिसाद आहे. by नितिन थत्ते
>>>त्या काळातला प्रमुख विरोधी
In reply to चोप्य-पस्ते by क्लिंटन
अरुंधती रॉय यांच्या "द डॉक्टर
आता फक्त रुमाल टाकून ठेवतो.
नेहमीप्रमाणे..
In reply to नेहमीप्रमाणे.. by विटेकर
>>नेहरुंची "साम्यवादाचे
पुढे जात असताना
- सोव्हीएट रशियात सर्वांना नॅचरल गॅस फुकट मिळायचा! अर्थात अॅट व्हॉट कॉस्ट हा एका वेगळ्य चर्चेचा मुद्दा आहे. पण जनतेला महीन्याला बिलं भरावी लागत नसत हे वास्तव होते. पुढे सोव्हीएट रशिया पडला, विभागला गेला. युक्रेन सरकारला ते शक्य होईना. मग करायचे काय? एका अर्थी तेच प्रश्न ऑलमोस्ट २५ वर्षांनी आजही अप्रत्यक्षपणे सतावत आहेत.
- भांडवलशाही अमेरीकेत: बेरोजगार व्यक्तींना हप्ता मिळणे आणि रोजच्या खाण्यासाठी फुडस्टँप मिळणे चालते. परीणामी अनेक बेरोजगार व्यक्ती आपली बुडं हलवत नाहीत अशी रीपब्लीकन्स ची तक्रार असते. त्यात काही अंशी तथ्य देखील असते. पण त्याच बरोबर हे देखील वास्तव आहे की ह्या श्रीमंत देशातील अनेक ठिकाणी शाळेत जाणार्या मुलांना ( ज्यांच्या आईवडीलांना रोजगार मिळतो) एकावेळचे खाणे हे शाळेत मिळणार्या सबसिडाईझ्ड रेट वर खावे लागते आणि तेव्हढ्याच खाण्यावर वाढत्या वयात दिवसरात्र रहावे लागते. (यात अतिशयोक्ती दुर्दैवाने अजिबात नाही).
ही दोन टोके आहेत. साम्यवादाने/समाजवादाने गरीबी गेलेली नाही. भांडवलवादाने नक्कीच संपत्ती वाटली गेली पण त्याचबरोबर विषमता पण वाढू लागली आहे. भारतात दिसणारी विषमता ही भयावह होत चालली आहे असे कधी कधी वाटते. पण त्याचे उत्तर हे नक्षलवादी अथवा अगदी बंगाली निष्क्रीय साम्यवाद असू शकत नाही, असे मला वाटते. या सर्व मनातल्या खळबळीतून विचारलेले प्रश्न होते - going forward.. भारत आज तरूण आहे. जर तरूणांनी आउट ऑफ बॉक्स विचार केला नाही तर खरे नाही असे वाटते. भारतापुरते... आज जर मध्यममार्गी समाजवाद हवा असला तर तो नक्की आजच्या काळासाठी कसा हवा? आणि मध्यममार्गी भांडवलवाद हवा असला तर तो कस हवा हा प्रश्न आहे. का अजून कुठला मार्ग आहे जो आपण चोखाळलेलाच नाही?धारावी
उत्तम चर्चा
In reply to उत्तम चर्चा by पैसा
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
प्रतिसाद आवडला
In reply to प्रतिसाद आवडला by पैसा
पण उद्या समजा अशा स्केलची
In reply to पण उद्या समजा अशा स्केलची by क्लिंटन
>>> रिझर्व्ह बँक हा कडक
In reply to पण उद्या समजा अशा स्केलची by क्लिंटन
रिझर्व्ह बँक
In reply to रिझर्व्ह बँक by पैसा
रिझर्व्ह बँक
In reply to रिझर्व्ह बँक by पैसा
नवी बॅंक लायसेन्स
In reply to नवी बॅंक लायसेन्स by क्लिंटन
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by पैसा
अरेच्चा!
In reply to अरेच्चा! by विकास
मिळाली का उत्तरे?
मुक्तार्थव्यवस्थेने
छान चर्चा.
काय ठरलं मग?