मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पांढर धुकं काळ धुकं

विवेकपटाईत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आज नेहमीप्रमाणे सकाळी ७.३० वाजताची ७४० घेतली. रस्त्यावर धुकं पसरलेलं होत. दिल्ली केंटचा भागात वस्ती विरळ असते, त्या मुळे रस्त्यावर धुकं ही जास्ती दाट होत. धुक्याचा रंग जवळपास काळाच होता त्या मुळे २०-२५ मीटर पुढचे दिसत नव्हते. एक प्रकारची उदासी वातावरणात पसरलेली होती. एसी बसच्या खिडकीतून धुकं बघता-बघता बालपणाचे दृश्य डोळ्यांसमोर तरंगले. धुकं तेंव्हा ही पडायचं पण रंग मात्र पांढरा शुभ्र असायचा. धुक्याच्या परद्याला भेदून सूर्याची सोनेरी किरणे अंगावर पडायची तेंव्हा मन प्रसन्न व्हायचं. कधी-कधी धुक्यात सप्तरंगी इन्द्रधनु ही दिसायचे. पण आज सूर्याची सोनेरी किरणे ही काळपट वाटत होती. आज डोक्यावरचे सर्व केसं पांढरे झाले, अस्थमा, हृदयरोग इत्यादी ही. कदाचित धुक्याच आणि सुख-सुविधा (भोग) याचं ही नात आहे. मुफ्त मिळणार पांढर धुकं सोडून आपण भरपूर किंमत मोजून काळ धुकं विकत घेतो आहे. पण हे कितपत चालणार.??? शुभ्र पांढर धुकं, मागासपणाचे लक्षण आदिम समाजाच, कष्टप्रद जगण. काळकुट्ट धुकं, प्रगतीचे लक्षण. सुखासीन लोकांच, रोगग्रस्त जगण. काळ्या धुक्यात विरला प्राणी माणूस नावाचा इतिहास नियतीचा घडणार का असा?

वाचने 4593 वाचनखूण प्रतिक्रिया 19

In reply to by आदूबाळ

विवेकपटाईत Wed, 01/29/2014 - 18:31
यमक जुळविण्यासाठी कविता केली नाही आहे. आणि ते मला जुळविता ही येत नाही. एवढेच म्हणेन यमकांच्या जुळवा जुळवीत व्यर्थ जाती शब्दे भावना हृदयातील हरवून जाती इथे.

आयुर्हित Tue, 01/28/2014 - 20:38
छान अर्थपूर्ण कविता आहे. जाम आवडली. खरे आहे तुमचे. खूप छान मुद्दा मांडलाय. लवकरात लवकर clean energy कडे जावे लागेल नाही तर अशी परिस्थिती असेल की हिटलरलाही लाज वाटेल. दिल्लीत २५ वर्षापूर्वी ही अशीच स्थिती होती. दिल्लीत व बाजूला थर्मल पॉवर प्लांट तर आहेतच त्याबरोबरच प्रत्येक कोठीत/दुकानात/बिल्डिंग मध्ये dg sets ही आहेत. तरी बरे आजकाळ मेट्रोमुळे बऱ्याच गाड्यांचा वापर कमी झाला आहे. धन्यवाद.

आयुर्हित गुरुवार, 01/30/2014 - 13:00
दिल्लीची दुरावस्था Centre for Science and Environment चा एक ताजा अहवाल, ज्यात म्हटले आहे कि प्रदूषणामुळे अस्थमा, फुफ्फुसाचे आजार व हृद्यरोगात जबरदस्त वाढ झालेली आहे.

In reply to by आयुर्हित

आयुर्हित Wed, 04/02/2014 - 03:44
माननीय उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांच्या हस्ते दिल्ली मानवविकास अहवाल २०१३ सादर करण्यात आला आहे. हा अहवाल आपल्याला दिल्ली सरकारच्या योजना विभागाच्या संस्थळावर पाहता येईल. या अहवालानुसार दिल्लीतील प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. (संदर्भ: पान क्रमांक:९९ व १०० फिगर ४.४: २०११मधील दवाखान्यातील संख्याशास्त्र आधारे) एका माणसाकडून दुसर्‍या माणसाला लागण होऊ शकणाऱ्या (संसर्गदोषजनित) आजाराचे(६७%भार)प्रमाण: श्वसन संक्रमण(तीव्र स्वरूपाचा आजार): ४३.३% फुफ्फुसाचा दाह(न्युमोनिआ):७.७% फुफ्फुसाचा क्षयरोग: ८.६% एकूण : ५९.६% *६७ % भार =३९.९३% एका माणसाकडून दुसर्‍या माणसाला लागण न होऊ शकणाऱ्या (संसर्गदोषरहीत) आजाराचे(३३%भार)प्रमाण: अस्थमा/दमा :८% फुप्फुसांच्या नळयांना आलेली सूज/फुप्फुसनलिकादाह : ५.२% शरिराच्या पेशीजालात किंवा पोकळ्यात अवास्तव हवा असणे(Emphysema): १.२% फाजील वाढलेला रक्तदाब/उच्च रक्तदाब : १९.१% एकूण : ३३.५% * ३३% भार = ११.०५% असे एकूण आजाराच्या ५०.९८% आजारांचे प्रमुख कारण दुषित हवा आहे हे सिध्द होते.

आयुर्हित Sun, 03/16/2014 - 21:00
जास्त होणाऱ्या घातक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी, पॅरिस चा एक स्तुत्य उपक्रम खाजगीगाड्या (२ & ४ चाकी)फक्त दिवसाआड चालवायला परवानगी. ज्याचा नंबरप्लेट मधील शेवटचा नंबर सम असेल त्याने सम तारखेलाच गाडी चालवायची आहे. सर्व लोकांनी गाड्या घरी सोडून याव्यात म्हणून ३ दिवस सार्वजनिक वाहतूक फुकट देण्यात येणार आहे. Pollution levels hit 180 microgrammes of PM10 particulates per cubic metre, more than double the safe limit of 80 Paris restricts car use after pollution hits high मुंबई,कानपूर,पुण्यात PM10 फक्त 250-300 ug/m3 आहे. त्यामुळे आमचे सरकार झोपलेले आहे.Bad for health

विवेकपटाईत Sun, 03/16/2014 - 21:15
आपल्या देशात जी कर ५ लाख रुपयांना मिळते तिची किंमत सिंगापूर इथे 2५-३० लाख आहे. त्यात १० लाख पेक्षा जास्त डीजेल गाड्या आहेत. दिल्लीत ३० लाख पेक्षा जास्त कार आहेत. (bpl कार्ड + कार वाले इथे लाखोंच्या संख्येने असतील) जगात सगळ्यात स्वस्त कार आपल्या इथेच का? याचा विचार करायला हवा. सध्याच्या घटकेला दिल्लीची हवा बीजिंग पेक्षा ही वाईट आहे.

In reply to by विजुभाऊ

आयुर्हित Tue, 03/25/2014 - 13:13
विजुभाऊ, दूरावस्था सर्व शहरांचीच आहे! फक्त दिल्लीत ती खाजगी संस्थेने स्वखर्चाने तपासून ते जाहीर केल्याची धमक दाखविली आहे, एवढेच. दिल्ली सारखीच अवस्था पुणे, मुंबई, कानपूर,बेंगुलूरु, हैदराबाद व अशा अनेक शहरांची आहे. तेव्हा आपण सर्वच भारतीय प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चाललो आहे. त्यामुळेच जनजागृती करून,प्रत्येक सुज्ञ माणसाने स्वत: व इतरांना प्रदूषण कमी करण्यास प्रवृत्त केलेच पाहिजे.

आयुर्हित Mon, 04/21/2014 - 11:35
डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरात मंगळवारी 'हिरवा पाऊस' पडल्याने डोंबिवलीकरांमध्ये पुन्हा एकदा प्रदूषणाची दहशत निर्माण झाली आहे. प्रदूषणाच्या तक्रारींकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे दुर्गंधी, श्वसनास त्रास या बाबी नित्याच्याच झाल्याचे संतप्त डोंबिवलीकर सांगतात. डोंबिवलीकरांना प्रदूषणाचीच साथ!

आयुर्हित Mon, 04/21/2014 - 12:03
मुंबईच्या हवेत कोणकोणते त्रासदायक घटक आहेत याची जंत्री करणे मोठे जटिल काम आहे. १९९६ साली जपानमधील नागोया गावी एक परिषद झाली. तेथे अमेरिकेच्या हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेने मुंबईच्या हवेत असलेल्या नायट्रोजन ऑक्साइड्च्या जास्तीच्या प्रमाणाबद्दलचा निबंध वाचला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असे हे जास्तीचे प्रमाण असण्यात मुंबईचा तिसरा क्रमांक लागतो. खरे म्हणजे नायट्रोजन डाय ऑक्साइड हा सर्वव्यापी आहे. कारण खनिज आणि जैविक इंधने जाळली तर त्यांच्या ज्वलनातून हा वायू बाहेर पडतो. या वायूच्या प्रादुर्भावामुळे ज्या अनेक गोष्टी घडतात त्यातली एक म्हणजे रासायनिक स्मॉग. स्मॉग हा शब्द स्मोक आणि फॉग याच्या संमिश्रातून तयार झाला आहे. मराठीत याला धुरके म्हणतात. या धुरक्यामुळे लहान मुले आणि वृद्धांना दम्याचा त्रास होतो, असा आयआयटी पवईच्या पर्यावरण विभागातीला प्रा. रश्मी पाटील यांचा निष्कर्ष आहे. हार्वर्ड स्कूलच्या अभ्यासात प्रा. रश्मी पाटील सहभागी होत्या. नायट्रोजन ऑक्साइड अथवा त्याची इतर रसायनांबरोबरची संयुगे ही माणसाला घातकच आहेत. केरोसिनचा स्टोव्ह, लाकडे जाळणारी चूल, सिमेंटचा कारखाना, वाहनांच्या धुराडय़ातून बाहेर पडणारा धूर आणि धूम्रपान यामुळे नायट्रोजन ऑक्साइड तयार होतो आणि तो हवेत मिसळतो. हार्वर्ड अभ्यास मंडळाने तेरा देशांतल्या, सत्तर ठिकाणी ४९१ व्यक्तींवर होणाऱ्या परिणामांची प्रत्येकी दोन दोन दिवस पाहणी केली. यातील फिनलंड येथील पाहणीत एक कोटी भागात फक्त साडेपाच भाग नायट्रोजन डायऑक्साइडचे भाग आढळून आले. या उलट दक्षिण कोरियात सेऊलला सर्वात जास्त म्हणजे एक कोटी भागात ४३ भाग, जपानमधील टोकुशीमा येथे ४१.९ भाग आणि मुंबईला ४०.८ भाग असे प्रमाण आढळले. यामुळे डोकेदुखी, घसा धरणे, खोकला, छातीत जड वाटणे, असे विकार उद्भवतात. फुप्फुसाचे विकार उद्भवतात. मुला-मुलींची वाढ नीट होत नाही. एल.पी.जी. अथवा वीज वापरली, स्वयंपाकघरात हवा खेळती ठेवली तर नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण खूप कमी आढळते. अ. पां. देशपांडे, (मुंबई) मराठी विज्ञान परिषद कुतूहल - हवेतील नायट्रोजन ऑक्साइड

आयुर्हित Sat, 04/26/2014 - 16:20
प्रदूषणाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम असे टाळावे...... डॉक्टर श्रीकांत शर्मा(मुलचंद मेडीसिटी, दिल्ली)यांचा सल्ला व उपाय: १)सकाळी ५ ते 7 च्या दरम्यान मोकळ्या हवेत चालावे, जी त्या वेळी बर्यापैकी स्वच्छ असते. २)जास्त प्रदूषण असलेल्या भागात/कारखान्या//गावात जाणे शक्यतो टाळावे पण जरुरी पडल्यास मास्क लावावे. ३)स्वत:पासून सुरवात करा : प्लास्टिक बॅगचा वापर टाळावा, इलेक्ट्रिक कार्स वापरायला लागा. ४)विटामिन अ, क, ई, भरपूर पालेभाज्या, आंबट रसाची फळे, योग्य ती प्रथिने, अँतीऑक्सिडेंटस्, अक्रोड, बदाम चा वापर करून रोग प्रतिकारशक्ती वाढवावी ५)कमी तेल व संपूर्ण,सकस धान्यापासून बनवलेला आहार,बिना सायीच्या दुधापासून बनवलेली दही व योग्य फलाहारच घ्यावा. ६)भरपूर वेळेला व भरपूर प्रमाणात पाणी प्या. 7)सकाळी लवकरच न्याहारी करा व कधीही चुकवू नका. ८)सर्व प्रकारचे, सर्व रस/चव असलेले योग्य ते प्रमाण ठरवून खावे, कशालाही नाही म्हणू नये. ९)साखर, अल्कोहोल, कॅफीन(उत्तेजक पेय) चे प्रमाण अत्यंत अल्प ठेवावे. १०)मन प्रसन्न ठेवून खावे ११)उघड्यावरचे व आरोग्याला हानिकारक असे काही खाऊ नये. How to Prevent Pollution from Harming Your Health

आयुर्हित गुरुवार, 05/08/2014 - 11:31
जागतिक आरोग्य संघटनेच्या १६०० शहरांच्या हवेचा अभ्यास करून तयार केलेल्या अहवालानुसार दिल्लीतील हवा जगातील सर्व शहरांपेक्षा खराब हवा आहे, ज्यामुळे हृदयरोग, फुफ्फुसरोग व कर्करोग होण्याचा वाढीव धोका आहे. दिल्लीतील हवेत PM१० चे वार्षिक सरासरी प्रमाण १३४मायक्रोग्राम प्रती घन मीटर आहे, जे WHO प्रमाणे २०मायक्रोग्राम प्रती घन मीटर हवे आहे.याचा अर्थ दिल्लीतील प्रदूषण नियत प्रमाणापेक्षा 7 पट जास्त आहे. दिल्लीप्रमाणेच पटना,ग्वालियर व रायपुर शहरांच्या हवेतही PM१० चे वार्षिक सरासरी प्रमाण अतिशय जास्त आहे. हवेचे प्रदूषण हे भारतातील पाचव्या क्रमाकांचे मृत्यूचे कारण आहे: 'Global Burden of Diseases' by US-based Health Effect Institute Delhi's air among dirtiest in the world, reveals WHO report

धर्मराजमुटके गुरुवार, 05/08/2014 - 11:43
माणसाने किती अरसीक असावे म्हणतो मी ? एक माणूस छान छान कविता करतोय आणी एक माणूस शोधनिबंधाचे दाखले देतोय. कमीत कमी कवितेला कवितेने उत्तर द्या की !