निवडणूक २०१४ अनुभव: १. नावनोंदणी
केंद्रात पन्नासेक लोक असतील. प्रत्येक गटाच्या हातात एकेक यादी होती आणि त्या यादीत लोक डोकावून पाहत होते. मीही एका गटात डोकावून बघितलं – मग लक्षात आलं की आपल्याला प्रभाग अथवा वॉर्ड क्रमांक माहिती नाही.
मग तिथल्या कर्मचारी स्त्रीला माझ्या निवासस्थान संकुलाचं नाव सांगून यादी मागितली; तर त्या ‘प्रभाग सांगा’ म्हणाल्या. तो तर मला माहिती नव्हता.
तोवर मला एकंदर इकडून तिकडे टोलवलं जाण्याचा कंटाळा आला होता. इतकं झंझट करत बसण्यापेक्षा ‘नवा अर्ज भरू’ असं म्हणत मी दुस-या कोप-यातल्या कर्मचा-याकडे गेले. तर तिथं अर्ज संपले होते. सकाळी साडेदहा वाजताच अर्ज संपले होते. “आम्हाला फक्त दहा अर्ज दिले होते, आम्ही काय करणार? तलाठी ऑफिसात जाऊन भांडा तिथल्या साहेबांशी” असा त्या बाई मला सल्ला देत होत्या आणि इतर तीन कर्मचारी त्यांना अनुमोदन देत होते उत्साहाने. रविवारी काम करायला लागल्याचा रागही त्यांनी व्यक्त केला.
“नगरसेवकाच्या ऑफिसात मिळताहेत अर्ज, तिकडून घेऊन या”, दुस-या रांगेत उभ्या असलेल्या एका सद्गृहस्थांनी सल्ला दिला. आमच्या नगरसेवकाचं कार्यालय मला माहिती नव्हतं – पण ‘शोधा म्हणजे सापडेल’ या तत्त्वानुसार शोधल्यावर ते सापडलं. तिथं नमुना अर्जही मिळाला – तो घेऊन मी शाळेत परतले तर गर्दी (अपेक्षेप्रमाणे) अजून वाढली होती. लोक अधिकच वैतागले होते, कर्मचारी गर्दीला हाताळू शकत नव्हते, पुरेसे अर्ज नव्हते, प्रभागांचे नंबर लोकांना माहिती नव्हते – सगळा नुसता गोंधळ होता.
मी अर्ज भरण्याच्या तयारीत होते तर मला सांगितलं गेलं की कागदपत्र नुसती जोडून चालणार नाहीत; ती कागदपत्र खरी असल्याचा सही शिक्का हवा. कुणाचा आणायचा असतो तो? तो कुठून आणायचा आता रविवारच्या दिवशी?
मला त्या कर्मचा-यांची दया आली आणि माझ्यासकट तिथं आलेल्या इच्छुक मतदार लोकांचीही दया आली. निवडणूक आयोगासमोर काय प्रकारची आव्हानं असतात याची ही फक्त एक झलक!
मतदान करणं – हा हक्क आहे, तर तो सहजी का मिळू नये? प्रत्येक वेळी हक्क मिळवण्यासाठी इतकी गुंतागुंतीची प्रक्रिया का करावी लागते? मुळात यादीत असलेली नावं गायब का आणि कशी होतात? निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काय होतंय याची माहिती कधी मिळते का? निवडणूक तयारीच्या बाबतीत ही माहिती देणारी यंत्रणा असते का? प्रश्नच प्रश्न!
या सगळ्या गदारोळात एक गोष्ट ठळकपणे जाणवली; ती म्हणजे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अभाव. इथं इच्छुक मतदारांना मदत करायला कुणीच नव्हतं. नेते येतात तेव्हा कार्यकर्त्यांची गर्दी असते – इतर वेळी ते कुठे असतात कोण जाणे! बहुधा फेसबुकवर किंवा तत्सम सोशल मिडीयायामध्ये आपापल्या नेत्यांना “लाईक” देत बसले असतील – किंवा दुस-या पक्षांबद्दल अपप्रचार करत बसले असतील.In reply to मग आता इथं जाऊन नाव नोंदवा : by आतिवास
In reply to काय मजाय... by पिलीयन रायडर
In reply to ही आणखी एक नवी गुंतागुंत by आतिवास
In reply to पीडीएफ पाहिली ना.. त्यात एका by पिलीयन रायडर
In reply to पीडीएफ पाहिली ना.. त्यात एका by पिलीयन रायडर
In reply to पिरा, मला वाटतं पीडीएफचा आकार by आतिवास
In reply to पण माझाच फोटॉ माझ्या नावा by पिलीयन रायडर
In reply to तुम्ही फोटो दिला असेल (आधी, by आतिवास
In reply to ही आणखी एक नवी गुंतागुंत by आतिवास
In reply to ही आणखी एक नवी गुंतागुंत by आतिवास
In reply to ताई.. by चिगो
In reply to ताई.. by चिगो
In reply to @ चिगो, by मुक्त विहारि
मतदान यादीत नांव नसेल,तर आपणास ब्रम्हदेवही मतदान करु देणार नाही. पण यादीत नाव असेल तर मात्र पासपोर्ट, ड्रायवींग लायसन्स, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र अथवा आणखी कोणताही कागद जो आपल्या ओळखीचा व सदरील ठीकणचा रहीवासी असल्याचा (एकत्र) कायदेशीर पुरावा आहे तो चालवुन मतदान करता येइल (आधार कार्ड).
In reply to @ चिगो, by मुक्त विहारि
In reply to काय मजाय... by पिलीयन रायडर
In reply to मी चेक केले, माझे नाव आहे. पण by बॅटमॅन
In reply to शाबास! by आतिवास
अवांतरः बाकी इतर वेळी स्त्रीद्वेष्टा बिरुद मिरवण्याची ही शिक्षा मिळालेली दिसतेय Wink - गंमत करते आहे हे वेगळे सांगायला नको!तरी म्हटलंच ही कमेंट आली नै कशी काय ;) =))
In reply to शाबास! by आतिवास
In reply to मी चेक केले, माझे नाव आहे. पण by बॅटमॅन
In reply to आता मतदानाला जाताना दाढीमिशी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अगदी अगदी by बॅटमॅन
In reply to आलबेल ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तसं नाही हो! जसजशा सुधारणा by आतिवास
In reply to आलबेल ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to त्यांचं काम आता बऱ्यापैकी by एक तारा
In reply to हेही एक कारण आहेच गोंधळ by आतिवास
In reply to माझा अनुभव by राजेंद्र मेहेंदळे
In reply to पुर्वीच्याच रहिवासी पत्त्यावर by प्रकाश घाटपांडे
In reply to आज दुवे उघडत नाहीये. by आत्मशून्य
htpps:// चालत नाहिये. http:// वापरुन साइट उघडतेय...
माझ्या माहितीनुसार मतदार यादीत नावनोंदणी वर्षभर (काही अपवाद वगळता) करता येते. मात्र निवडणूक आयोग फक्त ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत, आणि इतरवेळी आयोजित केलेल्या खास मोहिमांच्या वेळी या याद्या अद्ययावत करतं. निवडणूक काळात उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची जी तारीख असते, त्याआधी दहा दिवस नावनोंदणी बंद होते - निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर ती पुन्हा चालू होते.
ऑनलाईन अर्ज केला तरी प्रत्यक्ष घरी येऊन पडताळणी होते अशी प्रक्रिया आहे असे कुठेतरी वाचल्याचे आठवते - पण नेमका दुवा सापडत नाहीये आत्ता. त्यामुळे फक्त जेपीईजी प्रत दिल्याने काम होईल असे नाही.
ही माहिती ऐकीव आणि आंतरजालावर मिळाली आहे. ती चुकीची असल्यास कृपया वाचकांनी ती दुरुस्त करावी. In reply to दुवे माझ्याकडे उघडताहेत. by आतिवास
अर्ज स्वीकारण्याची जी तारीख असते, त्याआधी दहा दिवस नावनोंदणी बंद होते......निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर ती पुन्हा चालू होते.नेमक्या याच कारणाने आता नाव नोंदणी जरी केली तरी आताच्या निवडणूकीमधे मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. बहुतेक १५ तारिखच पुण्यासाठी अंतीम होती. अर्थात ज्यानी अजुनही नाव नोंदणी केली नाही त्यांनी निकाल जाहीर झाल्यावर ती लगेच करणे अपेक्षित आहेच.
ऑनलाईन अर्ज केला तरी प्रत्यक्ष घरी येऊन पडताळणी होतेघरी येउन पडताळणी आवश्यक वाटत नाही, क्लायंटसाइड वॅलीडेशन तसेही बायपास करता येते. सर्वरसाइड वॅलीडेशन हवे. म्हणजेच दिलेली माहीती संबधीत कागदपत्रांच्या सरकारी नोंदीशी बरोबर की चुकीची आहे पडताळायला हवे. तसेच होत असावे. माहितीसाटी धन्यवाद.
In reply to बदल केल्यानंतर नाव लगेच यादीत by कंजूस
In reply to लेख छान आहे. सर्व by विकास
In reply to लेख 'राजकारण' सदरात हलवायला by आतिवास
In reply to लेख 'राजकारण' सदरात हलवायला by आतिवास
In reply to इथे इंग्लंड मध्ये उघडतोय. by खेडूत
In reply to मला वाटलं अर्ज ६ अ भरल्यावर by आतिवास
In reply to http://ceo.maharashtra.gov.in by अलबेला सजन



खालील लिंक वर नाव शोधायचा