उभारी देणारे असे काही

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in जनातलं, मनातलं
23 Feb 2014 - 11:03 am

struggle शब्दाचा एक लोचा आहे . आपल्याकडे हा शब्द आर्टस ला admission घेणाऱ्या , नाटक -चित्रपट क्षेत्रात career करू इच्छिणार्यां आणि दहा ते पाच ची चाकोरी सोडून वेगळी वाट चोखाळणार्या लोकाना उद्देशुन वापरला जातो . मुळात मला अस वाटत की प्रत्येकजण हा त्याच्या / तिच्या पातळीवर एक struggle करतच असतो. म्हणजे बापाशी बिघडलेले संबंध पुर्ववत करण्यासाठी धडपडणारा पोरगा हा एक struggle च करत असतो . नौकरी मध्ये बॉस आपली ठासत आहे हे कळत असून पण नौकरी टिकवण्यासाठी धडपड करणारा मध्यमवर्गीय माणूस पण रोज संघर्ष करीतच असतो. पण कधी कधी हा संघर्ष खुप लांबतो . इतका लांबतो की आता याला शेवटच नाही अस वाटायला लागत . खुप लोक अशावेळेस Give Up करतात . आणि आयुष्यभर 'काश …' च मधुन टोचणी देणार फिलिंग घेऊन जगतात . काहि लोक मात्र याला अपवाद असतात . ते टिकून राहतात , लढतात आणि जिंकतात पण . अशीच एक हृदयस्पर्शी संघर्षाची कथा आहे आंग ली ची . इंग्रजी चित्रपट पाहणाऱ्या लोकांसाठी हे नाव अपरिचित नाही . Brokeback Mountain , नुकताच येउन गेलेला आणि गाजलेला life of pie असे अनेक चित्रपट आंग ली ने दिग्दर्शित केले आहेत . आज जगातल्या आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये त्याचा समावेश होतो . पण इथपर्यंत मजल मारण्यासाठी त्याने जो भावनिक , आर्थिक संघर्ष केला त्याची हि कुठलाही आव न आणणारी , melodramatic नसणारी पण हृदयस्पर्शी कहाणी त्याच्याच शब्दात :

१९७८ मध्ये मी Illinois University मध्ये चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेण्याचा निर्णय पक्का केला . माझ्या वडिलांचा या माझ्या निर्णयाला तीव्र विरोध होता . त्यांनी माझ्या तोंडावर काही आकडेवारी फेकून मारली .: ' दरवर्षी तुझ्यासारखे ५०००० लोक हे असल कुचकामी शिक्षण घेऊन कॉलेज च्या बाहेर पडतात आणि त्यांच्यासाठी नौकर्या किती असतात , तर फ़क़्त २००. ' तरी त्यांचा हा सल्ला ठोकरून मी अमेरिकेला जाणाऱ्या विमानात बसलो . पण त्यामुळे पिता - पुत्राच्या नात्याला कधीही न भरून येणारा तडा गेला . पुढच्या दोन दशकात आम्ही शंभरहून कमी वाक्य एकमेकांशी बोललो असू .

पण जेंव्हा मी माझ शिक्षण संपवून बाहेर पडलो तेंव्हा माझ्या वडिलांनी व्यक्त केलेली भीती किती खरी होती हे मला पदोपदी जाणवायला लागल . एक चिनी वंशाचा माणूस hollywood मध्ये काहीतरी करून दाखवेल असे कुणालापण वाटत नव्हत . कॉलेज मधून बाहेर पडल्यानंतरची पुढची सहा वर्ष हि कधीही संपणार नाही असे वाटणाऱ्या अनिश्चिततेने भरलेली होती . या सहा वर्षांमधला बहुतांश वेळ मी अनेक दिग्दर्शक व संकलक यांचा सहायक म्हणून छोटी मोठी किरकोळ काम करण्यात व्यतीत केला . सगळ्यात वेदनादायक भाग हा मी लिहिलेलं स्क्रिप्ट घेऊन निर्मात्यांचे उंबरठे झिजवणे हा होता . त्याकाळात मला साधारणतः ३० निर्मात्यांकडून नकार मिळाला .

त्याच वर्षी मी ३० वर्षाचा झालो . एक जुनी चीनी म्हण आहे : तिशीत माणूस त्याच्या स्वतःच्या पायावर ठाम उभा असतो अशा अर्थाची . पण मी तर अजूनही धड स्वतःच्या प्राथमिक गरजा पूर्ण करू शकत नव्हतो . या अशा पडत्या काळात माझ्यासमोर फार कमी पर्याय शिल्लक होते . एक तर काही घडेपर्यंत वाट बघत बसायचं अथवा चित्रपट बनवण्याचं माझ स्वप्न सोडून द्याच .

या अनिश्चिततेच्या अंधाराने भरलेल्या काळात मला माझ्या बायकोने पाठबळ दिल . तिने तिची पदवी जीवशास्त्र या विषयातून घेतली होती आणि ती एका प्रयोगशाळेत नौकरी करत होती . पण तिच्या नौकरी मधून मिळणारे उत्पन्न आम्हाला पुरेल एवढे नव्हते . त्याचकाळात आम्हाला एक पुत्ररत्न झाले आणि आमच्या जबाबदाऱ्या अजून वाढल्या . घरात मी पैसे आणू शकत नाही या अपराधी भावनेतून मी घरकामांची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली . जेंव्हा बायको कामावर जायची तेंव्हा मी स्वयंपाक , साफसफाई आणि आमच्या मुलाच संगोपन अशी काम करत असे . फावल्या वेळात वाचन आणि संहिता लेखन चालूच होते . रात्रीच जेवण बनवून झाल की मी आमच्या मुलाला , घेऊन घरासमोरच्या पायऱ्यांवर बसून राही . मी माझ्या बायकोची आणि तो त्याच्या आईची वाट बघत .

हे असल आयुष्य कुठल्याही पुरुषासाठी मानहानीकारक च . माझ्या सासू सासर्याना हे डाचत असाव . त्यांनी माझ्या बायको ला काही पैसे देऊ केले . त्यांच्या मते मी या भांडवलातून एखाद चायनीज हॉटेल सुरु कराव जेणेकरून माझ स्वतःच काही उत्पन्न सुरु होईल . माझ्या बायकोने हे पैसे घ्यायला इन्कार केला . जेंव्हा मला याबद्दल कळल तेंव्हा मी सुन्न झालो . अनेक रात्री जागून काढल्यावर शेवटी मी निर्णयाप्रत आलो : माझ चित्रपट बनवण्याचं स्वप्न हे पूर्ण होणार नाही . सत्याला सामोरे जाण्याची वेळ आली आहे

जड अंतकरणाने मी जवळच्या एका कॉलेज मध्ये मी Computer Course ला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला . हा निर्णय घेतल्यावर मी निराशेच्या गर्तेत बुडून गेलो . माझ्या बायको ला हा माझ्या स्वभावातला फरक जाणवला . Computer Class च वेळापत्रक तिने माझ्या bag मध्ये पाहिलं . त्या रात्री ती काहीच बोलली नाही .

दुसऱ्या दिवशी ती तिच्या कामाला जायला निघाली . मी सुन्न पणे बसून होतो . ती घराबाहेर पडली . पण अचानक तिच्या मनात काय आल कुणास ठाऊक . घराबाहेरच्या पायऱ्यांवर असताना ती पुन्हा वळली आणि एवढच म्हणाली , "आंग , तुझ्या स्वप्नांचा विसर पडू देऊ नकोस ." तिच्या या एका वाक्याने जादूची कांडी फिरली . निराशेच्या गर्तेत गटांगळ्या खाणार माझ स्वप्न पुन्हा जिवंत झाल . त्याचा पुनर्जन्म झाला .

मी ते computer class च वेळापत्रक bag मधून बाहेर काढल . त्याचे हळूहळू बारीक बारीक तुकडे केले आणि कचऱ्याच्या डब्यात ते फेकून दिले .

अर्थातच एका रात्रीत परिस्थिती बदलली नाही . पण काही दिवसांनी मला माझ्या स्क्रिप्ट साठी finance मिळाला . मी माझ्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली . नंतर माझ्या कामाला काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण मिळाले . नंतर माझ्या बायको ने माझ्याशी बोलताना कबुली दिली ,' मला नेहमीच असा विश्वास होता कि तुझा जन्म हा चित्रपट बनवण्यासाठी च झाला आहे . संगणक क्षेत्रात आधीच खुप लोक काम करत आहेत आणि त्यांना तुझी गरज पण नव्हती ."

(http://whatshihsaid.com/2013/02/26/ang-lee-a-never-ending-dream/) मुळ लेख इथे आहे .

स्वप्नांना वयाची , लिंगाची , धर्माची बंधन कधीच नसतात . त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी कुठल्याही मुहूर्ताची गरज नसते . आंग लि ने २०१३ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा Oscar पुरस्कार जिंकला . तुमच स्वप्न काय आहे ?

Ang Lee

मांडणीकलाप्रकटनलेख

प्रतिक्रिया

प्रेरणादायी लेख आहे. मंगला खाडिलकर यांनी लिहिलेल्या "ही आपलीच माणसं" या पुस्तकात गेल्या ५०-६० वर्षात अमेरिकेत येउन कष्ट करून, खडतर प्रसंगांना तोंड देऊन यशस्वी झालेल्या मराठी लोकांच्या गोष्टी आहेत. त्यातली काही उदाहरणं खूप प्रेरणादायी आहेत. आजच इ-सकाळ मध्ये प्रकाशित झालेला "व्हॉट्‌सऍप:बेकारभत्ता ते 1900 कोटी" हा अच्युत गोडबोले यांचा लेख प्रेरणादायी आहे (http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4790124480597349547&Se...)

आयुर्हित's picture

23 Feb 2014 - 11:38 am | आयुर्हित

लोकांना फक्त दिसतो तो झगमगाट आणि ऐश्वर्य!
त्या साठी कराव्या लागणाऱ्या कष्टाची, त्यागाची व समर्पणाची कथा आपण सर्वांसमोर आणली त्याबद्दल मनापासून आभार!

अनुप ढेरे's picture

23 Feb 2014 - 11:45 am | अनुप ढेरे

छान लिहिलय. पण बर्‍याचदा आपली पॅशन काय आहे हे समजेपर्यंत शिक्षण, लग्न वगैरे या गोष्टी झालेल्या असतात. आणि स्वतःच्या पॅशन साठी नातेवाईक/समाज आदींना फाट्यावर मारणं आपल्याकडे अपवादानी दिसतं

ज्ञानव's picture

23 Feb 2014 - 12:05 pm | ज्ञानव

करावे तर शब्द अपुरे पडतील. आंग ह्यांनी ज्या वेदना सहन केल्या त्या भरल्या पोटी कुणी समजूच शकत नाही. पण त्यांना त्या काळात त्याच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीकडून जे अनुभव आले ते कळले असते तर आणि आता एक यशस्वी व्यक्ती म्हणून त्याच्यात झालेले बदल काय असतील ते जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे....

आयुष्यात बायकोचे स्थान समजणारेही कमीच असतात....पण तो एक वेगळाच संघर्ष आहे.

अर्धवटराव's picture

23 Feb 2014 - 12:10 pm | अर्धवटराव

सुंदर लेख. थोडा आटोपशीर झालाय खरा.

तुमच स्वप्न काय आहे ?... ह्म्म्म. बरच काहि बाकि होतं राव. आता फक्त मी सुखाने जगावं, कोणाला त्रास देऊ नये आणि कुणि मला त्रास देऊ नये एव्हढच वाटतं.

मुक्त विहारि's picture

23 Feb 2014 - 12:18 pm | मुक्त विहारि

आवडला.....

पिंपातला उंदीर's picture

23 Feb 2014 - 10:08 pm | पिंपातला उंदीर

धन्यवाद सर्वाना : )

शशिकांत ओक's picture

23 Feb 2014 - 10:39 pm | शशिकांत ओक

व्यक्तिरेखा....
सादरीकरणाबद्दल धन्यवाद

आंगली नक्किच भारी व्यक्ती आहे.

कवितानागेश's picture

23 Feb 2014 - 10:44 pm | कवितानागेश

मस्त ओळख. खरोखरच प्रेरणादायी.

वाचनमात्र राहीन चालणार नाही. प्रतिक्रिया दिली पाहिजी.. फार छान झाले आहे.

जगातील बर्‍याच पुरुषाना अश्या बायका भेटत नाही.
अप्रतिम लेख!!!!

शैलेन्द्र's picture

24 Feb 2014 - 5:25 pm | शैलेन्द्र

जगातील बर्‍याच बायकांनाही असे पुरुष भेटत नाहीत ..

छान लेख.. आवडला..

मृत्युन्जय's picture

24 Feb 2014 - 4:36 pm | मृत्युन्जय

वा. सुंदर. लेख आवडला.

पिंपातला उंदीर's picture

24 Feb 2014 - 5:16 pm | पिंपातला उंदीर

प्रतिक्रिया देनर्या सर्वान्चे आभार

आदिजोशी's picture

24 Feb 2014 - 7:57 pm | आदिजोशी

पण स्वतः खायचे वांदे असताना एका मुलाला जन्म दिलाच कसा? जर लग्गा लागला नसता तर तुमच्यासोबत मुलाचेही हाल झाले नसते का?