नाते आपुले तसेच आतून...
लेखनविषय:
जसे फुलावे रंग साजिरे
श्यामनिळ्याच्या मोरपिसातून
मुके तरी मोहाहुन मोहक
नाते आपुले तसेच आतून..
मी मुरली तू सूर खुळासा
मी यमुना तू माझी खळखळ
तू कविता, मी तुझ्या आतली
आर्त खोल दडलेली तळमळ
तू कान्हा मी अधीर राधा
राघव तू मी तुझी मैथिली
नर्तक तू मी नुपुर नादमय
छुमछुमणारे तुझ्या पाऊली
भेट घडे या वळणावरती
अनोळखीशी आज नव्याने
वर वर सारे परके तरिही
जुळले अंतर जुन्या दुव्याने
परस्परांतच परस्परांनी
पुन्हा नव्याने जावे गुंतून
अनोळखी देहात नांदते
नाते आपुले तसेच आतून..
© अदिती जोशी
वाचने
4044
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
मस्त रचना... एकदम कडक
खूप सुंदर आणि आर्त भावपूर्ण कविता!
अभिनंदन! असेचछान छान लिहित चला!
अशीच एक छान रचना आठवली : युगायुगांचे नाते
वा! मस्त!
वाह!
आवडली.
@भेट घडे या वळणावरती
अनोळखीशी आज नव्याने
वर वर सारे परके तरिही
जुळले अंतर जुन्या दुव्याने >>> अजी कत्ल हो गए जी....!!!
@परस्परांतच परस्परांनी
पुन्हा नव्याने जावे गुंतून
अनोळखी देहात नांदते
नाते आपुले तसेच आतून.. >>> यहां जी उठे फिर से :)
आवडली
सर्वांचे मनापासून आभार!! __/\__
..........................................................
क्या बात है!!!
खूप आवडली.
शेवटच्या २ कडव्यांमध्ये 'चलो इकबार फिरसे अजनबी बन जाये'ची आठवण झाली.
छान कविता!
सुंदर ,नादमयी कविता. खूप आवडली.
आहा!
धन्यवाद.. :)
सुरेखच झालीये.....
सुंदर, खुपच आवडली :)
आवडली
भेट घडे या वळणावरती
अनोळखीशी आज नव्याने
वर वर सारे परके तरिही
जुळले अंतर जुन्या दुव्याने
परस्परांतच परस्परांनी
पुन्हा नव्याने जावे गुंतून
अनोळखी देहात नांदते
नाते आपुले तसेच आतून..
-दिलीप बिरुटे
खूप दिवसांनी छान, सोप्पी तरल आणि तरीही सखोल कविता वाचायला मिळाली, नितळ सुंदर!
सर्वांना थँक्स अ लॉट.... :)
..........................................................
क्याबात!!!
वा! क्या बात है!
फारच छान