दुर्योधन,: महाभारतातला
लेखनप्रकार
दुर्योधन : महाभारत काय म्हणते ?
श्री.मृत्युंजय यांचा दुर्योधनावरील लेख वाचून थोडी निराशा झाली.. रामायण व महाभारत हे आपले नुसते धार्मिक ग्रंथच नव्हेत तर सांस्कृतिक धन आहे. त्यावर आपले विचार अवष्य मांडावेत पण तसे करतांना " ग्रंथात असे आहे पण मला त्यातून हा अर्थ लावावा असे वाटते " असे लिहले पाहिजे. दुर्गा भागवत वा इरावती कर्वे या महाविदुषी देखील हाच मार्ग चोखाळतात. याने दोन गोष्टी साधतात. वाचकाला ग्रंथात काय आहे व मग तुम्हाला काय म्हणावयाचे आहे ते सापेक्ष कळते. नच, तुम्ही मांडता ते ग्रंथात आहेच अशी चुकीची समजुत होऊं शकते. श्री. मृत्युंजय यांच्या लेखातील पुढील विधानांचे पुरावे मला महाभारतात सापडले नाहीत. (संपूर्ण महाभारत, भाषांतर : राजिवडेकर-भानू-दातार आठल्ये ; तपासणारे : उपासानी-अभ्यंकर) मी कलकत्ता प्रत वाचलेली नाही, तेथे असे असेल तर संदर्भ द्यावा)
श्री. मृत्युंजय यांनी काही ठाम विधाने केली आहेत व काही ठिकाणी आपली मते दिली आहेत. पहिल्या बाबतीत त्यांनी पर्व-अध्याय यांचा संदर्भ द्यावा व दुसर्या बाबतीत ही मते नोंदवतांना त्यानी कशाचा आधार घेतला तेही स्पष्ट करावे. " महाभारतात आधार नसेल तरीही माझे मत " असे म्हणावयासही हरकत नाही.
(1) भीष्मांचा आदर्श अंबा-अंबालिका प्रकरणात कसाला लागतो.
(२) हजार पापे करणारा युधिष्ठिर
(३) more humane म्हणजे नक्की काय ? व त्याचा महाभारतात संबंध काय ?
(४) स्वतःच्या पोराचा जीव जायचा वेळ येइतो सर्वांकडे दुर्लक्ष करणारी, कोण ? कशी ?
(५) डोके फोडणारा-हातपाय तोडणारा बाल वयातील भीम
(६) कौरवांचा एक एक महिन्या नंतरचा ज्न्म (असे फक्त दु:शीलेबद्दल लिहले आहे)
( ७) राजाचा मोठा मुलगा तोच राजा होणार, धृतराष्ट्र राजा केव्हा झाला ?
( ८) युद्धप्रसंगीही दुर्योधनाने कुरुवंशातल्या बहुतेक सगळ्या सदस्यांना आपल्या बाजुने ओढले. हे कोठून आणले ?
( ९) दुर्योधन म्हणजे दु: युधम अर्थात युध्दात जिंकता येण्यास दुर्धर / अवघड असणारा. अर्जुन, अभिमन्यु, सात्यकी, घटोत्कच,... यांच्याबरोबरच्या युद्धात नुसता हरणाराच नाही तर पळून जाणारा जिंकण्यास दुर्धर ?
( १०) प्रजाहितपालक दुर्योधनाचा अधःपात सुरु झाला द्रौपदी वस्त्रहरण प्रकारात. ही सुरवात म्हणावयाची तर बालवयातच भीमाला पाजलेले विष व लाक्षागृहात पांडवांना जाळण्याचा केलेला प्रयत्न, यांचे काय ?
(११ ) द्युतप्रसंगी कर्णाने त्याला द्युतापासुन परावृत्त करण्याचा आणि सरळसरळ युद्ध करण्याचा सल्ला दिला होता संदर्भ ?
(१२) योग्य राजकीय खेळ्या खेळुन याद्वांची सेनाच काय तर कृष्णाची चतुरंग सेनाही स्वतःकडे जमा केली. शल्यासारख्या पांडवांच्या आप्तालाही आपल्या बाजुने ओढले. फक्त कृतवर्मा स्वत: कौरवांकडे गेला, अंतर्गत भांडणांमुळे. शल्याची तर चक्क फसवणुक करण्यात आली. याला "योग्य" खेळी म्हणावयाचे ?
असो. वरील मुद्दे काढावयाचे कारण जन्म सदाशिव पेठेत गेला. दुर्योधन खलनायकच आहे व त्यात सारवासरवी करण्यास वावही नाही. त्याच्या जमेची बाजूला युधिष्ठिराच्या स्पर्धेतून आलेला, दानशूरपणा. उत्कृष्ट प्रजापालन, दूरदर्शीपणा, धोरणीपणा व नेतृत्व. नमुद करावयास पाहिजे त्याचे अलौकिक धैर्य. श्री. मृत्युंजय यांच्या नजरेतून निसटलेला त्याच्या आयुष्यातील एकमेव दैदिप्यमान क्षण म्हणजे सरोवरातून बाहेर आल्यावर युधिष्ठिराने मूर्खपणाने त्याला सांगितले की "तू आम्हा पाचांपैकी कुणाशीही लढ.’ धर्म, अर्जुन,.नकुल, सहदेव यांचेपैकी कोणीही त्याच्या समोर क्षणभरही जिवंत राहू शकला नसता.. पण त्याने निवडले भीमाला.. जेथे लोकांनी थरकांपावे तेथे त्याने दाखविलेल्या असामान्य धैर्यानेच त्याला सद्गति मिळालेली आहे.
शरद
वाचने
12269
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
वाचतोय
आता कसं
>>>वरील मुद्दे काढावयाचे कारण
In reply to >>>वरील मुद्दे काढावयाचे कारण by प्यारे१
(No subject)
दुर्योधन,: महाभारतातला.
माझ्या परीने ह्यातल्या काही
महाभारतानुसार दुर्योधन
In reply to महाभारतानुसार दुर्योधन by वडापाव
ज्याला जसे वाटेल तसे.
परसेपशन्स
In reply to परसेपशन्स by प्रसाद गोडबोले
काळानुसार आणि मेजॉरीटी नुसार........
In reply to परसेपशन्स by प्रसाद गोडबोले
+१००
बिनबुडाच्या वांझोट्या चर्चा.
रामायण व महाभारत हे आपले
जाऊ दया ना राव...
In reply to जाऊ दया ना राव... by धन्या
कशाला डोक्याला शॉट लावून
कारण त्याचे समाजमनाशी धार्मीक
In reply to कारण त्याचे समाजमनाशी धार्मीक by धन्या
>>> या नात्याची चाचपणी करुन
In reply to >>> या नात्याची चाचपणी करुन by प्यारे१
:)
In reply to :) by आत्मशून्य
धनाजी म्हणत आहेत तसे डोक्याला शॉट हा...
In reply to धनाजी म्हणत आहेत तसे डोक्याला शॉट हा... by आत्मशून्य
माहितीच्या जंजाळात ज्ञानाची
In reply to माहितीच्या जंजाळात ज्ञानाची by धन्या
हे मी आपल्या केमिकल लोच्या विधानावरुन ठरवले!
In reply to हे मी आपल्या केमिकल लोच्या विधानावरुन ठरवले! by आत्मशून्य
बाकी सगळं जाऊ द्या.
In reply to बाकी सगळं जाऊ द्या. by धन्या
आपल्यासारखा प्रकांड पंडीत मी
In reply to कारण त्याचे समाजमनाशी धार्मीक by धन्या
ज्याची त्याची
In reply to कारण त्याचे समाजमनाशी धार्मीक by धन्या
फुकाच्या लोढण्याबद्दल सहमत
अरे अरे
शरदराव, मनातले बोललात.
In reply to शरदराव, मनातले बोललात. by llपुण्याचे पेशवेll
अवांतर
काल्पनिक