|| श्री गुरवे नम: ||
जिजामाता उद्यान कट्टा वृत्तान्त
जिजामाता उद्यानातलं वृक्ष-पुष्पवैभव
डिस्क्लेमर : खरं तर वृक्ष-वनस्पती या विषयात मला फार काही माहीत नाही. प्राणी-पक्षी-कीटक-फुलपाखरं-साप हे माझ्या विशेष आवडीचे आणि अभ्यासाचे विषय. मात्र, बायकोला वृक्ष-वनस्पतींची खूप माहिती असल्यामुळे, तिच्यामुळे मला जे काही थोडंफार माहीत झालं, त्याच्या जोरावर कट्ट्याला गेलो आणि हा सचित्र वृत्तान्त सादर करतो आहे. सर्वांकडून फोटो मिळाल्यानंतर हा वृत्तान्त लिहितो आहे, त्यामुळे उशीर झाला. रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही सकाळी साडेनऊ-दहा वाजता तब्बल पंधरा-सोळा मिपाकर कट्ट्यासाठी उत्साहाने जमले, तेव्हाच हा कट्टा मस्त होणार, हे नक्की झालं. डॉ. खरे, तन्मय (मुक्त विहारींचा मुलगा), विलासराव आणि विनोद१८ यांनी फोटो काढायची जबाबदारी घेतल्यामुळे आम्ही निश्चिंत मनाने उद्यानात शिरलो. हल्ली अनेक वृक्षांवर नावाच्या पाट्या लावल्यामुळे रोहितक, दिवीदिवी अशा काही अनोळखी वृक्षांची नव्याने ओळख झाली. शिवाय भटक्या खेडवालासारखा माहितगार बरोबर असल्यामुळे दुधात साखरच! आत शिरल्यावर समोर प्रथम दिसतात गोरखचिंचेचे (बाओबाब Adensonia digitata) दोन अजस्र, ढेरपोटे वृक्ष. हे मूळ आफ्रिकेतल्या ओसाड प्रदेशातले. तिथले रहिवासी याच्या खोडापासून पाणी मिळवतात. पोटात पाण्याचा साठा, म्हणून यांचा बुंधा मोठाला असतो. काही महिन्यांपूर्वी मुरूडला त्याच्या फुलाचा फोटो काढला होता, तोही इथे टाकत आहे.
यांच्या जवळच ‘झुंबर’ (brownea) हे अत्यंत सुंदर फुलाचं झाड आहे, पण त्याला अजिबात फुलं नव्हती, म्हणून थोडा विरस झाला.
इतर वृक्षांपेक्षा फांद्यांची वेगळी रचना असलेला वृक्ष म्हणजे उंदीरमार (Gliricidia sepium). आडव्या मुख्य फांद्यांना उभ्या (जमिनीला काटकोनात) फुटणार्या फांद्यांमुळे हे झाड ओळखता येतं. ह्याची मुळं खाल्ल्यामुळे उंदीर मरतात म्हणे, म्हणून याचं नाव उंदीरमार. याच्या गुलाबी फुलांचा हा बहर.
पांढरंशुभ्र खोड असलेलं हे घोस्ट ट्री (Sterculia Urens). रात्री जंगलात फिरताना काळोखात हे पांढरंशुभ्र झाड भुतासारखं दिसत असावं. सध्या हे निष्पर्ण होतं. याचं खोड अगदी गुळगुळीत. तर, खडबडीत गठुळीदार खोड असलेले हे दोन वृक्ष. पाहिला आहे गब/गाब (Diospyros Malabarica) आणि दुसरा आहे भद्राक्ष (Guazuma tomentosa).
गम ग्वायकम (लिग्नम व्हिटे, Guaiacum officinale)ची फिकट जांभळी छोटी फुलं. या मार्गाच्या दोन्ही बाजूंना हीच झाडं आहेत. जानेवारीच्या पहिल्या-दुसर्या आठवड्यात याला भरपूर फुलोरा होता. याच्या खोडापासून डिंकासारखा पदार्थ (गम) मिळतो, तो औषधी असून बद्धकोष्ठावर वापरतात.
कोको (Theobroma cacao)चं फळ. याच्या बियांपासून कोको बनवतात. दिवाळीच्या सुमारास याला फुलोरा आला असेल. आता त्याचं फळ बघायला मिळतंय. फणसाला बुंध्यावर फळं येतात, तसंच यालाही. भवन्स महाविद्यालयाच्या बागेतही हे झाड आहे
पावडर लावायच्या पफसारखं हे गुलाबी आणि पांढरं पावडरपफ.
तोफेच्या गोळ्यासारखं फळ असलेलं कैलासपती उर्फ कॅननबॉल (Couroupita guisnensis). याच्या फुलाला गोडसर सुगंध असतो. झाडाच्या आसपास गेल्यावर वास यायला लागतो. याच्या फुलाच्या आत शंकराच्या पिंडीसारखी रचना दिसते. त्याचं जड फळ खाली पडून फुटतं, त्याला मात्र दुर्गंध येतो.
हे खडबडीत फळ आहे नोनीचं (Morinda citrifolia). 'सत्तर रोगांवर अक्सीर इलाज' म्हणून याचा रस सात-आठशे रुपयांपासून विकला जातो.
जंगली बदाम (Sterculia foetida) हा खास या मातीतला वृक्ष. याच्या लाल छोट्या फुलांना उग्र वास असतो. (याच्या शास्त्रीय नावातल्या ‘फोटिडा’ या शब्दाचा अर्थ ‘ उग्र दर्प/दुर्गंध’.) याचा फुलोरा तर निघून गेलाय, त्याला आता फळ आली आहेत. विनोद१८नी गमतीदार माहिती पुरवली, की याच्या फळाच्या रिकाम्या कवचात पाणी भरून ठेवलं की काही तासांनी डिंक तयार होतो. हे ऐकून काही उत्साही (म्हणजे मी नाही हो! मी मुलखाचा आळशी आहे) मिपाकरांनी हा प्रयोग करण्यासाठी ते घरी नेलं.
हे चेंडूफळ (बॅडमिंटन बॉल Parkia biglandulosis). खरं तर असंख्य फुलांनी बनलेला हा एक बॉल असतो, ते फोडल्यावर स्पष्ट दिसतंय. बॉलच्या गाभ्यामध्ये बिया तयार होतात.
उद्यानाच्या मधोमध जिजाऊमाता आणि बालशिवाजी यांच्या पुतळ्याजवळ हे एकमेव नीलमोहर (ब्लू जॅकारांडा Jacaranda mimosaefolia). पुण्यात याची भरपूर झाडं बघायला मिळतात. उद्यानातलं मात्र हे एकमेव झाड. त्याचा बहर ओसरलाय, मात्र मिपाकरांना बघायला मिळावं, म्हणून निदान एकतरी गुच्छ टिकून होता, त्याचे हे फोटो.
या पुतळ्याजवळच एक जपानी बाग आहे. योकोहामा या जपानी शहराने ‘भगिनी शहर’ म्हणून मुंबईशी नातं जोडलं, त्याप्रीत्यर्थ ही बाग उभारली आहे. या बागेतलं हे ‘बॉटलब्रश’ (Callistemon citrinus).
बागेतल्या तळ्यातली ही कमळं आणि कासव.
बागेतला कांचनही (Bauhinia varigata) मस्त फुलला होता. फुलाचा हा क्लोज-अप. याची पानं आपट्यासारखी असल्यामुळे फुलोरा नसतानाही हे झाड मला ओळखता येतं.
याच बागेत एका छोट्या कमानीवर चढवलेल्या एका वेलीची ही सुंदर फुलं. हिचं नाव ‘लसूणवेल’, कारण हिची पानं थोडी चुरडल्यावर बोटांना लसणीचा वास येतो.
वैशिष्ट्यपूर्ण पानं असलेला हा एक वृक्ष – सॅटिन लीफ / स्टार अॅपल (Chrysophyllum cainito). याच्या पानाचा रंग एका बाजूने गडद हिरवा, तर मागच्या बाजूचा रंग सोनेरी ब्राउन आणि स्पर्श सॅटिनसारखा मऊ असतो. लॅटिनमधील ‘क्रायसोस’ म्हणजे सोनेरी आणि ‘फायलम’ म्हणजे पान, म्हणून शास्त्रीय नाव ‘क्रायसोफायलम’.
सीतेचा अशोक (Saraca asoka) कसा भरगच्च फुलला आहे, बघा. लाल-शेंदरी फुलांचा गुच्छ मस्त दिसतो. सीतेला अशोकवनात (याच वृक्षांच्या वनात) ठेवलं होतं, म्हणून याला ‘सीतेचा अशोक’ म्हणतात. याच्या खोडापासून, पानांपासून अशोकारिष्ट, अशोक घृत वगैरे अनेक गुणकारी औषधं बनवतात. (प्रासजी, बरोबर आहे ना?)
याचसाठी केला होता अट्टाहास...
उद्यानाची एक रोपवाटिका आहे. तिच्या आत असलेली ही पिवळी सावर (यॅलो सिल्क कॉटन Cochlospermum religiosum). आत गेल्यावर हा फोटो मिळाला, पण तेवढ्यात शिपाईमामा शिट्या फुंकत आले आणि आम्हाला बाहेर हाकललं. सर्वत्र आढळणारी काटेसावर (लालगुलाबी फुलं) आणि पांढरी सावर यांचाच हा भाऊ.
व्हाईट शेव्हिंग ब्रश (Psuedobombax ellipticum) याच दिवसात फुलतो आणि त्याचा फुलोरा थोडे दिवसच असतो. तो बघण्यासाठी कट्ट्याचा एवढा आटापिटा केला.
उर्वशी उर्फ रतनज्योत (अॅमहर्स्टिया नोबिलिस) - नावाप्रमाणेच ‘नोबल’ फूल. मूळचं द. अमेरिकेतलं. इथे आता मस्त फुललंय.
फुलांसाठी एक खास संकेतस्थळ इथे पाहा.
या दिवसात न फुललेली काही फुलं - महाराष्ट्राचं राज्यफूल तामण/जारूळ, बहाव्याच्या विविध जाती, गोरखचिंच वगैरे एप्रिल-मेमध्ये फुलतील. तो फुलोरा बघायला एप्रिल-मेमध्ये उद्यानात चक्कर टाकायलाच हवी, हेवेसांनल.
सरतेशेवटी,
मुजरा....
वाचने
27633
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त व्रुतांत!!! उत्तम फोटोज.
वृत्तांत आणि विशेषतः सगळी
धन्यवाद सुंदर माहिती..
मस्त व्रुतांत आणी फोटोपण .
मस्त...
मस्तच
मस्त!
मस्त
+१
In reply to मस्त by नंदन
बदल केला आहे
In reply to मस्त by नंदन
मस्त...फोटो व वृत्तांत.
मस्त !
ते टण्णु एकमेकांच्या डोक्यात
In reply to मस्त ! by सुज्ञ माणुस
फोटूच फोटू सगळीकडे!
अप्रतिम!
मस्तच !!
रिव्हिजन झाली!! मजा आली!!
वा..
मस्त
काय
मस्तच... वृत्तांत आणि माहिती
सुंदर
>>>एम्प्रेस गार्डन
In reply to सुंदर by राही
हहह्ह?
In reply to >>>एम्प्रेस गार्डन by प्यारे१
अहो ते तुमच्या प्रतिसादाला
In reply to हहह्ह? by राही
अतिशय सुंदर वृत्तांत.
दृष्टी
मस्त माहिती आणि फोटो!
प्रतिसादांसाठी धन्यवाद
छान माहिती व फोटू.
वृत्तांत आवडला
रिव्हिजन झाली !!
परत जमल्यास नक्की येणार.
In reply to रिव्हिजन झाली !! by रुस्तम
अतिशय माहीतीपुर्ण वृत्तांत
कट्टा मिसल्याने जळ्जळ झाली आहे!
In reply to अतिशय माहीतीपुर्ण वृत्तांत by किसन शिंदे
लवकरच ठरवा म्हणजे हवेत थंडी
In reply to कट्टा मिसल्याने जळ्जळ झाली आहे! by अजया
अनुमोदन आहे! शिवाय एक तरी
In reply to लवकरच ठरवा म्हणजे हवेत थंडी by सुबोध खरे
लवकरच ठरवा ....
In reply to कट्टा मिसल्याने जळ्जळ झाली आहे! by अजया
झाडांचे फोटो आणि वर्णन आवडले.
थोडी पुरवणी: (कट्ट्याला आलो
आठवलं!!!
In reply to थोडी पुरवणी: (कट्ट्याला आलो by ऋषिकेश
पावडर पफ, शिरिष आणि पर्जन्यवृक्ष
In reply to थोडी पुरवणी: (कट्ट्याला आलो by ऋषिकेश
पावडर पफ, शिरिष आणि
In reply to पावडर पफ, शिरिष आणि पर्जन्यवृक्ष by सुधांशुनूलकर
पुण्यातल्या संभाजी उद्यानात
मस्त..
पुरवणी: फोटो क्र. ४ मधल्या
नवी माहिती
In reply to पुरवणी: फोटो क्र. ४ मधल्या by आनन्दिता
फोटो आणि वृत्तांत दोन्ही आवडले.
दोन्ही वॄतांत आवडले. या
मस्त!
मस्तं झालाय हा शैक्षणिक कट्टा...
खासच!
राणीची बाग भाग २
कट्टा मस्त पार पडला....
अतिशय सुंदर फटू अन मस्त
सुंदर माहिती आणि फोटो !
लहानपणी ह्या उद्यानात कितीतरी
या निमित्ताने!