ओला रुमाल
"चो, एक प्रॉब्लेम आहे, जरा मदत हवी आहे".़
कथानायक, वय ५५, सर्व काही व्यवस्थित.
वयाचा टप्पा, जिथे पुढे काय चा कायमचा छळवाद.
"हा प्रॉब्लेम झाला तो कोइमतुर एक्सप्रेस मधे, पूणे ते लोणावळा मधे"
हम्म
"मी माझा नंबर एका पॅसेंजर ला दीला आहे"
बर मग?
"त्याला मी ७००० देणे लागतो"
???.
"अरे पत्यात हरलो"
३ पत्ती?
"हो"
अगदी सुरुवाती पासुन, डिटेल्स सांग.
"ऑफीस च्या ़कामानिमित्त पूण्याला गेलो १५ मिनीटात काम झाले. १० लाखाची ऑर्डर्र मिळाली. अॅड्रीनलीन लेवल जरा जास्तच होती. ३एसी मधे बसलो. टी.सी बरोबर मांडवली पण झाली. शिवा़जी नगर आउटर गाडी थांबली होती. इतक्यात दोन प्रवासी पॅसेज मधुन जात असताना माझ्याकडे बघुन हसले. मी पण हसलो. टॉयलेट मधुन परत येताना त्यातला एक म्हणाला " कार्ड खेलते हो सर"? मी पण हाय मधे होतो... " नेकी और पुछ पुछ"
त्याने नविन कोरा कॅट काढला.
"चलो रमी खेलेंगे"
पण कॅट एकच होता.
" ३ कार्ड खेलते हो".
जोश मधे होतो, हो म्हणालो.
इतक्यात एक सरदारजी डोकावले. त्यांनी पण खेळायची तयारी दाखवली. पण बरोबर च्या प्रवाशांनी ऑब्जेक्शन घेतले. सरदार म्हणाला " चलो २एसी मे चलो. ऊधर कोइ नही खाली पडा है".
१ ल्या डावात राणी हाय वर ३५० मिळाले.
२ रा मायनस ५०
३ रा प्लस ४००
एकाने आपण लोणावळ्याला उतरणार असे जाहीर केले.
४ था डाव सगळे ब्लाइंड.
दोन १०० ब्लाइंड नंतर मी पत्ते बघितले. बघ्तो तर काय एक्का, दुरी, तीरी- च्यायला ंआज माझा दिवस होता. बघता बघता टेबल ५००० ला पोचले. लोणावळा पॅक. नंतर २ रा. पण सरदारजी बधायला तयार नव्हता. अचानक त्याने ३००० ब्लाइंड ची खेळी केली. आणि शो ला ६००० माझ्याकडे नव्ह्ते. डाव सोडवत नव्हता.
"पैसे नही है तो गेम छोडो"- सरदारजी
तिढा झाला होता.
गेम बद्दल खात्री होती.
मी लोणावळ्या कडे बघितले.
"मेरी तरफ से डालोगे" मी
हार गये तो- लोणावळा
ये लो मेरा नंबर, बोले वो जगह दे दूंगा २४ घंटेमे. - मी
त्याने टाकले.
मी शो मागितला.
सरदारजी ़ कडे २,३,५. साला ब्लाइंड लक म्ह्णतात ते ह्याला. आता ह्यावर काही उपाय? ३० मिनिटाच्या टाइम पास साठी ६००० देणे जीवावर आले आहे. मी सरदारला फोन दिला आहे. तो बँक डीटेल पाठवेल मला. उपाय नसेल तर ट्रांसफर करावे लागतील".
........
" हसतोस काय"?
तुझ्या अजुनही लक्षात नाही आले ़़़का?
" नाय बॉ"
अरे तू कोंबडा, ओल्या रुमालाखाली सापडलेला.
़क्रमशः
वाचने
5613
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
चांगलंय
क्रमश :
विशेष काही कळलं नाही (म्हणजे
दोन शंका:
In reply to दोन शंका: by आदूबाळ
याला म्हणतात अकाऊंट्सचा माणूस!
>>> क्रमशः
In reply to >>> क्रमशः by प्यारे१
ओल्या रुमालाखाली कोंबडा हे
In reply to ओल्या रुमालाखाली कोंबडा हे by तुमचा अभिषेक
>>ओल्या रुमालाखाली कोंबडा हे
गुर्जींचा धागा आणि (अजुन तरी)
In reply to गुर्जींचा धागा आणि (अजुन तरी) by गणपा
क्रिप्टीक
In reply to क्रिप्टीक by रामदास
__/\__ 'अनुभव' बोलत असावा!
मला काही समजले नाही.
In reply to मला काही समजले नाही. by अविनाश पांढरकर
२,३,५ चा सेक्वेंस जास्त
In reply to २,३,५ चा सेक्वेंस जास्त by अनुप ढेरे
धन्यवाद!!!!!!!
डाव
जबरदस्त कथा....जाम आवडली...
पुढे?
अनामिक कथानायकाच्या नावाखाली
तसेही मास्तरांचे क्रिप्टिक